STORYMIRROR

Rajan Jadhav

Inspirational

2  

Rajan Jadhav

Inspirational

देवमाणूस

देवमाणूस

10 mins
151

   आज या जगात कोणतीही व्यक्ती त्याचे सामाजिक , राजकिय , धार्मिक किंवा शैक्षणिक कार्यातून जनमाणसात प्रचलित होत असते आणि अस होण स्वाभाविक आहे.कारण अनेक ठिकाणी अशा व्यक्तींचा मान-सन्मान , सत्कार व पुरस्कार सध्या social media तून viral होत असतो.त्यामुळे अशा व्यक्तींची नावे सर्वांच्याच तोंडावर असतात . परंतु , काही सामान्य व्यक्ती केवळ आपली प्रज्ञा , शील आणि करुणा या व्यक्तीविशेषांनी व त्यांच्यातील कलागुण , स्वभावगुण आणि स्वकर्तृत्वाने 


 या भौतिक जगात शून्यातून निर्माण होतात आणि या पंचतत्त्वात असामान्यत्त्व प्राप्त करून विलीन होतात .पण याची कुणालाही कानोकान खबर नसते किंवा बरेचदा त्याच महत्त्व जाणूनबुजून कमी केले जात. अशाच एका व्यक्तीमत्वाची आज आपण ओळख करून घेणारआहोत. स्वातंत्र्यपूर्वकालीन महापुरुषांची सामाजिक पार्श्वभूमी, कालखंड व परिस्थिती भिन्न होती. आपल्या हाती असलेल्या साधनांचा उपयोग करून त्यांनी भारतीय समाजाचा उत्कर्ष कसा साधता येईल, यावर मनन व चिंतन करून प्राप्त परिस्थितीत चांगला बदल घडविण्यासाठी आपली शक्तीकृतीत उतरविली. याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्यांतून एक असामान्य व्यक्तीमत्व उदयास आले.सन .५ मार्च १९५७ मध्ये श्री.लवू मठकर यांचा मठ या गावी हरीजनवाडी आत्ताचे सिद्धार्थ नगर येथे एका गरीब कुटुंबात जन्म झाला.घरची आर्थिक परिस्थिती फार हालाखीची होती.आई-वडील दोन बहीणी, एक भाऊ व सर्वात लहान लवू अस सहा व्यक्तींच कुटुंब .एकवेळच जेवण देखील पोटभर मिळण्याची शाश्वती नसलेल्या या व्यक्तींने बाल वयातच मोलमजूरी करणे , लाकडाचे भारे विकणे वैगेरे काम करायला लागला व त्यातून आपल शैक्षणिक साहित्य खरेदी करुन शालेय शिक्षण चालू ठेवले.


लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने गणपतीच्या मूर्ती बनविणे व रंगविणे या कला हस्तगत केल्या.इयत्ता ७वीत असताना त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या सांगण्यावरून " गणपती चित्रशाळा " घरीच सुरू केली.यामागे देखील एक किस्सा सांगण्यासारखा आहे.वेतोरा येथील धुरी पेंटर कडून यांच्या घरचा गणपती आणला जात असे.एके वर्षी गणपतीला उशीर झाला म्हणून संतप्त मठकर कुटुंबियातून दुसरीकडे गणपती देण्यात आला .तिथेही असाच अनुभव आल्याने त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री.अंकुश व चुलत भाऊ गुंडू यांनी कोणताही पूर्वानुभव नसताना जमेल तशी मूर्ती बनवली परंतु काही केल्या या दोघांनाही मुखवटा बनविता येईना वयाने आणि कुटुंबात लहान असल्याने श्री लवू यांना मूर्तीस हात लावायला दिला जात नव्हता.मग नाईलाजास्तव दोघांनीही परवानगी दिल्यावर श्री लवू यांच्या हस्तकलेतून एक सुंदर गणेश मूर्ती साकारली व ती कुटुंबासमवेत शेजारी व गावच्या लोकांच्याही पसंतीला उतरली.दुसऱ्या वर्षी त्यांच्या वाडीतील व गावातील धुरीवाडी , गावडदेववाडी , सतयेवाडी व कावलेवाडी इ.ठिकाणाहून त्यांना गणेश मूर्ती बनविण्यासाठी ऑर्डर्सही आल्या.


     त्यातूनच कुमार लवू वयाच्या १४ व्या वर्षी सन १९७१ मध्ये मूर्तीकार बनले.नाग,पशु-पक्ष्यांसह , स्त्री-पुरुष मुखवटे यामध्ये जिवंतपणा तो ही किरकोळ रंगाच्या साहाय्याने दाखवणे हे त्यांचे वैशिष्टय होते.याबद्दल मठ गावातील सुप्रसिद्ध मूर्तीकार कै.कमलाकर गावडे हे देखील त्यांच कौतुक करायचे. अंगातील कलागुणांचा उदरनिर्वाहासाठी उपयोग करून आपला जीवनक्रम चालू ठेवला.मुळातच घरच्यां परिस्थितीची जाणीव असल्याने वागणूकीत प्रामाणिकपणा होता.आयुष्यात छक्के-पंजे करून मान मिळवण या व्यक्तीला जमल नाही.निर्व्यसनी , मनमिळावू स्वभाव , कार्यतत्परता , दिलेला शब्द पाळणे आणि नम्रपणा या गुण वैशिष्ट्यामुळे संपूर्ण गावात ही व्यक्ती लोकप्रिय होऊ लागली.

काबाडकष्ट करून प्रामाणिकपणे आपले इयत्ता १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण कोणत्याही नातेवाईक अथवा शेजाऱ्याच्या मदतीशिवाय पूर्ण केले.


    आपल्या सेवाभावीवृत्ती , नम्रपणा व सुस्वभावामुळे अल्पावधीतच त्यांना आद.आर .पी.जोशी सर यांनी शनिवार दि.१२ जून १९८२ साली त्यांना डाॕ .रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूल मठ येथे शिपाई या पदावर सेवेत रूजू करुन घेतले.बालवयापासून कष्ट घेतलेल्या या व्यक्तीच्या मदतीला आद.आर .पी.जोशी सर यांच्या रुपाने जणू ईश्वर आला होता. राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या म्हणण्यानुसार देव मंदिरात नाही तर माणसांत असतो याचा प्रत्यय इथे अनुभवयास मिळतो.


   तिन्ही भावंडांची विवाहकार्ये संपन्न झाली होती. सर्वात मोठी बहिण श्रीम. सुंदरा हिला १९७६ साली विवाह करून घावनळे येथे आपल्या सासरी गेली. मोठा भाऊ अंकुश याचा १९७७ साली विवाह झाला.दुसरी बहिण तुळसा हिच १९७८ साली विवाहबद्ध होऊन कोलगावला आपल्या सासरी गेली होती. सर्व भावंडांतून नोकरीला असणारी व्यक्ती श्री लवू हे होते.त्यामुळे त्यांच्याकडून इतर भावंडांना वेळोप्रसंगी मदतीच्या अपेक्षा होत्याच.त्यातच नियतीचा मोठा घाला म्हणजे त्यांची दुसरी बहीण श्रीम.तुळसा हिच्या पतीचे लग्नानंतर अवघ्या २ वर्षातच १९८१ मध्ये निधन झाले होते.त्यावेळी त्या गर्भवती होत्या.पतीच्या निधनानंतर ६' दिवसांनी मुलाचा जन्म झाला. ऐन तारुण्यात वयाच्या २४ व्या वर्षी नवरा गमावलेली श्रीम.तुळसा या धक्क्याने आपल मानसिक संतुलन गमावून बसली होती.


अशा परिस्थितीत तिच एकत्रित कुटुंब असल्यामुळे सासरच्या माणसांकडून जबाबदारी पेलवीली जाईल की नाही ? या चिंतेने श्री. लवू यांनी आपली बहीण व तिची दोन्ही मुले, २ वर्षाची मंजू आणि ३ महिन्यांचा राजन यांना आपला गाव मठ येथे १९८३ साली मुक्कामी आणल व त्यांच पालकत्व स्विकारल .जगाच्या इतिहासातील हा फार मोठा निर्णय होता.कारण सरकारी सेवेत रुजू असणाऱ्या कोणत्याही अविवाहित व्यक्तीने , स्वतः ची स्वप्ने , महत्तकांक्षा आणि ध्येयपूर्ती पुढे आपल्या बहीणीवर ओढवलेल संकट निवारण्यासाठी घेतलेला आत्मघाती निर्णय म्हटला तरी वावगे ठरणार नाही.कारण , आपण आपल्या आजूबाजूला हे विदारक वास्तव्य अनुभवतोय की ,घर,जमिन ,जागा,पैसा व इस्टेट साठी सख्खी भावंडे ऐकमेकांचे जीव घेण्यास उठलेली आहे.स्वार्थापोटी बहिणींचा वापर करुन काम झाल्यावर हाकलणारे भाऊ देखील बघितले.तिथे ह्या त्यागीवृत्तीच दर्शन होण म्हणजे अशक्यातून शक्य गोष्ट होय.


विधवा व मेंटली disturbed तुळसा व तिच्या मुलांना ( छोट्या भावाने )श्री.लवू यांनी घरी आणल्यामुळे बाकिची भावंडे नाराज होती. मोठी बहीण श्रीम .सुंदरा हिच्या देखील घरची परिस्थिती बेताची होती.हे विचारी लवू यांच्या लक्षात आल्यामुळे तिच्या मुलांसाठी देखील महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे पाचारण केले.मोठा भाऊ श्री.अंकुश व्यसनी असल्यामुळे एका मुलीचे पालन पोषण देखील त्याच्यासाठी अशक्यप्राय होत.भाचे मंडळीना जवळ केल्याचा राग मोठा भाऊ अंकुश यांना होताच व वेळोवेळी ते तस बोलून देखील दाखवायचे स्वतः व्यसनाधीन असलेल्या अंकुश यांना आपल्या एकुलत्या एक मुलीची जबाबदारी देखील आपला धाकटा भाऊ लवू यांनी स्विकारावी असे मनोमनी वाटत असल्याचे लवू यांनी हेरले होते.  

साऱ्या विश्वाची संरचना ही परस्पर अवलंबित्त्वाच्या तत्वाने बनलेली आहे.त्यामुळे एकटा माणूस आपल्या स्वार्थाने प्रेरीत होऊन कदापि सुखी होऊ शकत नाही.हे सत्य त्यांनी ताडले आणि साऱ्या सचेतन विश्वाशी जोडण्यासाठी प्रज्ञा , शील , करुणा, मैत्री व माणूसकी यांची संगत जोपासली.


      शनिवार दि. १३ जून १९८७ मध्ये श्री.लवू विवाहबद्ध झाल्यावरही त्यांची पत्नी सौ.लिलावती हिने देखील आपल्या पतीचा वारसा कोणतीही नामुष्की न दाखवता चालूच ठेवला व आपल्या मुलांप्रमाणे दोन्हीं भाचे , भाच्या , पुतणी व पुतण्या या सर्वांना ममतेचीच वागणूक दिली.या मुलांना कोणत्याही गोष्टीच्या कमतरतेसाठी कुणाही शेजाऱ्याच्या घरी जावू दिले नाही.हे विशेष ! मोठ्या बहीणीचा मुलगा उदय याला काॕलेज पर्यंतचे शिक्षण दिले , तर मंजू हिला १० वी पर्यंत , राजन ला पूर्ण शिक्षण देऊन स्वतः च्या पायावर उभा राहीपर्यंत आर्थिक व मानसिक असा फार मोठा आधार दिला.तर पुतणी गीता हिला इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण दिले.


    कोणतीही नववधू स्वतःचा संसार थाटण्यासाठी सासरी पदार्पण करीत असते परंतु सौ.लिलावती यांच्यासमोर हे एक मोठे आव्हानच होते. " कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे " या पंक्तीला आपल्या पतीच्या सुखासाठी न्याय द्यावासा वाटला.पतीच्या मागे सक्षमपणे उभी राहून तिने देखील नातलगांप्रति आपल्या पतिने स्विकारलेल्या जबाबदारीला शिरोस्थानी घेऊन विहीत कार्य संपन्न करण्याच मनोमनी ठरविले .स्वतः कोणताही लावजमा केला नाही जे आहे त्यात सूख मानून जीवनप्रवाह चालू ठेवला.


    श्री.लवू या दाम्पत्याला सोनम , रोशन (वामन ) आणि चेतन अशी तीन मुले झाली. शनिवार दि.९ डिसेंबर १९८९ साली मोठी मुलगी सोनम हिचा जन्म

झाला. शनिवार दि.१६ मे १९९२ मध्ये मुलगा रोशन याचा जन्म झाला तर शनिवार दि. १ डिसेंबर १९९८ मध्ये धाकटा मुलगा चेतन याचा जन्म झाला.

आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी ह्या शनिवारी च घडल्या याबद्दल श्री.लवू समाधानी होते.ते सुस्वभावाबरोबराच धार्मिक आणि श्रद्धाळू देखील होते.वयाच्या १५ व्या वर्षापासूनच ते शक्ती , युक्ती आणि भक्ती चे प्रतिक असणाऱ्या मारुतीरायाचे एक निस्सिम भक्त होते.दर शनिवारी उपवास करणे.मारुतीला रूईची पाने व तेल वाहणे व दररोज सकाळी " सूर्य नमस्कार घालून नमन करणे हा त्यांचा दिनक्रम होता.हनुमान भक्तीची ओढ असण्याचे कारण ते याप्रमाणे सांगायचे की , त्यांचे बालमित्र श्री.गुरुनाथ कर्णिक यांचे वडील " अण्णा " हे स्वातंत्र्य सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन घरी आल्यावर दर शनिवारी हा उपक्रम करीत असत.त्यांच्यापासूनच आपण प्रेरित होऊन हनुमत् भक्तीला लागल्याचे ते आजही प्रामाणिकपणे सांगत असत.


   तोपर्यंत भाचा उदय , भाची मंजू , धाकटा भाचा राजन यांनी आपापल्या मनपसंतीने विवाह केले तर पुतणी कु.गिता हिच्या लग्नाचा पूर्ण भार उचलून सन २००९ साली स्वखर्चाने मुंबईला विवाह लावून दिला व थोरला भाऊ अंकुशची नाराजी दूर केली. खऱ्या अर्थाने श्री.लवू यांची त्यांच्या भावंडांप्रति ओढवून घेतलेली जबाबदारी पूर्ण झाली आहे. यावेळी बुद्धाच्या जगविख्यात सुभाषिताची आठवण होते. " मनोपुब्बांगमा धम्मा मनोसेत्था मनोमाया " याचा अर्थ " सर्व परिस्थितीचा उद्गम मनापासून होतो.आज आपण समाजातील विदारकता बघतोय की , या जगात स्वतः च्या प्रपंचात अडकलेला कोणताही व्यक्ती शिपाई सारख्या मामुली सेवेत असताना एवढ असामान्य कार्य करणे आजही कुणाला शक्य होणार नाहीच व आजच्या स्वार्थी जगात आपल्या नातलगांप्रति एवढी माणूसकी दाखविणे कदापि शक्य नाही.


    समाजातील गोर-गरीब , अंध -अपंग , निराधार आणि दुर्लक्षित अशा रंजलेल्या , गांजलेल्या सर्वांप्रति त्यांना विलक्षण जिव्हाळा होता.वेळोप्रसंगी त्यांना आपल्या पुढ्यातील भरलेल ताठ कित्येक भूकेलेल्यांना त्यांनी पुढे केलेल आहे.गरजूंना पत्नीला व मुलांना नकळतपणे पैशाची मदत देखील पुढे केलेली आहे.तर बेकार मजदूरांना रोजगार उपलब्ध करणे व स्वतः ला जोडव्यवसाय म्हणून छोटे-छोटे जळावू व इमारती लाकूड खरेदी व विक्री चे व्यवसाय देखील केलेले आहेत. ज्याच्या दिवसाची सुरूवात कष्टाने आणि रात्रीचा शेवट देखील कष्टानेच व्हायचा त्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी निवांत बसणे शक्य नव्हते .कार्ल मार्क्सच्या सिद्धांतानुसार माणसाच्या जाणीवा त्याचे जीवन निश्चित करीत नसतात , उलट त्याचे सामाजिक जीवनच त्याच्या जाणीवा निश्चित करीत असतात.म्हणूनच त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावरही कष्टाची कामे चालू ठेवून घरातच छोटेसे किराणा मालाचे दुकान थाटले.संत स्वभाव असलेल्या या व्यक्तीला व्यावसायिक नियमावली पाळणे शक्य नव्हते. गाईने चाऱ्याशी मैत्री केली तर काय होईल ? याचा प्रत्यय म्हणजे मासिक उत्त्पनापेक्षा उधारीच वाढत गेली.Lockdown मुळे काम नसल्याचा बहाणा करुन बरेच गिऱ्हाईक उधारीसाठी गंडा घालत होते.काम मिळाल की , पैसे आणून देतो.अस सांगणाऱ्यांना देखील ही व्यक्ती ममतेनेच वागत होती.यावर मुलांनी काही विचारले असता , आपण ज्या परिस्थितीतून वर आलो ती स्थिती कधी विसरायची नसते.अस शांतपणे उत्तर मिळायच.मग सगळेच शांत. काहीजण प्रामाणिकपणे उधारी आणून द्यायचे तर काहीजण उद्या-परवा चे चक्र फिरवत होते.


तरीही हा माणसाने माणूसपण सोडल नाही.तो प्रत्येकाशी सौजन्यानेच वागत राहीला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या बाजारपेठांच वेळापत्रक बदलत होत.त्यामुळे किरकोळ किराणा मालाच्या दुकानात पुरेसा माल दरवेळी उपलब्ध असणे शक्य नव्हते.त्यामुळे वारंवार दैनंदिन वापराच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होत होता.तो टाळण्यासाठी वेंगुर्ला येथील बाजारात त्यांची ये-जा चालू झाली. लोकांच्या गरजा भागविण्यासाठी स्वतः जीव धोक्यात न घालण्यासाठी बाजारात जाणे थांबवा अस घरातून वारंवार सांगितले जात होते तरीही हट्टी स्वभावामुळे ही व्यक्तीने कुणालाही न जुमानता आपल काम चालूच ठेवल.त्यातूनच त्यांना कोरोनाची बाधा झाली.


    आता अशा पूर्णपणे सशक्त व्यक्तीला बाधा होणे अवघड जरी वाटत असले तरी सत्य नाकारता येत नव्हते.घर seal करण्यात आल्याच्या बातमीने त्यांचे बरेच सगसोयरे व मित्र श्री.बाबुराव मठकर अस्वस्थ झाले. श्री.बाबुराव मठकर व त्यांच्या सौ. नियमितपणे घरी येऊन चौकशी करीत होते तर मित्र श्री.एन् .पी.मठकर फोनवरून ! 


कमाल म्हणजे ज्या व्यक्तीच्या माणुसकीमुळे " काका " उधार सामान द्या. गरजेला पैसे द्या.यापैकी कुणीही एकदाच्या देखील चौकशी साठी घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नव्हते व त्यांनी हाक दिली तर " ओ " देखील देत नव्हते ! ! ! ! किती कृतघ्न ही उधारीच जीवन जगणारी माणस ? अरे ठराविक अंतरावर राहून देखील एक हाक देऊ शकला असता.....समोरून नाही तर फोनवरून देखील चौकशी करु शकला असता ....! 

पण , अस काहीच झाल नाही.कदाचित या व्यक्तीला मानसिक बळ मिळाल असत ! 


धर्मकीर्ती हा महान तत्त्वज्ञ म्हणतो , " , कोणतीही एक वस्तू एकातून नव्हे , तर समग्र कारणसमुच्चयातून संभवते.अनेक कारणे एकत्रित होतात , तेव्हा एका परिणामाची निर्मिती होते.कधीच आजारी न पडलेली , कुणालाही न घाबरणारी आणि आव्हानाला प्रतिआव्हान देणारी ही व्यक्ती.शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारख जगाव !! अशी व्याघ्रगर्जना करणाऱ्या महामानव डाॕ .बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेला वास्तवात शिरोस्थानी आचरणात आणणारी ही व्यक्ती आज मनातून खचत चालली होती.या जगात कुणीच कुणाच नसत या उक्तीचा आस्वाद घेत होती..प्रत्येक स्वार्थी माणसाने या संतआत्म्याचा केवळ आपल्या स्वार्थासाठी वापर केलेला होता.याचा प्रत्यय त्यांना येत होता.


ज्या ज्या व्यक्तींनी यांच्यातील " करुणा " अनुभवलेली होती , माणुसकीच दर्शन घेतल होत , त्यासर्वांनी या व्यक्तीला आजारातून बरे होण्यासाठी शेकडो हात ईश्वरचरणी जोडले होते.यावेळी अधिक उपचारासाठी त्यांना वेंगुर्ला येथे हलविण्यात आले होते.त्यामुळे घरी कुणीच नव्हते व घर कुलूप लावलेल होत.तर अशातच माणुसकीला काळीमा फासणारी एक दृश्य नजरेस आल ! ते म्हणजे १५ मे च्या वादळात सर्वत्र वीज यंत्रणा खोळंबली होती.तब्बल ४ ते ५ दिवस लाईट नव्हती.अशातच एक विघ्नसंतोषी आणि दृष्टप्रवृत्तीने त्यांच्या घरातील दुकानाशेजारील गेटकडे अर्धा कापलेला लिंबू , अर्धी भाजलेली लाल मिरची व अर्धा भाजलेला कांदा अस रसायन एकत्रितपणे पायरीकडे ठेवलेल होत.याला " करणी" असे म्हटले जाते.


माझे मामा श्री.लवू हे फार श्रद्धाळू आणि धार्मिक स्वभावाचे असले तरी आम्ही पूर्णपणे अंधश्रद्धेचे विरोधक आहोत.या गोष्टींवर आमचा यासाठी विश्वास नाही.कारण , " मारनेवाले से बचानेवाला हमेशा बडा ही होता है ! " आणि बचानेवाला " हनुमान " याची ते गेली ५० वर्षे उपासना करीत होते.अनेक संकटातून त्यांना " बजरंगबली " ने तारल असल्याची कित्येक उदाहरणे ते आम्हांला देत असत.आपल्या आयुष्यातील प्रत्येक शुभकार्य हे हनुमत्इच्छेने सिद्ध होत आलेल आहे.त्यामुळे घोर आजारात ICU असताना देखील त्यांनी शनिवार तोडला नाही.हे विशेष !!! कदाचित या पंचतत्त्वात विलीन होण्यासाठी ते शनिवार चीच वाट बघत असावेत आणि अगदी त्यांच्या इच्छेनुसार शनिवार दि.२९ मे २०२१ रोजी ते देवाज्ञा झाले.


   धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष यावर जास्त विचार न करता त्यांच्या मृत्यूसाठी ज्या नीच प्रवृत्तीने " करणी " करुन आपला जो नामर्दपणा आणि अमाणुसकी निदर्शनास आणली त्याचा इथे उल्लेख केवळ यासाठी करावा लागतोय .....की , निव्वळ व्यक्तीगत प्रज्ञेने या दुःखाच निराकरण आम्हांला अशक्य आहे. तथागत भगवान बुद्धाच्या शिकवणूकीनुसार आपण या जगात दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही , दुःख निरोधाचा किमान सल्ला देऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या हितासाठी शुभेच्छा देखील देऊ शकत नाही तर निदान त्याच्या दुःखास कोणत्याही प्रकारे कारणीभूत ठरु नये.माणसाचे दुःख हे त्याच्या नैसर्गिक अवस्थेपेक्षा त्याच्या सामाजिक अवस्थेची निर्मिती आहे. ही नियती आहे.इथे जे आपण पेरणार आहोत तेच उगवेल !!! काटे पेरून सुमने उगवत नसतात !! 


   देव-देवस्की आणि करणी यावर आमचा मुळीच विश्वास नाही.आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे हतबल झालेल आहे.या जीवघेण्या संसर्गजन्य रोगावर अद्यापही " रामबाण " औषध उपलब्ध नाही.ही फारमोठी शोकांतिका आणि विज्ञानाबरोबरच समाजातील बाबा-बुवांना एक जागतिक आव्हान आहे.जर या करणीने तुम्हाला कोरोनावर मात मिळवून दाखवा.लाखो करोडो लोक मरताहेत. कित्येक कुटुंबे निराधार आणि असहाय्य झालेली आहेत.त्यांना तुमच्या " जादुटोणा " व " करणी " तून संजीवनी द्या.जगविख्यात अशी तुमची ख्याती होऊन संपूर्ण विश्वातील आणि ब्रम्हांडातील लोक तुमच्या पायावर लोटांगणा घालीत तुमच घर गाठतील !!! आणि तुम्ही या विश्वामध्ये " महासत्ताक " बनाल याबद्दल खात्री बाळगा.


   श्री.लवू यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पश्चात थोरली मुलगी सोनम हि विवाहित असून special D.ed करुन MENTAL RETIRED SCHOOL ला मुंबईला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.तर दुसरा मुलगा रोशन (वामन ) Finolex ला Mechanical Engineers म्हणून degree holder आहे तर धाकटा चेतनने आताच्च PHARMACY complete केलल आहे.श्री.लवू मठकर यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना पदोपदी मानसिक बळ , चांगले आरोग्य, समृद्धी , यश , किर्ती आणि वडीलांप्रमाणे सत्आचरण देवो.ही ईश्वरचरणी प्रार्थना.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational