STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational

4  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational

चुडामणी

चुडामणी

1 min
461

कोणी तिला वेडी म्हणायचं तर कोणी खुळी... ती फिरत होती रस्त्यावर पडलेले झेंडे वेचत... कालच प्रजासत्ताक दिन साजरा झाला होता... सापडलाच एखादा झेंडा तर उचलून खोचायची केसांच्या बुचड्यात... भारतमातेच्या काळ्याभोर कुंतलात शोभावा सुंदर चुडामणी तसे ते तिरंगे झेंडे शोभत होते तिच्या मळकट केसांच्या आंबाड्यात.


काही वर्षांपूर्वी, तिच्या लग्नानंतर सहा महिन्यातच परतलं होतं तिचं कुंकू... तिरंग्यात लपेटून कायमच...!!! शत्रूच्या गोटात शिरून चार पाच आतंकवाद्यांचा फडशा पाडल्यानंतर शत्रूच्या गोळीने त्याच्या काळजाचा ठाव घेतला होता आणि तो देशासाठी शहीद झाला होता.


तेव्हापासून ती खुळी अशीच फिरतेय रस्त्यावर वेड्यासारखी...! स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी लोकांनी विकत घेतलेले झेंडे दुसऱ्या दिवशी पडलेले असतात रस्त्यावर किंवा सापडतात कचऱ्याच्या ढिगात... तेच वेचत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy