Sapna b

Horror

4.3  

Sapna b

Horror

एक मंतरलेला पेन

एक मंतरलेला पेन

7 mins
506


हा काळ तसा जुनाच अगदीच म्हणलं तर रेडिओ चा जमाना. एक गाव होते 'तासगाव' तालुक्याचे त्या गावात 'चिंकू' व त्याचे आईबाबा राहायचे. चिंकू तसा अभ्यासात हुशार होता पण त्याला बाहेर काही खेळायला जाण्याची आवड नव्हती म्हणुन तो शाळा आणी शिकवणीनंतर काही तरी उद्योग करत बसायचा. चिंकूचे बाबा पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते, म्हणून सतत बदल्या होत राहायच्या त्याच्यामुळे गावी जास्त जाणे होत नसायचे पण चिंकूला मात्र गावाकडची ओढ जास्त असायची. आताच्या मुलांप्रमाणे तेव्हा काही मुलांना खेळायला मोबाईल, संगणक वगैरे काही नव्हतं, म्हणून त्याचे बाबा गावाकडच्या गोष्टी सांगायचे त्यातच त्याला आईने लाल शर्ट घालुन झोपयला सांगितले आणी चिंकू गाढ झोपी गेला, चिंकू व त्याचे कुटुंब गावी परपाडवाडीला रहायला आले. गावाकडे मोठा वाडा होता. वाडा तसा आधीच स्वच्छ सारवून ठेवलेला होता. अगदीच चाळीस लोक आरामात झोपतील ईतका मोठा तो वाडा, चिंकूचे आजोबा गावचे मोठे सावकार होते. सुरवातीचे काही दिवस सर्व सामान लावण्यातच गेली.


दिवस तसे उन्हाळ्याचे होते म्हणून चिंकूची आई शेजारी पापड लाटायला गेली. मग काय चिंकू वाडा पहावं म्हणून फिरत होता त्याचा आवडता भोवरा घेवून. खेळता-खेळता त्याचा भोवरा गेला आजोबांच्या खोलीत आणी जावून बसला आजोबांच्या कपाटाखाली. मग काय चिंकू हाताने काढायचा खुप प्रयत्न करू लागला पण भोवरा काही हाताला लागत नव्हता, म्हणून त्याने बाहेर अडगळीत टाकून दिलेल्या गजाच्या साह्याने काढायचा प्रयत्न केला तेव्हा कुठे भोवरा निघाला. जसा तो खोलीच्या बाहेर पडणार तसं त्याच्या लक्षात आले की गजामुळे भिंतीची खुप माती निघाली तेव्हा तिथे काही तरी चमकत होते , काय होते ते या उत्सुकतेने चिंकू परत आला आणी चमकणार्या वस्तूच्या दिशेने गज लांबवला आणी ती वस्तु ओढून काढली. पाहीले तर काय कसला तरी लाकडी तुकडा आहे असे दिसले, मी काय करणार घेवून म्हणून चिंकूने प्रयत्न सोडून दिले आणी माघारी फिरणार तेवढ्यात खोलीचे दार आपोआप बंद झाले आणी एक हळू आवाज आला "ये थांब!" चिंकूने मागे पुढे पाहीले पण कोणीच नव्हते घाबरलेल्या अवस्थेत त्याने कपाटात खाली डोकावून पाहिलं, अर्धवट बाहेर पडलेला लाकडी तुकडा स्वतःहून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला पण बाहेर काही निघत नव्हता तेव्हा पुन्हा आवाज आला "ये मला बाहेर काढ." घाबरलेल्या चिंकूने, थरथरता हात पुढे केला तसा कपाटाखालून कोणी तरी त्याचा हात हिसका देऊन ओढला, आता मात्र चिंकू पुरता घाबरला आणी रडत-रडत आईला मोठमोठ्याने आवाज द्यायला लागला, पण त्याचा आवाज जातो कुठे चिरेबंदी वाड्याबाहेर??


त्याच वेळेस त्याच्या हातात तो लाकडी तुकडा लागतो, रडणं थांबवून तो थोडा वेळ शांत होतो आणि हातात आलेला लाकडी तुकडा निरखुन पाहतो तेव्हा त्याला कळतं हा तर पेन आहे. पेनाच्या टोपनावर एक गोल आरसा होता आणी पेनाचा सुगंध ही येत होता कारण पेन हा चंदनाचा होता. चिंकूने पेनाच्या आरश्यात पाहीले की त्याला विचित्र असा एक चेहरा दिसायला लागला अगदीच लाल रक्ताने भरलेला,सतत हालणारा, घाबरुन त्याने तो पेन जमिनीवर फेकून दिला, की पुन्हा त्यातुन आवाज यायला लागला "मला उचलून तुझ्याजवळ ठेव आणि कोणाला माझ्याबद्दल सांगु नकोस" मग तो पेन त्याने उचलून शर्टाच्या खिशात ठेवला, की लगेच दार उघडलं, तोपर्यंत आई त्याला शोधत खोलीपर्यंत आली होती. आईला पाहताच त्याने आईला घट्ट मिठी मारली. आता दिवे लावण्याची वेळ झाली होती, त्याची आई कामात व्यस्त झाली आणी चिंकू बाबा घरी येणार म्हणून दारात वाट पाहत होता, तेवढ्यात त्याची नजर दरवाजाच्या दक्षिणेला असणाऱ्या झाडाकडे गेली, झाडाला असणारी असंख्य काजवे मन मोहून टाकणारी होती, त्या झाडाजवळ जाणार तितक्यात तुफान वारा सुटला, शांत झाड अचानक हेलकावे घ्यायला लागले, संध्याकाळ झाल्यामुळे अंधार ही काहीसा दाटून आला होता त्यामुळे काहीच दिसत ही नव्हते, रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती, तेवढ्यात पेनाच्या आरश्यातुन एक प्रकाश बाहेर पडला आणी झाडावरची सर्व काजवे खाली मरून पडली, ते मेलेली काजवे पाहून चिंकू रडायला लागला आणि तेवढ्यात बाबानी आवाज दिला,"चिंकू काय झाले?" "तू रडत का आहेस?" रडता रडता चिंकू म्हणाला बाबा, "पहा ना झाडावरचे सर्व काजवे कसे मेले!" हे ऐकून बाबा अचंबित झाले कारण तिथे ना कोणते झाड होते ना कुठले काजवे. होते ते छोटेसे रोपटे होते. तरी बाबानी त्याची समजूत काढली आणी उचलून घरात आणले. चिंकूच्या आईला सगळा घडला प्रकार सांगितला आणि वैद्याला बोलवायला गेले, वैद्याने ही नवा परिसर आहे तर लहान पोर घाबरला असेल कशाला असे सांगून काळजीचे कारण नाही असे सांगितले व औषधे देऊन निघून गेला.


सकाळी जेव्हा चिंकूला जाग आली तेव्हा आई त्याला जवळ घेतले आणी पेल्यात ठेवलेले दुध पिण्यास सांगितले. त्याला रात्री काय झालं होतं ते काहीच आठवेना त्याने आईला ही विचारले तर आईने ही काहीशी टाळाटाळ करत लवकर आवरायला सांगितले. आज आईबाबा त्याला बाबाच्या लहानपणीच्या मित्राकडे घेऊन जाणार होते, तिथेच त्याला नवा मित्र भेटणार होता, विनू!


तिथे गेल्यावर चिंकू आणी विनू खुप खेळले तेव्हा विनूला आपला नवा पेन दाखवावा म्हणून त्याने पेनाला हात लावला तेवढ्यात पेनाच्या आरश्यातुन बाहेर प्रकाश पडला आणि अचानक विनूच्या घरच्या भिंती पडल्या, सुंदर सजवलेले घर अगदी मोडकळीस आले होते, एका भिंतीला विनूच्या आईबाबांचा फोटो टांगलेला होता आणि त्याला हार ही घातलेली होती, बाजुलाच एक म्हातारा दिसत होता आणि तो म्हणत होता, "चिंकू, ये बस माझ्या बाजुला मला तुला काही तरी सांगायचं आहे", चिंकूने त्याला विचारले "तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं?" त्यावर तो म्हातारा म्हणाला चिंकू, "मला ओळखले नाहीस का मी तुझा मित्र, विनू!" तेव्हा चिंकू विनूला जोरात ओरडून, हालवून विचारू लागला, "विनू तुला हे काय झाले?" "तु म्हातारा कसा काय झाला?" हे ऐकून सर्वच पळत आतल्या खोलीत आले तेव्हा ते सर्वच चिंकूला विचारत होते काय झाले म्हणून पण चिंकू जेव्हा भानावर आला. बबाच्या मित्राने चिंकूला वैद्याकडे दाखवण्याचा सल्ला दिला.


आता मात्र चिंकूच्या आईबाबा चिंता करु लगले की चिंकूला हे काय होत आहे ते? त्यांनी त्याला गोड बोलुन विचारयाचा प्रयत्न केला पण चिंकू ने काही संगितले नाही. दुसर्या दिवशी चिंकू आईबाबाबरोबर बाबाच्या दुसर्या मित्राकडे आला होता, तिथे त्याची भेट नविन मैत्रिणीशी झाली, दोघानंही एकत्र छान खेळताना पाहुन चिंकू चे बाबानी त्याच्या मित्राजवळ मोठयापनी चिंकूचे त्या मुली सोबत लग्न करायचे ठरवले. चिंकूला तिने सांगितले की तीची आजी तिला खुप गोष्टी सांगयची.


काही दिवस असेच उलटून गेले आता उन्हाळा संपत आला होता, म्हणून बाबाने चिंकू ला शिकवणीसाठी विनूसोबत पाठवायचे ठरवले. शिकवणी ही सुरु झाली आज चिंकू ने तो पेन हि सोबत आणला होता पण मास्तरांनी आज फक्त उजाळनी घेतली म्हणून चिंकूने पेन काही बाहेर काढला नाही, शिकवणी संपल्यावर विनू च्या घरी गेला तेंव्हा काकूने त्याला लाडू खायला दिला मग अंधार पडायला सुरुवात झाली म्हणून चिंकू घरी निघला, वाट तशी नेहमीचीच होती म्हणून चिंकू उड्या मारत पळू लागला वाटेत आलेल्या दगडावरुंन तो धडपडनार कीच त्याने स्वत:हचा तोल सांभाळला आणि खिशातला पेन पडला तर नाही ना म्हणून त्याने पेनला हात लावला कीच सगळीकडे प्रकाश पडला आणि समोरचे सगळे चित्राच बदलले, कच्चा रस्ता पक्का होता आजुबाजुला भरपुर घरे होती पण निरमनुष्य, समोरच विहिर होती त्यात डोकावून पहिले तर हिरवे पानी दिसत होते आणि त्यातले पानी आपोआप उखळत होते. ते पाहुन चिंकू घाबरुन घरच्या दिशेने पळायला लागला पळता पळता एका टेकडीवरच्या भयानक घरासमोर येउन थांबला, तेवढयात घरातून एका म्हातारीचा आवाज आला, "चिंकूssss!, बाहेर का उभा आहेस आत ये,गेली कित्येक वर्षापासुन मी तुझीच वाट पहात होते," चिंकू भीत भीत आत गेला तेंव्हा घराच्या भेगावालेल्या भिंती, छताला उलटे लटकलेले वटवाघूळे, भली मोठी खिडकी आणि त्यातून दिसनारा पोर्णिमेचा पांढरा चंद्र, हवेची झूळूक कानाजवळून जात होती. एक म्हातारी जिचे कपडे जीर्ण झाले होते, चेहर्यावर सुरकूत्या होत्या, लांब पांढरे केस, खोल गेलेले निळे डोळे, असे वटत होते तिने खुप दिवस झाले जेवन न्हवते केले, ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली "विहिरीचे पाणी पाहुन घाबरलास ना?" आश्चर्याने चिंकूने विचारले, "तुम्हाला कसे माहीत?" तेव्हा म्हातारी म्हणाली "माझे नाव 'रीमा' आहे आणि मला सगळे माहीत आहे, हा तुझ्याकडे असणारा पेन काही साधा पेन नाही हा मंतरलेला पेन आहे. हा पेन माझ्या पतिच्या आजोबाचा आहे, एका माणसांने आजोबाचे कर्ज फेडले नाही म्हणून त्या माणसाला पन्नास कोड्याची सजा दिली त्यातून त्या माणसाला आपार यातना झाल्या आणी तो मंतरलेला पेन त्याने आजोबाला त्याच्या मुलाच्या नामकरनाच्या वेळेस दिला, एकाएकी माझ्या पतीचे आजोबा आजारी पडले खुप वैद्ययानी उपचार केले पण बिमारिचे निदान काही झाले नाही आणी मारण्यापूर्वी त्यानी त्यांच्या बायकोला त्या पेन बद्दल सांगितले आणि मरण पावले, काही दिवसांनी तो पेन घेउन ती मोलकरीनिसोबत एका तन्त्रीका कडे गेली तेव्हा त्याने एक मंत्र दिला,"पोर्णिमा राते बारा वाजे चंदन उगळे शुभ्र पाषाणी" म्हणजेच जर पोर्णिमाला चंद्र मध्य रात्री डोक्यावर आला की तो पेन एखाद्या पांढर्या रंगाच्या दगडावर सगळा उगळला तर त्या पेनची सर्वा शक्ती कायमची संपून जाईल, पण माझ्या पतीच्या आजीने तो पेन संपवन्यापूरविच ती मरण पावली. आता फक्त हा राज कावेरी नावच्या ईमानदार नोकरानीलाच माहीत होते, अतिशय प्रेमळ अशा कावेरीला सगळे 'कावेरी आम्मा' म्हणायचे. आणी त्या पेना बद्दल घरी कोणाला कळू नये म्हणून कावेरीने तो पेेन कुठे तरी गाडून टाकला होता."


एवढे सांगून झाले की ती म्हणाली, "मी माझे वचन पूर्ण केले आणि आता मी मुक्त होऊ शकते चिंकू!" आणि लगेचच रीमा नावाच्या म्हातारीचे एक-एक अंग गायब होऊन ती अदृश्य झाली, तेवढ्यात चिंकूची आई ओरडली, "तो पहा चिंकू!" सर्वा शेजारीपाजारी चिंकूला शोधयला मशाली घेउन टेकडीवर आली होती तेव्हा आई रडत त्याला विचारत होती की, "येवढ्या रात्रीचे इथे काय करत आहे," तेव्हा चिंकू म्हणला,"मी हरवलो होतो."


सकाळी छान सूर्य उगवला होता, पक्षी झाडावर किलबिल करीत होती आणि चिंकू अजुन झोपलेलाच पाहुन आईने त्याला उठावले आणी अंगातला लाल शर्ट लवकर अंघोळ करुन बदलायला सांगितला, तेवढ्यात त्याचे बाबा बातमी घेउन येतात की त्यांची बदली गावाकडे म्हणजेच 'परपाडवाडीला' झाली. आणी चिंकू ला मांडीवर घेउन म्हणतात की, "बरं का चिंकू तिथे माझे दोन बालपणीचे मित्र राहतात एक 'रावसाहेब' ज्याचा एक मुलगा आहे 'विनू' जो तुझ्याच वर्गात आहे आणि दुसरा मित्रा आहे 'कवेरी आम्माचा' मुलगा 'सदोबा'. आणि सदोबाची मुलगी अतिशय गुणी, सडपातळ बांधा, काळेभोर केस आणी निळे डोळे आहेत तिचे." तेव्हा चिंकू विचारतो बाबा, "तिचे नाव काय आहे?" तेव्हा बाबा सांगतात, 'रीमा!'


(आणि चिंकू विचार करायला लगतो की या सर्वांना मी काल स्वप्नात कसे काय पहिले?)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror