Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Nilesh Bamne

Inspirational


1.9  

Nilesh Bamne

Inspirational


बसस्टॉप ( एक दीर्घ कथा )

बसस्टॉप ( एक दीर्घ कथा )

46 mins 2.4K 46 mins 2.4K


‘’जवळपास वर्षभर हा माझ्या मागे लागलाय, नचूकता मी यायच्या वेळेवर रोज बस्टॉपवर माझी वाट पाहत उभा असलेला दिसतो. मी बसमध्ये चढले की माझ्या मागून चढातो, मी बस सोडली की तो ही सोडतो, माझ्या गोर्‍या रंगावर आणि मादक शरिरावर भुळ्लाय आणि काय ? मी चुकून त्याच्या नजरेला नजर दिली तर मुलींसारखी नजर चोरतो. बसमध्ये माझ्या बाजुला येऊन उभा राहिला तर मला त्याचा धक्का लागून मी त्याला काही बोलणार नाही याची पूर्ण काळ्जी घेतो. बसमध्ये कोण भेटला तर बोलताना मला प्रभावित कराण्यासाठी लाखाच्या वार्ता करतो. कोणी तरी मोठा विद्वान व्यक्ती असल्याचा आव आणतो. एखाद्या चॉकलेट हिरो सारखा दिसणारा, जीन्स, टी-शर्ट परिधान कराणारा, खांद्यापर्यंत केस वाढविलेला, चेर्‍यावर पावडर थापणारा, दाढी मिश्या न ठेवणारा, सडापातल बांधा असणारा आणि बोलताना अरे! तूरे ! करणारा विद्वान कसा असू शकतो ? मुर्ख कुठ्ला ! त्याला वाटतय मी त्याच्या प्रेमात पडलेय ! त्याच्या सारखे ह्जार जण माझ्या मागे लागलेत ! मी त्यांना भिक नाही घातली तर हा किस खेत की मुळी आहे ? एक नंबर डरपोक आहे. तस नसत तर हिंमत करून मला काय ते एकदाच विचारून मोकळा झाला असता. रोज बसस्टॉपवर अस तासनतास माझी वाट पाह्त उभा राहिला नसता. बघ ! आता माझ्यापासून किती दूर उभा राहून माझ्याकडे एक टक पाहतोय वेड्यासारखा ! अशा भ्याड मुलाच्या मी प्रेमात पडणार शक्य तरी आहे का ? मला जर कोणी याच्या समोर छेडल तर हा मान खाली घालून चुपचाप निघून जाईल. मला कळत नाही माझ्यापेक्षाही सुंदर दिसणार्‍या मुली स्वतःहून त्याला चिपकण्याचा प्रयत्न का करतात ? त्या बघ ! त्या दोघी कश्या त्याच्या जवळ उभ्या रहिल्यात एक उजविकडे आणि एक डाविकडे बाजूला जागा नाही म्हणून दुसर्‍या त्या दोघी एक पुढे आणि एक मागे उभी राहिलेय ! आता बघ ! मी बसमध्ये चढल्याखेरीज हा बसमध्ये चढणार नाही आणि तो चढल्याखेरीज त्या चौघी चढणार नाहीत, पाहिलस आज तू माझ्या सोबत आहेस म्हणून रिक्षाने गेला आणि बरोबर त्या दोघींनाही घेऊन गेला. मला नाही कधी म्हणाला रिक्षाने येतेस का ? चल ! कविता आता आपण पण रिक्षाने जाऊया !’’ कविताने रिक्षाला हात दाखाविला रिक्षा थांबताच दोघीही रिक्षात बसताच कविता म्ह्णाली,’’प्रतिभा तू मगापासून ज्याच्याबद्दल बोलत होतीस त्याच नाव तरी तुला माहीत आहे का ? तू ओळ्खतेस त्याला ? त्यावर प्रतिभा किंचित नाराजीच्या स्वरात म्हणाली,’’ नाही ना ? मला त्याच नावही माहीत नाही आणि मी त्याला ओळखतही नाही ! प्रतिभा तू त्याला ओळखत नसताना त्याच्याबद्दलच तुझ मत कस काय बनवू शकतेस ? मला खात्री आहे उद्या तू जर त्याच्या समोर तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडलास तर तो नाही म्हणेल ! त्यावर प्रतिभा काविताला म्हणाली तुला वेड लागलय ! अस कस होऊ शकत ? जो गेल्या वर्षभर माझ्या मागे लागलाय त्याच्यासमोर मी स्वतः हून प्रेमाचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही तो नाही म्हणेल हे कस शक्य आहे ? हे केवळ अशक्यच आहे ? त्यावर कविता आत्मविश्वासाने प्रतिभाला म्हणाली ,’’ लाव पैंज लाव तू उद्याच त्याच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवायचा, त्याने जर तुझा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला तर तू त्याचा नाद सोडायचा आणि त्याने जर तुझ्या प्रेमाचा स्विकार केला तर मी आयुष्यभर मी तू बोललेल ऐकत राहिण ! प्रतिभान कविताची पैंज मान्य केली आणि रिक्षामधून उतरताच दोघी दोन विरुध्द दिशांना निघून गेल्या.

दुसर्‍या दिवशी बसस्टॉपवर त्या दोघी एकत्रच आल्या, तो प्रतिभाची वाट पाह्त बसस्टॉपवर उभा होता. प्रतिभा हिंमत करून त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली,’’ मला जरा तुझ्याशी बोलायचय जरा बाजुला येता का ? त्याने मानेनेच होकार दिला. ती त्याला बसस्टॉपपासून दूर घेऊन जात म्हणाली,’’ मला माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तू माझी वाट पाह्त बसस्टॉपवर उभा असतो. मला ही तुंम्ही आवडता त्याचा हात हातात घेत ती ‘’ आय लव्ह यू’ म्ह्णताच तिचा हात हातातून झटकत तो म्हणाला,’’ बट ! आय हेट यू ! क्षणभर प्रतिभाला काय कराव आणि काय करू नये तेच कळ्त नव्ह्त. ती भानावर येईपर्यत तो रिक्षा पकडून निघूनही गेला. प्रतिभाच्या खांद्यावर कविताचा हात होता. तो हात न उचलताच कविता प्रतिभाला म्हणाली,’’प्रतिभा तू पैंज हारलेस आता तुला त्याचा नाद सोडावाच लागेल. आता तू म्हणशिल मला त्याचा नाद कधीही लागला नव्ह्ता ते खर ही आहे पण तो खर्‍या तूला आता लागेल ! त्यावर प्रतिभाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याचा विचार करत करतच ती तिच्या घरीही पोह्चली. काही केल्या तो तिच्या डोक्यातून जात नव्ह्ता. तो मला नाही म्हणूच कसा शकतो ? हा प्रश्न ती वारंवार स्वतःला विचारून त्रास करून घेत होती. मनातल्या मनात त्याला शिव्याही देत होती. साला ! दिड दमडीचा ! मला नाही म्ह्णाला ! गेले वर्षभर माझ्या मागे कुत्र्यासारखा शेपूट हालवत फिरत होता आणि आता ऐन वेळी धोका दिला साल्याने ! त्या कवितासमोर माझा पोपट केला. आता आयुष्यभर त्या कवितासमोर मान खाली घालून उभ राहवं लागणार आहे. पण ! आमच्या शुल्लक पैंजेसाठी कवितान आयुष्यभर माझं ऐकण्याच मान्य केल असल तरी ती जिंकणार याची तिला पूर्ण खात्री असल्याच तिच्या बोलण्यावरून तरी स्पष्ट जाणवत होत. मी हारल्यास तिन माझ्याकडून त्याच्या नादाला न लागण्याच वचन घेतल. याचा अर्थ मी त्याच्या नादाला लागण कविताला मान्य नव्ह्त. पण का ? कविता तर दिसायला माझ्यापेक्षा सुंदर आहे श्रीमंतही आहे उच्चशिक्षीतही आहे आणि नोकरीलाही चांगली आहे. तिला या सडकछाप माणसामध्ये काय रस असणार ? सांगता येत नाही ! त्याच्या आजुबाजूला घुटमलणारया पैकी ही ही एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी आणि तिची मैत्री चार – पाच महिन्यांची मी तरी तिला तशी नीट कोठे ओळखते ? तिन माझ्या नकळ्त माझ्या सोबत राहूनच तर माझा काटा काढला नाही ना ? प्रतिभाच डोक काम करेनास झालयं ! कविता म्हणत होती ते बरोबरच होत वर्षभर मला त्याचा नाद लागला नव्ह्ता पण आता मला त्याचा नाद लागलाय !

यापुढे कवितासोबत त्याच्या बद्दल बोलण पूर्णपणे बंद ! आता तो काय करतो ते पाहू या ! दुसर्‍या दिवशी त्या दोघी एकत्रच बसस्टॉपवर आल्या पण ! तो दिसला नाही. तो न दिसल्यामुळे प्रतिभा किंचित कासाविस झाली. पण ! कविता समोर काहीच बोलली नाही. घरी गेल्यावर मात्र तिच मन अधिकच बेचैन झाल. त्याला पाह्ण्याची तिलाही किती सवय झाली होती हे तिच्या लक्षात आल. ती मनात पुटपुटली त्याचा एखादा फोटो जवळ असता तर किती बर झाल असत. फोटो सोडा आपल्याला तर त्याच साध नावही माहीत नाही. मी पण कीती मुर्ख आहे वर्षभरात त्याच साध नावही जाणून घेतल नाही. पण ! तसा प्रयत्न आता करावा लागेल. त्याच्या बाजूला ज्या कोंबडया उभ्या असतात त्यातीलच एखादीला पकडून बोलत कराव लागेल ! त्यानंतर काही दिवसांनी प्रतिभा आणि कविता सोबत असताना तो त्यांना सामोरा आला कविता आणि तो एकामेकांकडे ज्या नजरेने पाह्त होते ते पाह्ता प्रतिभाच्या मनात शंकेची पाल पुन्हा चुकचुकली ! त्या दोघांमध्ये काहीतरी मोठी भानगड आहे हे प्रतिभान अचूक हेरल आणि त्याच्या बाबतीत थोडा वेगळा मार्ग अवलंबण्याचा तिने निर्णय घेतला.

काही दिवसानंतर जेंव्हा तो प्रतिभाला बसस्टॉपवर एकटाच उभा असताना दिसला तेंव्हा त्याला पुन्हा बाजुला घेत प्रतिभा म्हणली,’’ मला माफ कर ! माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, मला माफ करा प्लीज ! त्यावर तो किंचित हसत म्हणाला,’’ ठिक आहे प्रतिभा ! त्यावर प्रतिभा म्हणाली,’’तुला माझ नाव माहीत आहे ? त्यावर तो म्हणाला,’’तुझच काय तुझ्या घरातील सर्वांचीच नावे मला माहीत आहेत. तुझ्या मोठ्या भावाच, बहीणीच, आई- वडीलांची सर्वांची नावे मला माहीत आहेत. त्यावर प्रतिभा चटकण म्हणाली पण ! मला तुझ नाव माहीत नाही. माझ नाव विजय जाधव त्याने तिच्या हातात एक विझीटींग कार्ड दिलं ज्यावरून तो पत्रकार आणि लेखक असल्याच लक्षात येत होत. त्याच नाव कळताच त्याचे अनेक लेख तिने वर्तमानपत्रात वाचल्याचे प्रतिभाच्या लक्षात आले. तो तिच्याशी बोलत होता या संधीचा फायदा उचलत तिने त्याची शक्य तेवढी सर्व माहीती काढून घेण्याचा प्रयत्न केला. तो निघून गेल्यावरही प्रतिभा बसस्टॉपवर थांबली कारण तिला कविताला गाटायच होत. कविता बसस्टॉपवर येताच प्रतिभा तिला म्हणाली,’’ त्याच नाव विजय जाधव आहे तो एक चांगला पत्रकार आणि लेखक आहे. चेहर्‍यावरून वाटत नाही ना तो लेखक असेल अस ? त्यावर रागावून कविता म्हणाली,’’ चेहर्‍यावरून तो काहीच वाटत नसला तरी त्याच्या चेहर्‍यामागेच दडल असेल बरच काही कदाचित ! त्यादिवशी प्रतिभान विजयने तिला दिलेल्या कार्डवरील मोबाईल नंबर आपल्या मोबाईलवरून लावण्याचा प्रयत्न केला पण तो नंबर अस्तित्वातच नव्हता. आता त्याच निदान नाव तरी कळल्याचा आनंद प्रतिभाच्या चेहर्‍यावर झळकत होता. पण ! आता प्रतिभाच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला,’’ त्याच माझ्यावर प्रेम नव्हत तर तो माझ्या मागे का लागला होता ? प्रतिभाला आता या प्रश्नाच उत्तर शोधायच होत. पण कस ? आता तो पुन्हा भेटेल तेंव्हा त्याला स्पष्टच विचारू की !

त्यानंतर काही दिवसानी विजय एकटाच बसस्टॉपवर उभा होता. त्या संधीचा फायदा उचलत प्रतिभा हळूच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहीली आणि गोड आवाजात म्हणाली,’’ राग येणार नसेल तर एक विचारू ? त्यावर त्याने मानेनेच होकार देताच ती म्हणाली,’’ तुला माझ्यात काही रस नव्ह्ता तर मग माझ्या मागे का लागला होतात ? त्यावर विजय म्हणाला,’’ माझ्या कथेला एक नवीन नायिका ह्वी होती . तुझी मी माझ्या कथेची नवीन नायिका म्हणून निवड केली होती. तुझ चालणं, बोलणं, ह्सणं, रूसणं, लाजणं आणि रडणं ही सारच मला माझ्या नायिकेत उतरवावयाच होत म्हणून ! तुंम्ही कथा ही लिहता ? हो शाळेत असल्यापासून ! फक्त लिहता की प्रकाशितही करता ? राज्यस्तरीय कथास्पर्धांमध्ये माझ्या कथांना अनेक बक्षीस मिळालेत. प्रतिभाला क्षणभर काय बोलाव आणि काय नाही तेच कळत नव्ह्त. पण स्वतःला सावरत प्रतिभा म्ह्णाली,’ मग ! भेटली का तुला तुझ्या कथेतील नायिका माझ्यात ? त्यावर विजय म्हणाला,’ जिला एक वर्षात एक माणूस ओळखता येत नाही तर ती लोकांच्या मनात काय चाललय हे कस काय ओळाखणार ? लोकांच्या वेदना ज्याला क्षणात ओळखता येतात तोच खरा माणूस. एखाद्याची वेदना कळायला जर डॉक्टरला एक वर्ष लागला तर डॉक्टरला कदाचित त्याच्यावर उपचार करण्याची गरजच भासणार नाही. मी तुझ्या मागे वेडा झालोय हे पाहताना तुला आनंद होत होता ना ? एक असूरी आनंद ज्यामुळे तू मला खेळण समजून माझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत होतीस. मी तुझ्यासाठी रोज खर्च करत असलेल्या तासांची किंमत तुला माहीत नव्हती. ती जर तुला माहीत असती तर तुला कळल असत मी तुझ्यावर काय उधळलय ते ? इतक्यात बस येताच तो तिला बाय करून निघून गेल्यावर प्रतिभा स्वतःशिच म्हणाली,’’ आता कळतय कविता का म्हणाली की त्याच्या नादाला लागू नकोस ? आता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्‍या त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.

रविवारचा दिवस होता. प्रतिभा जूनी पुस्तके चाळ्त होती, ज्यात तिच्या दादाची ही बरीच जूनी पुस्तके होती. त्या पुस्तकात तिला एक गोष्टीच जुनं पुस्तक सापडल. विक्रम- वेताळाच्या गोष्टीच ते पुस्तक होत. त्या पुस्तकात तिला एक जुना फोटोही सापडला त्या फोटोत तिच्या दादासोबत जो मुलगा होता तो हुबेहुब विजयसारखा दिसत होता. पण एकदा खात्री करून घ्यावी म्ह्णून ती तो फोटो आपल्या दादाकडे घेऊन गेली त्याला तो दाखवत तिने त्याला प्रश्न विचारला,’’दादा या फोटोत हा तुझ्याबरोबर मुलगा कोण आहे ? त्यावर तिचा दादा तिला म्ह्णाला,’’ हा माझा जिवलग आणि शाळेय मित्र विजय जाधव आहे. आता हा एक मोठा लेखक झालाय बर ! बरीच वर्षे झाली मला भेटला नाही. प्रवासात दिसला होता एक दोनदा पण आमची भेट नाही झाली. आता तो मला ओळ्ख दाखवेल की नाही देव जाणे ! शाळेत असताना आंम्ही दोघे एकाच बाकावर बसायचो, एकत्रच डबा खायचो त्याची आणि माझी मैत्री कधीच एकमेकांना काही देण्या- घेण्या पुरती मर्यादित नव्ह्ती. वर्गातील सर्वात शांत विद्यार्थी म्ह्णून त्याची ख्याती होती. वर्गात तो इतका साधा वागत असे की कोणी त्याच्या एका गालावर चापट मारली तर त्याने दुसरा गाल पुढे करावा इतका. पण त्याचात तो साधेपणा त्याच्या स्वभावामुळे आलेला नव्हता तो आला होता त्याच्या गरीबीमुळे. तो इतका गरीब होता की त्याला कदाचित दोन वेळेच जेवणही पोटभर मिळत नसावं. पण त्याने आपल्या गरीबीचं भांडवल कधीच केल नाही. परिस्थितीशी झगडत नेहमीच त्याने तिच्यावर स्वार होण्याचाच प्रयत्न केला. मी त्याच्या या प्रयत्नांचा शाळेतील एकमेव साक्षीदार होतो कदाचित तेंव्हा. त्याच्या त्या वेळच्या खडतर जीवनावरही एखाद पुस्तक लिहल जावू शकत इतक ! कदाचित त्याने तस ते लिहलही असेल. असो माझा आणि त्याचा संबंध आंम्ही शाळेत असेपर्यतच आला. शाळा संपल्यानंतर त्याच्या आयुष्यात आणखी काय काय घडल असेल याची तर मी कल्पनाही करू शकत नाही. शाळेच्या शेवटच्या दिवशी मी जबरदस्तीने त्याच्या सोबत हा फोटो काढला होता. हा फाटो मी जपून ठेवला पण त्याने कदाचित ठेवलाही नसेल कारण शाळा संपल्यानंतर तो माझ्या संपर्कात कधीच आला नाही. तो मोठा लेखक वगैरे झालाय हे ही मला तेंव्हा माहीत जेंव्हा त्याच्या एका पुस्तक प्रकाशना संदर्भातील बातमी मी टी.व्ही वर पाहिली.

पंचवीस एक वर्षापूर्वी विजय आणि मी एकाच सरकारी शाळेत तिसर्या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा एक प्रसंग आठवून मला आजही ह्सू येत. आमच्या त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत येताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात येत असे. त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण त्या शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावता शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहूतेक मुलं खोडकर होती. त्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता.

आमच्याच वर्गात विनिता नावाची एक जाड-जुड, गोरी-गोमटी, गोड आवाज असणारी पण चपळ आणि निडर मुलगी होती. ती या शाळेत जूनी आणि हुशार असल्यामुळे बाईंनी तिला वर्गप्रमुख केल होत. ती वर्गप्रमुख असल्यामुळे वर्गातील सर्वच मुल तिला घाबरून रहात असत. त्याचा कदाचित तिला गर्व झालेला असावा. वर्गात तिच्या मित्रांचा एक घोळ्काही होता. ती त्या घोळ्क्याची प्रमुख होती. त्या शाळेत दुपारच्या जेवनाच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर सर्व मुलं डबा धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी शाळेतील सार्वजनिक नळावर जात. पण विजय जात नसे तो त्याचा सवयीचा भाग होता. तो रोजच शाळेत येताना त्याच्या सोबत एक मोठी पाण्याची बाटली आणत असे. एक दिवस काय झाले विनिता आणि तिच्या घोळक्याने दुपारच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर शाळेतील सार्वजनिक नळावर न जाता विजयची पाण्याची बाटली त्याला न विचारताच हिसकावून घेतली आणि त्यातील पाणी पिऊन ती रिकामी झाल्यावर त्याच्या समोरच आदळली. त्या गोष्टीचा विजयला भयंकर राग आला तो शाळेची शिस्त मोडू शकत नव्ह्ता आणि त्यांना शिक्षाही करू शकत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने तो दप्तर काखेला लावून रडत - रडत सरळ त्याच्या घरीच निघून गेला. त्याला आचानक रडत घरी आलेल पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटल कारण शाळेतून मधल्या सुट्टीत घरी येण त्याला माहीतच नव्ह्त. आईने रडत शाळेतून मधल्या सुट्टीतच घरी येण्याच कारण विचारल असता त्याने झालेला सर्व प्रकार कथन केला.

विजयची आई स्वतः अशिक्षित असली तरी ती आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती. विजयची आई विजयला पुन्हा शाळेत घेऊन आली. त्यावेळी कांबळे आडनावाच्या शिक्षिका आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्या मुलाच नावही विजयच होत आणि तो ही विजयच्याच वयाचा होता. त्याचबरोबर विजय हुशारही होता त्यामुळे सहाजिकच त्या बाईच्या मनात त्याच्याबद्दल ओलावा होता. विजयच्या आईने तक्रार केल्याबरोबर बाईनी प्रतिभाला जागेवर उभ केल आणि विचारल तू याच्या बाटलीतील पाणी प्यायलीस ? विनिताने मानेनेच होकार दिल्यावर बाईनी तिला हात पुढे करायला सांगून तिच्या नाजुक हातावर चार-पाच फटके मारले आणि पुन्हा असं न करण्याची समज दिली त्यानंतर आमच्या वर्गातील कोणीच कधीच विजयच्या वाटेला गेल नाही. पट्टीचा मार बसल्यामुळे यापूर्वी कधीही मार न खाल्लेल्या विनिताला काही केल्या रडू आवरत नव्हत. तिला अखंड रडताना पाहून विजयचा राग शांत झाला पण राग शांत झाल्यानंतर तिला रडताना पाहून त्याच्यातला ह्ळवा माणूस अचानक जागा झाला आणि आपण तक्रार केल्यामुळे तिला इतका मार बसला आपण तक्रार केलीच नसती तर आपल्याला हे टाळ्ता आलं असत. असा विचार तो स्वतःशीच करू लागला. विजय लहानपणापासूनचा स्वभाव होता. त्याने केलेली चूक जर त्याच्या लक्षात आली तर त्या चूकीबद्दल तो स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेत असे. आजही त्याचा तो स्वभाव बदललेला नसावा. विनिताला एका मुलीला आपल्यामुळे त्रास झाला याची शिक्षा म्ह्णून विजयने शाळेत असे पर्यत वर्गातील एकाही मुलीशी कधीच मैत्री केली नाही. आजही जगाला त्याची शाळेतील फक्त एकच मैत्रिण माहीत आहे ती म्ह्णजे विनिता... त्यानंतर विजय आणि विनिता यांच्या नात्याने काय वळ्ण घेतल ते त्यांनाच माहित पण या सर्व प्रकारामुळेच आंम्ही सर्व मुल मात्र त्याचे मित्र झालो होतो. विजय सहसा कोणाशी बोलत नसे पण जर चुकून कोणी त्याला बोलता केला तर तो त्याचा गुलाम होत असे. विजयचा एक विशेष गुण होता निदान शाळेत असे पर्यत तरी तो कधीच खोट बोलत नसे. त्याने जर एखादी चुकी केलीच तर त्याची शिक्षा भोगण्यासही तो नेहमीच तत्पर असे. तो चित्रकार, वकील अथवा इंजिनिअर झाला असता तर मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नसते पण लेखक झाला याचे नक्कीच आश्चर्य वाटते आहे. त्यावर प्रतिभाने का ? असा प्रश्न विचारताच प्रतिभाचा दादा म्ह्णाला,’’ तो तिसरीत असतानाही उत्तम चित्रे काढत असे, गणितात तो भयंकर हुशार होता आणि विज्ञान त्याचा आवडता विषय होता. शाळेत असताना. चौथीत आंम्ही आताच्या नावाजलेल्या गुरूकुल या शाळेत प्रवेश घेतला तेंव्हा आमच्या चौथीच्या वर्गशिक्षीका देवरे मॅडम त्याच्या बाबांच्या परिचयाच्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्याच्याकडे विशेष लक्ष असे. त्यावेळी त्याने या खाजगी शाळेत प्रवेश घेतला अर्थात त्यावेळ्ची त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बरी होती. चौथी, पाचवीत असताना त्याचा वर्गात दहाच्या आतच नंबर आला होता. पण सहावीला गेल्यावर तो असामान्य आणि इतरांपेक्षा वेगळा असल्याची लक्षणे दिसू लागली होती ते त्यावेळी कोणी हेरल होत की नाही ते देवच जाणे. आंम्ही सहावीत असताना विजय वर्गात दरवाजा जवळच्या पहिल्या बाकावर पहिला बसायचा आणि पलिकडील शेवटच्या रांगेतील पहिल्या बाकावर विनिता बसायची. विनिता आणि विजय या दोघांमध्ये एक अदृष्य स्पर्धा चालत असे. त्या दोघांचीही एकमेकांच्या प्रगतीवर हालचालींवर बारीक नजर असे. त्यावेळच्या आमच्या वर्ग शिक्षिका सावंत मॅडम होत्या. त्यांचा हसरा चेहरा आजही आठविला तरी प्रसन्न झाल्यासारखं वाटत. आज त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी त्यांच लग्न झाल्याच मागे कधी तरी कळल होत. ते मुख्याध्यापकच तेंव्हा ते त्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांनी काही कामा निमित्त विजयला वर्गाबाहेर बोलावल त्यावेळी मधल्या सुट्टीनंतरचा सांवंत मॅडमचा पहिला तास सुरू होता. दुसर्‍या एका शिक्षकांनीच बोलावल म्ह्णून गडबडीत विजय मॅडमची परवानगी न काढताच वर्गाच्या बाहेर गेला . माघारी आल्यावर सावंत मॅडमनी विजयला परवानगी न काढता वर्गाबाहेर गेल्याबद्द्ल शिक्षा म्ह्णून हातावर पट्टीने दोन-चार फटके मारले. त्याच्या आयुष्यात ती त्याला शाळेत मिळालेली पहिली आणि शेवटचीच शिक्षा होती कदाचित. त्या फटक्यांच्या वेदना त्याच्या हाताला नाही तर सरळ मनालाच जाणवत होत्या कदाचित. त्याच्या रडण्याचा आवाज येत नव्हता पण त्याच्या डोळ्यातून घळाघळा वाहणार्‍या अश्रूंनी त्याचा शर्ट मात्र ओला झाला होता. त्यानंतर आलेल्या शिक्षकांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता तो काहीच बोलला नाही शेवटच्या तासाला सावंत मॅडम पुन्हा वर्गात आल्या तेंव्हा त्याला रडताना पाहून सावंत मॅडमनाही आश्चर्य वाटल त्यांनी त्याला जवळ बोलावल आणि आपल्या हातातील रूमालाने त्यांनी त्याचे डोळे फुसले आणि त्याच्या पाटीवरून प्रेमाने हात फिरवत त्याला शांत केले. त्यानंतर त्याचे रडणे थांबले. त्याच दिवशी तो सावंत मॅडमचा विशेष आवडता विद्यार्थी ठरला आणि लवकरच तो खूप हुशार असल्याचेही मॅडमच्या लक्षात आले. आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी आंम्हाला एकदा इंग्रजी शब्द पाट करून यायला सांगितले होते. वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांचेही शब्द पाठ नव्ह्ते. त्याला त्याबद्द्ल शिक्षकांनी चार-पाच फटकेही मारले असे दहा बारा हुशार विद्यार्थ्यांनी मार खाल्यावर सरांच लक्ष बेफीकीर असलेल्या विजयवर गेल. त्यांनी त्याला उभ केल आणि शब्द विचारले त्यावर तो पोपटासारखा बोलल्यावर त्या सरांना आश्चर्य वाटल आणि आपण वर्गातील एक हुशार विद्यार्थी शोधल्याचा त्यांना साक्षात्कारही झाला. त्या शिक्षकांना माहित नव्हत विजय हा नेहमी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्येच रमणारा असामान्य विद्यार्थीं होता. त्यांनी लगेच त्याच्यावर वर्गातील मुलांचा इंग्रजीचा गृहपाठ तपासण्याची जबाबदारी टाकली ती त्याने मनापासून कधीच पार पाडली नाही. आंम्हाला एक मराठी विषय शिकवायला शिक्षक होते त्यांनी आंम्हाला इंग्रजीसारखे मराठी जलद कसे लिहायचे ते शिकविले पण ते आत्मसात फक्त विजयनेच केले असावे कारण त्यानंतर त्याने लिहलेले त्याच्या व्यतिरीक्त कोणालाच वाचता येत नसे, अर्थात तसे तो तेच लिहीत असे जे इतरांनी वाचाव अशी त्याची इच्छा नसे. मी आता ही खात्रीने सांगू शकतो त्याने हाताने लिहलेले तो कोणाला वचायलाही देत नसणार. त्यांचे अक्षर बर्‍यापैकी वळदार आणि ज्याला सुंदर म्ह्णता येईल असं होत, पण त्याने जलद लिहण्याची सवयच कायम ठेवली कदाचित आपल्याला भविष्यात लेखक व्हायचय हे त्याने तेंव्हाच मनाशी पक्क करून टाकल होत. आमच्या शाळेतील हिंदीचे शिक्षक एक अजब रसायन होते ते एखादा प्रश्न विचारायचे आणि एखादया विद्यार्थ्यांला त्या प्रश्नाच उत्तर नाही आले तर त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणार्‍या विद्यार्थ्यांला ते त्या उत्तर न आलेल्या विद्यार्थ्यांच्या कानाखाली चापट मारायला लावत असत. एकदा काय झाल त्यांनी आंम्हाला एका म्ह्णीचा वाक्यात उपयोग करायला सांगितला विनितापासून सुरूवात झाली हा ! हा म्ह्णता जवळ जवळ अक्का वर्ग उभा राहिला मी विजयला म्ह्णालो,’’ तुला येत असेल तर मला सांग पण त्याने मलाही सांगितले नाही. मी विचार केला अक्का वर्ग उभा राहिला तर सर कोणालाच शिक्षा करणार नाहीत आणि केलीच तर सर्वांनाच मार बसला म्ह्णून कोणाला वाईटही वाटणार नाही. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारण्याचा विजयचा स्वभाव मला माहित होता पण तेंव्हा अस काही होईल याची मला शक्यता कमीच वाटत होती. पण त्याने त्याच्या स्वभावानूसार सिक्सर मारलाच त्या म्ह्णीचा वाक्यात उपयोग करून सांगितलाच. मला वाटत आंम्हाला माहीत नसल तरी तेंव्हाही विजयच आवांतर वाचन होत असावं मग काय विजयने माझ्यासह वर्गातील सर्व मुलांचे गाल लाल केले आणि मुलींना ते झेपणार नाही म्ह्णून सरांनी स्वतः त्यांच्या हातावर दोन- दोन फटके मारले त्यानंतर तसा योग कोणाच्याच वाट्याला आला नाही काहींना आला पण विजयच्या कानाखाली मारण्याची संधी त्याने कोणाला कधीच दिली नाही. तुला आश्चर्य वाटेल पण भूगोळात विजयला कधी-कधी पैकीच्या पैकी गुण मिळायचे. त्यावर्षी वर्गात सहावीला विजयचा तिसरा नंबर आला तो ही काही गुणांच्या फरकामुळे.

आंम्ही सातवीला गेलो आणि विजयचे आयुष्यच बदलले. त्याच्या आयुष्यात अचानक काळोख पसरू लागला. त्याच आयुष्यात अचानक दुःखाच सावट पसरताना दिसू लागल आणि त्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाला सुरूवात झाली. त्याने आपल दुःख नेहमीच स्वतःपुरतच मर्यादीत ठेवल. त्याचा राग त्याने आपल्या आजुबाजूच्या लोकांवर कधीच काढला नाही. इतरापासून आपली दैनीय अवस्था लपविण्याचा त्याचा अट्ट्हास त्याला आनंदापासून अधिकच दूर घेऊन गेला आणि मग तो आपल्याच एका वेगळ्या आंम्हाला अनोळखी असणार्‍या जगात रमू लागला. शाळेबाहेरील त्याच्या जगात कोण होत ते आंम्हाला माहीत नव्हत. मी त्याचा एकूलता एक मित्र असतानाही तो मला कधी ही त्याच्या घरी घेऊन गेला नाही की स्वतः कधी आपल्या घरी आला नाही. त्याच जगण आमच्या सगळ्यापेक्षा वेगळ होत. त्याला त्याच्या आयुष्यात कोणाची मद्त घेण मान्यच नव्हत जणू काही त्याचाच जन्म जगाच्या मदतीसाठी झालेला असावा. फक्त आर्थिक बाबतीत सोडल तर इतर कोणत्याही बाबतीत त्याची मदत कोणी मागावी आणि त्याने नाही म्ह्टल्याच मला आठवत नाही. त्याला चित्र काढायला आवडायचं हे जगजाहीरच होत. कित्येकदा तर मी त्याच्या नकळत त्याने काढलेली चित्रे वर्गातील मुलांना दाखवायचो. वर्गातील दोन मुली सोडल्या तर बाकी मुली त्याच्यापासून दूरच असायच्या त्या दोन मुलीही त्याच्या मानलेल्या बहिणी होत्या. मुलींपासून दूर राहण्याचा त्याचा स्वभावाच झाला होता. त्या दोघीही त्याच्या मानलेल्या बहिणी होत्या इतर मुली त्या दोघींच्या माध्यमातूनच त्याच्याकडून आपली कामे करवून घेत असत. त्याची शाळेची फी नेहमीच उशिरा भरली जायची ते ही शिक्षकांनी फी साठी तगादा लावल्यावर ! तो शळेच्या पिकनीकला कधीच आला नाही. शाळेतील कोणत्याच स्पर्धेत त्याने कधीच भाग घेतला नाही. म्ह्णूनच त्याची हुशारी तेंव्हा दडून राहिली. सहावीपर्यत वर्गात एक दिवसही गैरहजर न राहणारा विजय सहावीनंतर आठवडा आठवडाभर शाळेत गैरहजर राहू लागला. शिक्षकांनी विचारल तर सांगत असे मी आजारी होतो शिक्षकांनाही ते खरेच वाटे पण त्याच काळात मी त्याला अनवानी वडिलांसोबत कांदे- बटाटे विकताना पाहिलेले असायचे. त्याबद्द्ल मी त्याला कधीच काही विचारले नाही. तरी ही त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होताना दिसत नव्हता. तो वर्गातील हुशार विद्यार्थीच होता पण कदाचित त्याने स्वतःच स्वतःला हुशार विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून बाजूला केल होत. शाळेय अभ्यासातील यशा- अपयशाशी त्याला कदाचित फारस देण-घेण राहिल नव्हंत. आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या वेडाने त्याला झपाटलेले होते. ओले कडधान्य, नारळ, अंडी, कांदे – बटाटे विकता -विकता त्याने दहावीची परिक्षा दिली दहावीला त्याला चौसष्ठ टक्के गुण मिळाले. तेंव्हा त्याला त्या गूणांच्या आधारावर कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणे शक्य होते. त्यानंतर तो अचानक गायबच झाला त्यानंतर तो काय करतो ? कसलाच थांग पत्ता लागत नव्हता. जेंव्हा लागला तेंव्हा आमच्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या जगात तो रमला होता. ज्या जगात प्रवेश करण्याची आंम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो. आज त्याच्या अस्तित्वाची लाखो लोक दखल घेतात. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर त्याचे फोटो झळकतात. आज त्याला आमचा मित्र म्ह्णवून घ्यायला आंम्हाला अभिमान वाटतो पण आज त्याला आंम्हाला आपला मित्र म्ह्णवून घ्यायला आवडेल का ? कदाचित नाही ? म्ह्णूनच त्याने आमच्या संपर्कात पुन्हा येण्याचा कधीच स्वतःहून प्रयत्न केला नाही. दे तो फोटो माझ्याकडे मी सांभाळून ठेवतो म्हणताच , प्रतिभाने तो फोटो मनात नसतानाही दादाच्या अर्थात प्रणयच्या हातात दिला. त्या फोटोकडे पाहत प्रणय म्ह्णाला. निदान हा फोटो इतरांना दाखवून मला म्ह्णता तरी येईल की विजय माझा खूप जवळ्चा मित्र आहे.

प्रतिभाची वाट पाहत विजयच बसस्टॉपवर थांबण आता थांबल होत. विजय प्रतिभाला आता दिसतही नव्हता. पण आता प्रतिभाला त्याच्यापर्यत पोहचण अवघड नव्हत कारण विजय आता कोठेही असला तरी त्याच्यापर्यत पोहचण तिला सहज शक्य होत. प्रतिभाने पस्तकाच्या दुकानातून विजयचा एक कवितासंग्रह विकत घेतला. त्याच्यावर त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबरही छापलेला होता. तिच्या मनात विजयबद्दल प्रेम होत की नाही ते तिला निटस कळत नव्हत पण ती त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्साही होती. तो आपल्या दादाचा मित्र आहे हे कळल्यावर आपण अर्धी लढाई न लढताच जिंकली असही प्रतिभाला नराहून वाटत होत. प्रतिभाने हिंमत करून विजयला फोन केला आणि म्ह्णाली,’’ हॅलो मी प्रतिभा चव्हाण बोलतेय मला तुम्हाला भेटायचय. काही खास काम आहे का ? या विजयच्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली,’’सहजच तुमची इच्छा असेल तर. त्यावर विजय तिला म्ह्णाला, उद्या सकाळी 10 वाजता माझ्या ऑफीसात ये मी पत्ता तुला एस.एम.एस. करतो आणि त्याने मोबाइल कट केला. प्रतिभाच्या मोबाईलवर आलेला विजयचा ऑफीसचा पत्ता तिला माहित होता. ठरल्या प्रमाणे प्रतिभा त्याला भेटायला त्याच्या ऑफिसात गेली. ऑफिसात पाऊल ठेवताच विजय त्या ऑफिसात बॉस आहे हे तिच्या लक्षात आले. विजयच्या कॅबिनमध्ये जाण्यापूर्वी तिने दरवाजा ठोठावला ! समोर आराम खुर्चीत बसलेल्या विजयचा थाट एखादया मोठ्या बिझनेसमॅनसारखा होता. त्याने प्रतिभाला समोरच्या खूर्चीत बसण्याची विनंती केली. ती बसताच त्याने फोन करून दोन कप कॉफी मागविली प्रतिभा काही बोलण्यापूर्वीच त्याने प्रतिभाला प्रश्न केला ? प्रणय कसा आहे ? त्याची बायको मुल कशी आहेत ? तुझी ताई सोनल कशी आहे ? आई-बाबा गावीच असतात ना ? की सध्या इकडेच राहायला आलेत ? तुझी वहिणी दिसलेली एक- दोनदा प्रवासात पण बहुदा मला ती प्रणयचा मित्र म्ह्णून ओळखत नसावी. इतक्यात ! विजयला कोणाचा तरी फोन आला त्याचा पारा अचानक चढला आणि एखाद्या मोठ्या बिझनेसमनसारखाच तो तावातावाने बोलू लागला तेंव्हा त्याच्यातला लेखक लोप पावल्यासारखा दिसत होता. त्याच्या नजरेत इतकी आग होती की त्या आगीनेच एखादा भस्मसात व्हावा. प्रतिभाला तर आता त्याची भितीच वाटू लागली होती. फोन कट करताच त्याच्या चेहर्‍यावर पुन्हा शांत निर्मळ हसू उमटल होत. त्याने प्रतिभाला सहज प्रश्न केला माझ्याशी तुला काही तरी बोलायच होत ना ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली,’’ मला कालच दादा कडून कळल की तू दादाचा मित्र आहेस ? त्याने तुझ्याबद्द्ल बरच काही सांगितल ते ऐकल्यावर तुझ्याशी बोलाव अस वाटल इतकच. अचानक प्रतिभाची नजर विजयने हातावर रेखाटलेल्या नागाच्या चित्रावर स्थिरावली. तू ही एकच चित्र नेहमीच हातावर का रेखाटतोस ? त्यावर विजय म्ह्णाला माझ्यातील चित्रकाराला जिवंत ठेवण्यासाठी. विजयने एका वाक्यात उत्तर दिल्यावर काय बोलावं ते प्रतिभाला सुचतच नव्ह्त म्ह्णून ती म्ह्णाली, दादा म्ह्णत होता तू एक चांगला चित्रकारही आहेस मग तू स्वतःच काढलेले एखादे चित्र फ्रेम करून तुझ्या कॅबिनमध्ये का लावल नाहीस ? त्यावर विजय म्ह्णाला,’’ माझ्यातील चित्रकार आजही जीवंत आहे पण जागा नाही. माझ्यातील प्रियकरासारखा ! माझ्यातील प्रियकर जसा कोणाला दिसत नाही तसाच माझ्यातील चित्रकारही कोणाला दिसावा अशी माझी इच्छा नाही. तू प्रणयची बहिण असल्यामुळे तुझ्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तुझ्याशी चर्चा मी तुझ्यासाठी नाही तर प्रणयच्या मैत्रीखातर करतोय. त्याला वाटत असेल की मी त्याला विसरलोय पण तस नाही भर रस्त्यातही त्याने मला माझ्या नावाने हाक मारली असती तर धावत जावून मी त्याला मिठी मारली असती. तो त्याच्या आयुष्यात आणि मी माझ्या आयुष्यात सुखी असताना उगाच कशाला एकमेकांच्या आयुष्यात ढवळा ढवळ करायची. तुझ्या जीवनातही मला ढवळा- ढवळ करायची नव्हती. पण ती कविता ढवळे मध्येच टपकली आणि तुझ्या डोक्यात तिने नको – नको ते भरवल. म्ह्णजे तू कविताला ओळखतोस ? त्या दिवशी मी विचारल तेंव्हा माझ्याशी खोट का बोललास ? तरी मला शंका होतीच की तुंम्ही दोघे एकमेकांना ओळखत असाल म्ह्णून ! तुमच्यात नक्की कोणत्या प्रकारच नात होतं ? मला जाणून घ्यायला आवडेल. त्यावर विजय म्ह्णाला ऐरवी हे मी कोणालाच सांगितल नसत पण तू प्रणयची बहिण आहेस आणि मलाही तुला आता माझी मैत्रिण मानायला काही हरकत नाही याची खात्री पटल्यामुळेच सांगतो. शाळेत मी कसा होतो वगैरे बद्दल प्रणयने तुला सारं सांगितल असेलच त्यामुळे त्याच्या खोळात न जाता जे प्रणयलाही माहित नाही ते मी तुला सांगणार आहे. दहाविला मला चौसष्ठ टक्के गुण मिळाले. त्यावेळची आमच्या घरची आर्थिक स्थिती फारच बिकट होती. अगदी खाण्या- पिण्याचेही वांदे होते असं म्ह्टल तरी चालेल. प्रणय तुला म्ह्णाला असेल मी त्याला ही माझ्या घरी कधीच घेऊन गेलो नाही. कसं घेऊन जाणार ? मी जेथे राहत होतो त्याला घर म्ह्णावं की नाही हा माझ्यासाठी एक प्रश्न होता. घराच्या चारही भिंतीचा प्लास्टर निघालेला, खालचा कोबा जागोजागी तुटलेला, छप्पर मध्येच वाकलेल, त्याला आधार म्ह्णून मधोमध उभा केलेला खांब . घरात टेबल, खूर्ची, कपाट तर सोडाच साधी चटईही नव्हती. घरी कोणी आलाच तर त्याच्यासाठी गोड-धोड काय करणार ? तेंव्हा आम्हीच चटनी- भाकरीलाही महाग झालो होतो. आंम्ही म्ह्णजे मी आमचे आई-वडिल, माझे दोन भाऊ आणि एक बहिण. मी जेंव्हा 10 वी पास झालो ते॓व्हा मी 16 वर्षांचा होतो. त्यावेळी मी माझ्या कुटूंबचा आर्थिक भार माझ्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आणि एका अभियांत्रिकी कारखाण्यात कामाला राहिलो. त्या कारखाण्यात तेंव्हा मला 30 रूपये रोज मिळायचा. पण मागच्या चार वर्षात भोगलेल्या सर्व हाल आपेष्टांचा त्या कारखाण्यात पाऊल ठेवताच अंत झाला होता. आजही आठवितो मला तो दिवस जेंव्हा मी पहिल्यांदा त्या कारखाण्यात पाऊल ठेवलं होत. त्यापूर्वी एका रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्याबद्द्लही त्या कारखाण्याच्या मालकाला ही सांगितल होत. त्या कारखान्यात लेथ मशिन , कटींग मशिन, मिलींग मशिन , शेपिंग मशिन ड्रिलिंग मशिन, इनग्रेविंग मशिन, होत्या. शाळेत असताना गणित आणि विज्ञान हे माझे आवडते विषय त्यामुळे या यंत्रात मी रमणार याची मला खात्री होती. कारखाण्यात झाडू मारण्यापासून माझ्या कामाची सुरूवात झाली. त्यामुळे मी आजही म्ह्णतो ईश्वराने माझ्याकडून सारे काही हेरावून घेतले तरी मी उपाशी मरणार नाही कारण मला झाडू मारता येते. झाडू मारणे हे कमीपणाचे काम नाही हे मी त्या कारखान्यात शिकलो. त्या कारखाण्यात माझ्या सोबत काम करणारे सारेच कामगार खुप प्रेमळ होते त्यांनी माझ्या बर्याच चुका पोटात घातल्या होत्या त्याबदल्यात मी ही त्यांना बरीच मदत करायचो. गुरू आपल्या शिक्षाला बावन्नावा हात शिकवित नाही असं म्ह्णतात पण या क्षेत्रातील माझ्या गुरूंनी मला बावन्नावा हातही शिकविला. त्यांच्या जीवनभराचा अनुभव माझ्या सोबत वाटला. त्यांच्यामुळेच यंत्रावर स्वार कसं व्हायच ते मी शिकलो. त्याचबरोबर कसलीच तमा न बाळगता सांभाळता रात्र-दिवस काम कसे करायचे हे मी त्यांच्याकडून शिकलो. त्या कारखाण्यात काम करता – करता माझं रात्र महाविद्यालयातील शिक्षणही सुरू होत. बारावीला मला दोन विषयात अपयश आलं आणि मी शिक्षणाला राम राम ठोकला. पण माझं वाचन लेखण सुरूच होत त्यात मी खंड पडू दिला नाही . माझ विचार करण आणि ते विचार लिहून काढण सुरूच हेत. एका नामांकित वर्तमानपत्रात माझी पत्रे माझी मते , माझे विचार प्रकाशित होऊ लागले. मी लिहलेली एक कविता एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आणि त्यानंतर माझ कविता लेखण सुरू झाल जे आजही अव्याहतपणे सुरूच आहे. कथा मी लिहायचो पण वर्षाला एक-दोनच त्याही नामांकीत दिवाळी अंकात प्रकाशित व्हायच्या. माझे लिखाण प्रकाशित करण्यासाठी मला कधीच धावपळ करावी लागली नाही. कारखाण्यात पाऊल ठेवताच मी लेखक राहत नसे आणि कारखाण्यातून बाहेर पडल्यावर मी कामगार नसे. असे दुहेरी जीवन मी जवळ्पास दहा-एक वर्षे जगलो या दरम्यान कविता माझ्या आयुष्यात आली होती. माझ्यासाठी ती माझ्या स्वप्नातील परीसारखी होती. ती एका राजकुमाराच्या शोधात असावी कदाचित ! पण मी मात्र त्यावेळी कफल्लक कारखाण्यात रोजंदारीवर काम करणारा एक सामान्य कामगार होतो आणि ती पदवीधर गोरीपान गालावर तीळ असणारी करड्या केसांची श्रीमंत घरात लहानाची मोठी झालेली एक राजकुमारी होती. चार-पाच वर्षापूर्वी आता काही महिन्यांपूर्वी मी तुझी वाट पाहत बसस्टॉपवर थांबायचो तशीच तिची ही वाट पाहत थांबायचो एक तास नाही एकदा तर चक्क तीन तास तिची वाट पाहत थांबलो होतो. काल परवा तू जस मला वेड्यात काढल होतस तसं तिनही काढल होत. तिने विचार केला हया कारखाण्यात काम करणर्या मामुली तरूणाच्या का प्रेमात पडावं ? पण तेंव्हाही माझ्या मागेपुढे घुटमळणार्या मुलींची संख्या कमी नव्ह्ती. हे ती जाणून होती. मी तिच्यासाठी बसस्टॉपवर थांबतो हे तिच्या लक्षात आलं होत पण तिला त्याची फिकर नव्हती. मला वाटत तिने कदाचित मनात ठरवूनच टाकल होत की मी जेंव्हा हिंमत करून तिला प्रेमाबद्द्ल विचारेन तेंव्हाच हयाच काय करायचं ते पाहू. कारखाण्या बाहेरच्या जगात मला खुप मानसन्मान होता, तो मी कोणत्याही परिस्थितीत हिच्यासाठी गमावू शकत नव्ह्तो. कारखाण्याबाहेरच्या जगात मी एक असामान्य व्यक्ती होतो. ती मला आवडायची पण माझ्या मनात तिच्याबद्द्ल अजिबातच शारिरीक आकर्षण नव्हत. तिच्या सौंदर्यापेक्षाही तिच्या स्वभावाने मला भुरळ घातली होती. पण नंतर तिचा वास्तविक स्वभाव जस जसा उलगडत गेला तसतशी ती माझ्या मनातून उतरू लागली... आज तू जशी माझ्या बद्द्ल जाणून घेण्यास उत्सूक आहेस तशी ती ही उत्सूक आहे. पण तिच्यात आणि तुझ्यात एक महत्वाचा फरक आहे तो म्ह्णजे तू माझ्या मित्राची बहिण आहेस. पूर्वी मी जशी तिची वाट पाहत उभा राहायचो तशी तुझी ही वाट पाहत मी उभा राहतो हे कळल्यावर तिने विचार केला की मी तिच्यासमोर माझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला नाही म्हणजे मी तुझ्यासमोरही माझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडणार नाही. तिने तेंव्हा जर माझ्या समोर तिच्या माझ्यावरील प्रेमाचा चुकून प्रस्ताव मांडला असता तर माझं उत्तर काय असेल याचा अंदाज बांधण्यासाठी उत्सूक असणार्या तिने तुला पुढे केल. पण मी तुला ओळखतो हे तिला माहित नव्हत. आज मी जो कोणी आहे त्याच तिला आकर्षण आहे. मला माझ्यावर मी कोणीही नसताना प्रेम करणारं कोणी तरी हवं होत. मी काही नसतानाही माझ्यावर जिवापाड प्रेम करणार्याही बर्याच होत्या. त्यामुळे मी कविता सारखीच्या प्रेमाचा स्विकार करून त्यांच्यावर नकळत अन्याय करून त्यांच्या माझ्यावरील प्रेमाचा अपमान नाही करू शकत.

कविताने आपला बकरा केला याचा प्रतिभाला भयंकर राग आला होता. पण त्याचवेळी प्रतिभाने दुसर्या बाजूने ही विचार केला जे झालं ते बरंच झालं. नाहीतर विजयशी आपली ओळख अशी नव्याने कधीच झाली नसती. त्याबद्द्ल कविताचे आभारच मानायला हवेत. अचानक विचार करता - करता प्रतिभाची नजर भिंतीवरील घड्यालाकडे गेली दुपारचे बारा वाजले होते. जेवनाची वेळ झाली होती ती विजयला म्ह्णाली,’’ चल विजय ! मी निघते परत येईन कधीतरी तुला भेटायला पुन्हा. त्यावर विजय प्रतिभाला म्ह्णाला,’’ मी येतो ना ! तुला सोडायला बसस्टॉपर्यत. त्यावर प्रतिभाने गालात मंद स्मित करताच तो ही निघाला तिच्यासोबत. त्याच्या सोबत चालताना प्रतिभाला स्वतःचाच अभिमान वाटत होता. हे असं वाटणं आयुष्यात खूप महत्वाच असत. त्याच्या सोबत चालताना तिची मान ताट होती. तिच्यावर कसलच दडपण नव्हत. चालता- चालता प्रतिभाच्या मनात विचार आला,’’ आता पाच मिनिटे चालताना विजयने जशी आपल्याला सोबत दिली तशी सोबत त्याने आपल्याला आयुष्यभर दिली तर...

नेहमी सारखी प्रतिभा बसची वाट पाहत बसस्टॉपवर उभी होती इतक्यात तिची एक सोनल नावाची मैत्रिण त्याच बसस्टॉपवर आली. हात वगैरे मिळवून झाल्यावर तिने सरळ प्रतिभाला प्रश्न केला,’’ तू त्या विजय जाधवला कशी काय ओळखतेस ? काल मी पाहिल तुला त्याच्या सोबत गप्पा मारताना . त्यावर प्रतिभा म्ह्णाली,’’ तो माझ्या दादाचा मित्र आहे. त्यावर सोनल म्ह्णाली असं का ! तू त्याचा प्रेम नावाचा कथा संग्रह वाचलास का ? काय भन्नाट कथा लिहल्या आहेत त्यात त्याने, मला तर खूपच आवडल्या मला की नाही त्या पुस्तकावर त्याची सही घ्यायची होती. मला तर वाटत त्या कथा संग्रहातील पंदरा कथा त्याने पंदरा जणींवर लिहल्या असतील. पुस्तकाच्या सुरूवातीला मनोगतात लिहलय की कथा काल्पनिक आहेत पण त्या वाचल्यावर तस अजिबातच वाटत नाही. मला खात्री आहे त्या कथा काल्पनिक नसणार ए ! तू खात्री करून घे ना आणि प्लीज या पुस्तकावर माझ्यासाठी त्याची सही घेऊन ठेव. आपण पुन्हा येथेच भेटू तेंव्हा मला हे पुस्तक परत दे हा ! माझा मोबाईल नंबर तर आहेच ना तुझ्याकडे ! म्ह्णून सोनल निघून गेल्यावर प्रतिभा काही वेळ तिथेच बसस्टॉपवर स्वतः शिच विचार करत उभी राहिली. घरी गेल्यावर तिने तो कथा संग्रह प्रणयच्या हातात देत ती त्याला म्हणाली,’’ हे घे तुझ्या मित्रचं पुस्तक माझ्या मैत्रिणीकडून घेतलय वाचायला. ते पुस्तक पाहून प्रणयला खूपच आनंद झाला, प्रतिभाच्या घरातील जवळ - जवळ सर्वांनी त्या पुस्तकावरून नजर फिरवली सर्वांनाच ते पुस्तक खूपच आवडले. सर्वांनी त्या पुस्तकाची तोंड भरून स्तुती केली. प्रतिभाने झोपण्यापुर्वी ते पुस्तक प्रणय कडून वाचायला घेतल. विजयने लिहलेल्या प्रत्येक कथेतील नायिकेत ती स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करू लागली. एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीवर इतक प्रेम करूच कसा शकतो तेच तिला कळत नव्ह्तं. कोणावर तरी प्रेम केल्याखेरीज हे असं इतक सुंदर प्रेमावर लिहण केवळ अशक्य ! म्हणजे सोनल बोलत होती ते खर असणार का ? तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तिने कोणतही पुस्तक संपूर्ण एका दमात वाचल होत. प्रेमात हे असही होऊ शकत हे तिला नव्यानेच उमगल होत. त्याच्याच दुसर्‍या दिवशी ते पस्तक सोबत घेऊन प्रतिभा विजयच्या कार्यालयात अचानक धडकली. त्यावेळी विजय त्याच्या सहकार्‍यांसोबत चर्चा करीत होता. तिला समोरच्या खूर्चीत डोळ्यानेच बसायला सांगून हाताच्या बोटांनी पाच मिनिटे थांबायला सांगितले. चर्चा संपवून त्याचे सहकारी बहेर गेल्यावर विजयने प्रतिभाला त्याच्या समोरच्या खूर्चीत बसायला सांगितले. खूर्चीत बसताच प्रतिभाने विजयचा कथा संग्रह विजयच्या समोर ठेवत ती त्याला म्ह्णाली,’’ माझी एक मैत्रिण आहे सोनल मोरे तिला यावर तुझी सही हवी आहे. त्या पुस्तकावर विजयने सोनल मोरे हिस सस्नेह भेट लिहून त्याखाली सही केली. आणि सही करून ते पुस्तक पुन्हा प्रतिभाच्या हातात देत तो म्ह्णाला, तू वाचलस का हे पुस्तक ? त्यावर प्रतिभा किंचित रागाने हो म्ह्टल्यावर विजयने फोन करून थंडा मागविला तो येताच प्रतिभाला म्ह्णाला थंडा घ्या ! म्ह्णजे तुमचा राग थोडा थंड होईल. तुला कसं माहित मला राग आला आहे ते ? त्यावर विजय म्ह्णाला,’’ तुला राग आला आहे हे तुझा चेहराच सांगतोय ! तुला हे पस्तक वाचल्यावर राग आला नसता तर मला आश्चर्य वाटल असत. आता तुझ्या डोक्यात असंख्य प्रश्नांच काहूर माजल असेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तू बेचैन झाली असशिल. घाबरू नकोस मी तुझ्या सर्वच्या सर्व प्रश्नांची समाधान कारक उत्तरे देईन. त्यावर प्रतिभा गालातल्या गालात गोड हसली आणि विजयला म्ह्णाली,’’ सोनलला वाटत की या पुस्तकातील सर्वच्या सर्व कथा वास्तविक आहेत आणि या कथा लिहणार्‍याच्या आयुष्यात या कथांमधील सर्व नायिका येऊन गेलेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर विजय म्ह्णाला,’’ तुझी मैत्रिण सोनल म्ह्णाली,’’ तशी माझी दहा - पंदरा प्रेमप्रकरणे असली तर तुला काय फरक पडतो ? मी तर तुझा फक्त मित्र आहे प्रियकर नाही ना ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली,’’ तू जरी माझं प्रेम नाकारल असलस तरी मी तुझा तो नकार अजून स्विकारलेला नाही. तेंव्हा विजय म्ह्णाला,’’ मी तेंव्हा तुला नकार का दिला याच स्पष्टीकरण मला वाटत मी तुला दिलयं. त्यावर प्रतिभाने मानेनेच होकार दिला. त्या कथा संग्रहाविषयी प्रतिभाला स्पष्टीकरण देत विजय म्हणाला,’’ हे बघ प्रतिभा आपल्या सभोवताली वावरणारी माणसे आणि त्यांच्या मध्ये होणारा संवाद आणि त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या घटनामुळे त्यांच्या आयुष्यात त्या घटनेचे उमटणारे पडसाद यांची मिळुन कथा होत असते. कोणत्याही कथेचा जन्म तुझ्या- माझ्या अगदी रस्त्यावरच्या भिकार्‍याच्या आयुष्यात ही होत असतो . पण ती कथा प्रत्यक्षात आकारात येताना जो पाहतो आणि ती कागदावर उतरवतो तो कथा लेखक असतो. प्रत्येक काल्पनिक कथाही वास्तवाचचं प्रतिबिंब असत. जो कथा लेखक कथेतील पात्र स्वतः जगतो तेंव्हा त्याची कथा वाचकांना वाचताना वास्तववादी वाटते. मी ही तेच करतो माझ्या आयुष्यातील सभोवतालच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेले प्रेम प्रसंग, प्रेम प्रकरणे, प्रेम भंग माझ्या कथेच खाद्य ठरत. मला सांग तुझ्या मैत्रिणींच्या म्ह्णण्या प्रमाणे जर मी खरोखरच इतक्या जणींच्या प्रेमात पडलो असतो तर आता पर्यत अविवाहीत राहिलो असतो का ? तुझी वाट पाहत ! हे ऐकून न ऐकल्यासारख करत प्रतिभा म्ह्णाली,’’ काय म्ह्णालास आता ! मी नीट ऐकल नाही. त्यावर विजय काही नाही म्हटल्यावर ही प्रतिभाच्या मनात आनंदाचे लाडू फूटत होते. पण स्वतःला आवरत ती विजयला म्ह्णाली,’’ माझ्या सोबत जरा खरेदिला येतोस का ? उद्या दादाच्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी एक भेट घ्यायची आहे ! त्यावर विजय ठिक आहे म्ह्णताच, प्रतिभाला खूप आनंद झाला त्याने आपल्या एका सहकार्‍याला बोलावून त्याच्याकडे ऑफीसच्या गाडीची चावी मागितली,’’ विजयकडे गाडीही आहे याचे प्रतिभाला आश्चर्य वाटले. कारण विजय ती गाडी स्वतः कधीच वापरत नसे. स्वतः बसने प्रवास करीत असे. खरेदी झाल्यावर त्याने गाडीने प्रतिभाला घरापर्यत सोडले असता प्रतिभा विजयला म्ह्णाली ,’’ घरी बोलावले असते पण दादाला अजून माहीत नाही की मी तुला ओळखते ते. त्यावर विजय गोड हसला. दुसर्‍या दिवशी प्रणयच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी विजय अचानक प्रतिभाच्या घरी टपकल्यावर प्रतिभाच्या पायाखालची जमीनच सरकली. विजयला पाहताच प्रणय धावत पुढे गेला आणि त्याने विजयला आपल्या मिठीत भरून घेतल. प्रतिभासह सर्वांशी त्याने त्याची ओळ्ख करून दिली. प्रतिभाने त्याच्या हातात सरबत देताना त्याने हळूच तिचा हात पकडला. क्षणभर ती घाबरली पण नंतर सावरली कोण पाहत नाही असं दिसल्यावर. वाढदिवसाला आलेले जवळ - जवळ सर्वच जण विजयशी गप्पा मारण्यास उत्सूक होते. त्यामुळे प्रतिभाला त्याच्याशी बोलताच येत नव्ह्ते. सर्व पाहुणे मंडळी जेवून निघून गेल्यावर प्रणय आणि विजय जेवायला बसल्यावर प्रतिभाची वहिणी विजयला म्ह्णाली, आई-बाबा आणि निलम आणि बाकी सगळे कसे आहेत ? निलम मध्ये एकदा रस्त्यात भेटली होती सोबत तिचा मुलगाही होता. प्रतिभाला आपल्य वहिणी आणि विजय यांच्या दरम्यानच्या बोलण्यातून वेगळाच सुर ऐकू येत होता. प्रतिभा विजयला कोशिंबीर वाढणार तोच ती प्रतिभाला म्ह्णाली,’’ त्याल कोशिंबीर नको वाढू त्याला नाही आवडत आणि कोबीची भाजीही नको वाढू ! भात नावाला वाढ ! इतक्या सुचना ऐकल्यावर प्रतिभाच्या लक्षात आले की आपली वहिणी विजयला अगोदर पासूनच ओळखते आणि फक्त ओळखत नाही तर चांगली ओळ्खते. इतकी चांगली की तिला त्याच्या खाण्या-पिण्याच्याही सर्व सवयी माहीत आहेत. जेवन वगैरे झाल्यावर प्रणयने विजयला प्रश्न केला,’’ काय मग विजय लग्न कधी करतोयस ? कोणी लेखिका भेटली की नाही ? तुझ्या कथेतील सर्व नायिका लग्न करून मोकळ्या झाल्या की काय ? त्यावर मनिषा प्रतिभाची वहिनी प्रणयला रागावत म्हणाली,’’ तुंम्ही ना काही ही बोलता, तो तसा नाही. मी त्याला तुमच्याहून चांगल ओळखते. विजय जायला निघताच प्रणय त्या ला सोडायला गाडी पर्यंत जाणार होता या दरम्यान प्रतिभाने त्याला हाताच्या खूनेने फोन करायला सांगितले होते ते मनिषाने पाहिले. विजय निघून जाताच मनिषाने प्रतिभाला बाजूला घेतले आणि तिला प्रश्न केला तू विजयला ओळखतेस ना ? त्यावर प्रतिभा नाही ! म्ह्णताच मनिषा तिला म्ह्णाली,’’ खोट बोलू नकोस मी तू त्याला हाताच्या खूनेने फोन करायला सांगताना पाहिलयं ! इतकयात फोन वाजल्यावर प्रतिभाने फोन कानाला लावला आणि हू ! करून कट केला आणि मनिषाला ती म्ह्णाली, हो ! मी विजयला ओळखते आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे. ते ऐकल्यावर मनिषा प्रतिभाला मिठी मारत म्ह्णाली,’’ तुला मानल पाहिजे शेवटी तू पाषाणालाही पाझर फोडलसं ! माझ्या दादाला प्रेमात पाडलस ! आज मला खूप आनंद झाला आहे. इतका की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता मी माझ्या हक्काच्या घरात पाऊल ठेऊ शकते. त्यावर प्रतिभा चक्रावून मनिषाला म्ह्णाली,’’ हे काय चाललय वहिनी ? मला समजेल अशा भाषेत काही सांगशिल का प्लीज,’’ त्यावर स्वतःला सावरत मनिषा प्रतिभाल म्ह्णाली,’’ विजय माझा चुलत भाऊ आहे आंम्ही लहानाचे मोठे एकत्रच झालो माझ्या कडून त्याच्या खूप अपेक्षा होत्या पण मी तुझ्या दादाच्या प्रेमात पडले आणि तो माझ्यापासून दुरावला आमच्यात कडाक्याच भांडण झाल रागाच्या भरात मी त्याला म्ह्णाले,’’ आता तू जेंव्हा कोणाच्यातरी प्रेमात पडून लग्न करशिल आणि मला स्वतःहून आपल्या घरी बोलावशील तेंव्हाच मी आपल्या घरात पाऊल ठेवीन. पण त्यावेळी मला माहित नव्ह्त की प्रणय विजयचा जिवलग मित्र आहे ते. आंम्ही कोर्टात जावून लग्न केल आमच्या लग्नलाही तो आला नव्हता. त्यानंतर आंम्ही सतत एकमेकांना टाळतच राहिलो. त्याच्याबद्द्ल मी प्रणयलाही कधीच काही सांगितल नाही. इतक्यात तेथे प्रणय आल्यावर दोघींच्याही डोळ्यातील अश्रू पाहून विजय म्ह्णाला,’’ आज नंणद आणि वहिणीच प्रेम इतक ओतू का जातय ? त्यावर प्रतिभा प्रणयला म्ह्णाली दादा तुला माहित आहे का ! विजय वहिणीचा भाऊ आहे ! म्ह्णजे तुझा मेव्हुणा आहे. त्यावर चेहर्‍यावर कोणताही भाव न आणता प्रणय म्ह्णाला ,’’ हो मला माहित आहे आणि विजयलाही ते माहित आहे म्ह्णूनच तो मनिषाच्या बाबतीत इतका निर्धास्त होता पण मनिषाला वाटत होत की तो तिला विसरला पण तस नव्हत तो बाहेरून नेहमीच तिची माहिती मिळवित होता आंम्हाला कधीही गरज भासली असती तर तो नक्कीच धावून आला असता. हे जर मला माहित नसत तर आपल्या मित्राच्या आवडी-निवडी आपल्या बायकोला माहित आहेत हे कळ्ल्यावर मला राग नसता का आला ? आपल्या लग्नापूर्वी तुमच्या दोघात झालेल्या भांडणाबद्द्ल मला माहित होत म्ह्णूनच मी त्याला कधीच आपल्या घरापर्यंत येवू दिल नाही. मला हे ही माहित आहे की प्रतिभा त्याच्या प्रेमात पड्लेली आहे. नाहीतर मी आजही त्याला आग्रह करून घरी बोलावल नसत. ज्या दिवशी प्रतिभा विजयच्या कथेच पुस्तक वाचायला घरी घेऊन आली त्याच दिवशी प्रतिभाच्या खोलीची लाईट रात्रभर चालू होती. बोर्डाच्या परिक्षेलाही रात्रभर जागून अभ्यास न करणारी माझी बहिणी एक कथेच पस्तक रात्रभर जागून का वाचेल ? तुंम्ही विचारल का त्याबद्दल त्याला ? या मनिषाला प्रश्नाला उत्तर देत विजय म्हणाला,’’ मी मुद्दामच नाही विचारल ! त्यालाही कळूदे प्रेमात पडल्यावर काय काय होत आणि काय काय कराव लागत ते ? हे ऐकल्यावर प्रतिभा लाजून आपल्या खोलीत निघून गेल्यावर मनिषाने प्रणयला आपल्या मिठीत घेतल आणि तिने आपल्या बर्‍याच वर्षापासून डोळ्यात साचलेल्या अश्रूंना बाहेर पडायला वाट मोकळी करून दिली.

त्यानंतर एका रविवारी प्रतिभा विजयला एका बागेत भेटली. बोलता - बोलता तिने विजयला अगदी सहज प्रश्न केला,’’ मी प्रणयची तुझ्या मित्राची बहिणीची आणि तुझ्या लाडक्या बहिणीची लाडकी ननंद नसते तर तर तू माझ्या प्रेमाचा स्विकार केला असतास ? त्यावर विजय थोडा वेळ शांत बसला आणि विचार करून म्ह्णाला,’’ कदाचित नसता केला. याचा अर्थ तुझे माझ्यावर प्रेम नाही ? फक्त नात्यांच्या दबावाखाली तू माझ्य प्रेमाचा स्विकार केलास ? प्रेमाच्या बाबतीत तडजोड केलीस ? प्रतिभाच्या या प्रश्नांच्या भडिमाराला उत्तर देत विजय तिला म्हणाला,’’ तुझं तरी माझ्यावर प्रेम कोठे होत ? माझ्याबद्द्ल सर्व काही जाणून – उमजून घेतल्यावरच तू माझ्याकडे आकर्षित झालीस ना ? या आकर्षणालाच जर तू प्रेम म्ह्णत असशिल तर माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग ! लोक प्रेमात जे आत्महत्या करतात ते काय असत ? या प्रतिभाच्या आणखी एका प्रश्नाला उत्तर देत विजय म्ह्णाला,’’ मनिषाच्या आणि तुझ्या दादाच्या प्रेमाला माझा कधीच विरोध नव्ह्ता पण आमच्या घरच्यांचा होता म्ह्णून तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही पण जर यशस्वी झाला असता तर याचा विचार प्रेमात आंधल्या झालेल्या तिने तेंव्हा केलेला नव्हता. मला नेमका त्याचा भंयकर राग आला होता. तिच्या मुर्खपणामुळे कदाचित आंम्ही आणि प्रणयही तिला गमावून बसला असता. त्या रागाच्या भरातच आमच्यात भांडण झालं आणि ती दुरावली माझ्या पासून ती आता पर्यंत ! म्ह्णून माझं तिच्यावरील प्रेम कमी झालेलं नव्हत. प्रेमासाठी आत्महत्या करणारे आणि त्यांना तस करण्यास प्रवृत्त करणारे काय साध्य करतात तेच कळ्त नाही म्ह्णून मी मनिषाला मोकळ सोडल. मला व्यक्तीशः अस वाटत की प्रेम वगैरे नावाची कोणतीच गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही हा सारा मेंदुचा खेळ आहे. आपल्यासाठी कोणत्याही गोष्टीशी तडजोड करणारी प्रसंगी आपल्यासाठी जीवाचं बलिदान ही दयायला तयार असणारी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते असं आपण मानतो. सहवासाने शारीरिक आकर्षणातून प्रेम निर्माण होते. कधी – कधी संस्कार नीती-मूल्ये यांच्यावरही मात करून प्रेम मानसाला काही गोष्टी करायला भाग पाडते, ज्यातून निर्माण होतात अनैतिक संबंध. स्वतः ला गंगेपेक्षाही पवित्र मानणारे कित्येक ढोंगी मी पाहिले आहेत, ज्यांनी आपल्या भुतकाळात असंख्य चुका केलेल्या होत्या पण आज समाजात साधू असल्याचा आव आणत होते. आज एका कुशीतून उटले की लगेच दुसर्‍या कुशीत विसावणारे मी कित्येक आपल्या आजूबाजूला पाहत आहे. आता तू माझी बायको होणार आहेस त्यामुळे माझ्या भुतकाळा विषयी माझ्या कुटूंबाविषयी तुला सर्व माहिती असणे गरजेचे आहे. आज जेंव्हा तू माझ्याकडे पाहतेस तेंव्हा तुला दिसतो एक इतरांपेक्षा वेगळा असामान्य माणूस . प्रणय कडून तुझ्या वहिणी कडून तुला जे कळ्ल असेल त्यापेक्षाही भयंकर परिस्थितीतून मी गेलेलो आहे. माझ्या जन्माला कारण असणार्‍या माझ्या आई- वडिलांचा जन्म कोकणातील एका छोट्याश्या खेड्यात झाला होता. त्यावेळी म्ह्णजे तीस-चाळीस वर्षापूर्वी कोकणातील घरे दगड – मातीची असत. त्यावेळी सातवी पर्यतची शाळा गावात आणि त्यापुढची शाळा तालुक्याच्या ठिकाणी असे. त्यावेळी गावातील गरीब लोकांच्या मुलांना तालूक्याच्या ठिकाणी शिकायला जाणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नसे त्यामुळे त्यांना सातवीला शिक्षण सोडावी लागत असे, त्यानंतर ते विद्यार्थी पोटापाण्यासाठी मुंबईचा रस्ता धरत. आमचे वडील सातवी पर्यत शिकले, सातवीला असे पर्यत त्यांनी वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नाही आणि आंम्हाला तो कधी धरताच आला नाही आंम्ही फार - फार तिसर्‍या नंबर पर्यत मजल मारली. आमची आई तिला शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी मारल म्ह्णून शाळेतच गेली नाही आणि अशिक्षीत राहिली पण नंतर कधी तरी आपण अशिक्षीत राहिल्याची खंत तिच्या मनात निर्माण झाली असावी. म्ह्णून सुरूवातीला आमच्या शिक्षणाबाबत ती फारच आग्रही होती पण नंतर परिस्थितीपुढे तिलाही गुडगे टेकावे लागलेच. आमच्या आई - बाबांचा प्रेमविवाह झाला होता ते ही आंम्हाला कित्येक वर्षानंतर इकडचे - तिकडचे संदर्भ जोडल्यानंतर कळ्ले होते. त्याबद्द्ल चर्चा करावी इतके मैत्रिपूर्ण संबंध आमचे आमच्या आई-वडिलांसोबत कधीच नव्ह्ते. बाबा कामानिमित्त सुरूवातीला मुंबईला आल्यानंतर एका महिन्यात जवळ पास वीस –एक हॉटेलात त्यांनी काम केले त्यानंतर एका होलसेलच्या लिंबाच्या दुकानात ते स्थिरावले. त्यांना लोक लिंबूवाले शेट म्ह्णून ओळखू लागले. स्वतःला शेट म्ह्णवून घेताना त्यांना तेंव्हा अभिमान वाटायचा पण नंतर काही वर्षांनी शेट कायमचा निघून गेला आणि वालेच्या पुढे वस्तूंची नावे बदलत राहिली. माझा जन्म झाला तेंव्हा मी मांजराच्या पिल्लासारखा छोटासा होतो. माझ्या अंगावर दाट केस होते. मी जगेन की नाही याबद्द्लही बर्‍याच लोकांच्या मनात शंका होती. मी इतका किरकोळ बांध्याचा होतो की मी कधी धष्ट-पुष्ट होईन की नाही याबद्द्ल ही लोकांच्या मनात शंका होती. माझ्या आईने माझ्या अंगाला चण्याच्या डाळीचे पीट लावून लावून माझ्या अंगावरील केस विरळ केले. मी खुप सडपातल असल्यामुळे त्यावेळी कित्येक जण मला सुकड्या म्ह्णायचे त्याचा मला कधीच राग येत नसे मी सुकड्या या शब्दाला माझं टोपणनाव म्ह्णूनच स्विकारल होत. आजही माझ्या अंगावर दाट केस आहेत. मी एक दोन वर्षाचा असताना आई सोबत नदीवर गेलो होतो आणि खेळता खेळ्ता नदीच्या पाण्यासोबत वाहून जाणार होतो तेंव्हा जवळ्च कपडे धुणार्‍या काही तरूणींना मला वाहत जाताना पाहिल आणि वाचविले त्यांचे माझ्यावर अनंत उपकारच आहेत त्यामुळेच कदाचित मला पाण्याची भिती वाटत असावी. माझ्या नंतर माझ्या धाकट्या भावाचा अजयचा जन्म झाला तो लहान असतानाच त्याला पोलिओची लागण झाली आणि तो कायमचा अपंग झाला. आमच्या आईच आणि आमच्या आजीच पटत नसल्या कारणाने बाबा आंम्हा सर्वांना मुंबईला घेऊन आले ते कायमचेच. त्यांनंतरही आंम्ही मी पहिलीला असताना गावी राहायला गेलो होतो पण एकाद महिन्यातच पुन्हा मुंबईला आलो होतो. त्यानंतर निदान मी तरी पूर्णपणे मुंबईकर झालो त्यानंतर मी गावचा रस्ता विसरलो तो कायमचाच. त्यानंतर माझ्या धाकटया भावाचा महेशचा आणि धाकट्या बहिणीचा निलमचा जन्म झाला. आमच्या बहिणीचा जन्म हा अपघात नव्ह्ता तर आमच्या घरात एकही मुलगी नव्हती आणि आमच्या बाबांना एक मुलगी हवी होती मुलगा- मुलगी भेद न मानण्याची परंपरा आमच्या घरात तेंव्हाच सुरू झाली होती. आमच्या लहानपणी आमच्या बाबांकडे पैशाची काही कमी नव्ह्ती त्यामुळे आंम्ही सर्व भावंडानी खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता. मी सातवीला गेलो आणि आमच्या कुटूंबाचे ग्रह फिरले बाबांचा लिबांचा व्यवसाय बंद केला डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यात भर म्ह्णून त्यांचे दारूचे व्यसन बळावले आणि आणि आमच्या वाढ्त्या वयाबरोबरच्या वाढ्त्या गरजा त्यानंतरच्या चार वर्षात आंम्ही जे भोगल त्याला खरोकरच भोग म्ह्णता येईल. त्या चार वर्षात आंम्हा भावंडांना एकही नवीन पोषाख विकत घेता आला नाही. छोटी – मोठी कामे करून आंम्ही भावंडानी आमच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचा प्रयत्न केला. एक-एक किलो तांदुळ विकत आणून तो भात फक्त तिकट मसाला आणि मिठात मिसलून खाल्ला. भात असेल तर चपाती नाही, चपाती असेल तर भाजी नाही आणि भाजी असेल तर डाळ नाही अशा परिस्थितीत चार वर्षे काढली. पण कधीही पैशासाठी कोणाकडे हात पसरले नाहीत आमच्या त्या परिस्थितीचा फायदा घेणारे, आमच्या त्या परिस्थितीमुळे आमचा अपमान करणारे ही बरेच भेटले पण ! माझा अपमान करणार्‍या एकालाही मी माफ केल नाही. कोणासमोर हात पसरण आमच्या आईच्या आणि आमच्याही स्वभावात नव्हत. आमचा जन्मच जणू लोकांना देण्यासाठी झाला होता. त्याचा प्रत्यय मला आजही येतो. माझ्याकडे काही नसतानाही माझ्याकडे काही तरी मागण्यासाठी लोकांचे हात पसरलेले असतात. कधी ही घराबाहेर न पडलेली माझी आई आमच्या कुटूंबाची विस्कटलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी घराबाहेर पडली एका कारखाण्यात नोकरी करू लागली. त्यानंतर आंम्हाला थोड बळ मिळालं त्यानंतर मी ही शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला राहिलो आणि आमच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधरू लागली. निलम आणि मनिषा जाणत्या होईपर्यत आमच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदललेली होती त्यामुळे आमच्या गरीबीची झळ त्यांना कधीच पोहचली नाही. त्या चार वर्षात मी माझ्या बाबासोबत गाडीवर कांदे – बटाटे, नारळ, विकले बुर्जी –पाव विकला आणखी काय काय विकल आता आठवत ही नाही. त्यावेळी आमच्या शाळेतील कोणी पाहिल तर काय वाटायच हे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही . पण कालांतराने मी त्याचा स्विकार केला आणि स्वतःला या सर्व गोष्टींना सामोर जाण्यास सज्ज केल आज मला मलकटले कपडे घालून अक्की मुंबई फिरायला सांगितली तरी मी फिरेन. आज मी कितीही महागातले कपडे घातले तरी त्यांना जपण्यासाठी मी प्रयत्नशील नसतो. आजही मला हाताला लागतील ते कपडे मी अंगावर चढवतो. आपली आर्थिक स्थिती सुधारावी म्ह्णून नोकरी करीत असतानाही आमची आई आमच्यावर चांगले संस्कार करायला विसरली नाही. आमचे बाबा दारू प्यायचे पण आमच्या समोर कधीच प्यायचे नाहीत आणि आंम्हाला कधीच दारू विकतही आणायला सांगत नसत. त्यांच व्यसन हे मानसिक त्रासातून बळावल होत. पुढे बाबांना कोणी महापुरूष भेटला की त्यांना साक्षात्कार झाला त्यांनी दारू प्यायची सोडली आईनेही माझ्या भावंडाच्या खाण्या-पिण्याची होणारी अबाळ पाहून नोकरी सोडली मी आणि काही वर्षातच मी माझ्या भावंडाच्या साथीने आमच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती बर्‍यापैकी सुधारली. मला अजयला पदवीधर करून त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करायच होत महेशने आपला मार्ग स्वतःच निवडला होता. त्याचा प्रवास पैशाच्या दिशेने योग्यप्रकारे सुरू होता बाबा बर्‍यापैकी कमावू लागले होते. आता आमच्याकडे पैशाची कमी नव्हती. पण या सगळ्यात आमच्या कुटूंबातील लोकांचा एकमेकांशी मोकळा संवाद कधीच झालाच नव्हता. सारेच आप आपल्या मार्गावर चालत होते. निलमला ती शिकेल तेवढ शिकविण्याच माझं स्वप्न होत पण ते स्वप्न तिने प्रेमविवाह करून धुळीला मिळविल. मनिषाच्या बाबतीत केलेली चुक आंम्ही तिच्या बाबतीत केली नाही. तिच्या योग्य पद्धतीने धुमधडाक्यात लग्न लावून दिल. महेशच आमच्याच नात्यातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण होत म्ह्णून त्यांना ही मी लग्नाचा मार्ग मोकळा करून दिला. मला खरं म्ह्णजे लग्नात फारसा रसच नव्ह्ता आणि आजही नाही...मी लग्न करीत नसल्यामुळे लोक आप- आपल्या परिने विचार करीत असतात...उदा. मी लग्न का करीत नाही ? माझ्या आयुष्यात मला आवडावी अशी मुलगी कधीच आली नाही का ? मला लग्नच करायच नाही का ? नाही तर का ? मी षंढ तर नाही ना ? इतपर्यत सारेच पश्न तू ही मला विचारायला हवे होतेस. त्यावर प्रतिभा हसून म्ह्णाली,’’या सर्व प्रश्नांची उत्तरे मला तुझ्या साहित्यात मिळालेत, तू काहीही म्ह्णालास तरी सोनलला जे वाटत होत त्यात तथ्य होत. मला पुर्ण खात्री आहे तुझ्या प्रत्येक कथेतीला नायिका कधीना कधी तुझ्या आयुष्यात काही काळासाठी का होईन डोकावून गेलेली आहे. तिला देण्यासाठी तुझ्याकडे वेळ नव्हता म्ह्ण अथवा त्यावेळी तिच्यापेक्षाही अधिक महत्वाच आणखी काही तरी तुला खुणावत होत म्ह्ण. असामान्य व्यक्ती होण हे तुझ स्वप्न होत तुझा जन्मच त्यासाठी झाला आहे याची तुला खात्री होती. तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकलस, तुझ्या कथेतील नायिकांनी नायकासमोर त्यांच प्रेम व्यक्त करताच नायकाने त्यांच्या प्रेमाचा स्‍विकार केल्याच लिहून तू तुझ्या कथेचा शेवट केलास पण वास्तवात तू मात्र त्या सर्वजणींचा अपेक्षा भंग केलास. त्यांपैकी एकीचीही तुझ्यासमोर तिच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडण्याची हिंमत झाली नाही. तुझ्यात असं काय आहे ज्यामुळे लोक तुझ्याशी बोलताना घाबरतात हे कोड मला आजही उलगडत नाही. त्या सर्वजणींनी तुझ्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडून तुझ्या पासून कायमचं दूर जाण्यापेक्षा दुसरा जोडीदार निवडून कायम तुझ्या मनाजवळ राहण्याचा मार्ग स्विकारला. कदाचित तू त्यांच्या हृद्यात्‍ अढल स्थान निर्माण केल होतस. त्यापैकी कोणाचाही गैरफायदा घेण तुला शक्य होत पण तू तस केल नाहीस. उलट त्या सर्वजणींना निस्वार्थीपणे मदतच करीत राहिलास. लग्न करून लोक फक्त शरीराने एकत्र येतात तू त्यांच्याशी मनाने जोडला गेलेला होतास. तुझ्या काही दिवसांच्या सहवासाने तू मला हवा हवासा वाटत असावास तर तुझ्या सोबत कित्येक वर्षे घालविलेल्या तुझ्या प्रेमात पडल्या नसत्या तर मला नवळ वाटल असत. तुझा जन्म नक्की कोणत्या कार्यासाठी झालाय हे तुला माहित आहे म्ह्णून तू भरकटत नाहीस. आपल्या विचारांपासून विचलीत होत नाहीस. तू माझ्या प्रेमाचा स्विकार केलास ते मी तुझ्या मित्राची बहिण आहे म्ह्णून नाही तर मी तुझ्या ध्येयापर्यत पोहचण्याची शिडी आहे म्ह्णून. तू इतकी वर्षे त्या शिडीच्याच शोधात होतास आता तुझा तो शोध संपलाय कदाचित...विजय गालात मंद स्मित करत तिच्यासह बगीच्याच्या बाहेर पडला...

एके दिवशी प्रतिभा भेटायला येणार म्ह्णून विजय एकटाच त्याच्या कार्यालयात विचार करीत बसला होता. विचार करता करता तो त्याच्या भुतकाळात डोकावू लागला. आपल्या खडतर आयुष्यातही आनंदाचे विनोदाचे क्षणही बरेच आले होते. आपल आयुष्य अगदीच वाया गेल असही म्ह्णता येणार नाही. शाळेत विनिताला कबडी खेळताना पहायला किती मजा यायची सर्वांना वाटायच माझा आणि तिचा छत्तीसचा आकडा आहे कारण त्यावेळी आंम्ही तिसरीत असताना कांबळे बाईनी विनिताला मारल्यावर ती खूप रडली पण शाळा सुटल्यानंतर जे झाल ते कोणालाच माहित नव्हत. त्या दिवशी शाळा सुटल्यावर विनिताच्या आणि माझ्या आईची भेट झाली. त्या दोघींच्या बर्यापैकी ओळख निघाल्यावर त्या दोघींनी आम्हा दोघांना पुन्हा न भांडण्याचा सल्ला दिला तो आंम्ही कायम पाळला. तिच्या मनात माझ्याविषयी काय होत नव्हत मला माहित नाही पण ती मला आवडायची आज तिची लग्न होऊन तिला दोन पोर झाली तरी ही आवडते तिची आठवण आजही मला उल्हासित करते. माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी होती जिच्या मी प्रेमात पडलो होतो. तिच्यावर लिहलेली माझी पहिलीच कविता एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आणि माझ्या कविता लिखाणाला सुरूवात झाली माझ्या लिखाणाची सुरूवातच मी तिच्या नावाने केली असं म्ह्णायला काही हरकत नाही. माझ्यातील लेखकाला तिने जन्माला घातला होता. एका वर्तमानपत्रात व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने तरूणांकडून आपल्या प्रेम भावना व्यक्त करणार्या कविता मागविल्या होत्या तेंव्हा मी पहिल्यांदा कविता लिहण्याचा प्रयत्न केला त्या कवितेच्या सुरूवातीला वर प्रिय विनिता असं लिहलेल होत आणि शोवठी तुझा विजय त्यामुळे ती कविता माझी होती हे तेंव्हा कोणाच्याही लक्षात आले नाही. ती कविता ज्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाली होती ते वर्तमानपत्र मी कोणालाच दाखविले नाही आणि त्याचे कात्रणही माझ्याकडे जपून ठेवले नाही. पुढे तिच कविता मी त्यात काही बद्ल करून माझ्या एका कावितासंग्रहात प्रकाशितही केली. मी शाळेत असताना मी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांच्या मधोमध व्ही लिहीत असे सर्वांना वाटे तो व्ही फॉर विजय होता पण तो व्ही फॉर विनिता असायचा. शाळा संपली आणि माझं तिच्यावरील प्रेमही संपल. पुढे अपघाताने आम्ही भेटलो पण तो पर्यत माझ्या आणि तिच्या आयुष्यातही बरच काही घडून गेल होत. मी शाळेत असताना जसा साधा भोळा होतो तसा राहिलो नव्हतो. त्यामुळे तेंव्हा ती मला फक्त माझी एक चांगली मैत्रिण म्ह्णुनच आवडत होती. तेंव्हा ही माझ्या आजुबाजुला असंख्य फुलपाखरे उडत होती. विनिताच्या हुशारी बद्द्ल मला प्रचंड आदर होता. त्या मुळे आमच्याच सोसायटीत राहणार्या पुजा नावाच्या अत्यंत हुशार मुलीच्या मी प्रेमात पडलो. पुजा फक्त तिच्या नावातच होती, बाकी तिच चालण, बोलण, हसण, लाजण सारंच मादक होत. तिच्याकडून मला जरा जास्तीच्या अपेक्षा होत्या मला वाटत होत की ती तिच्या आयुष्यात एक असामान्य व्यक्ती होईल म्ह्णून तिच्या भविष्याच ओझ वाह्त मी माझं तिच्यावरील प्रेम तिच्यासमोर व्यक्त करण टाळ्त होतो. तिला देण्यासाठी मी एक प्रेमपत्रही लिहलं होत पण आंम्ही जन्मतः डरपोक मुलींच्या बाबतीत ! म्ह्णून शेपूट आत घेऊन बसलो आणि मग तेच प्रेमपत्र पुढे एका कथेत वापरल ती कथा एका दिवाळी अंकात प्रकाशित झाली. माझ्यातील कथा लेखकाला जन्मास तिने घातला होता तिच्याही नकळत. त्या पुजाचा चेहरा पाहता यावा म्ह्णून आमच्या घरापासून दहा- पंदरा मिनिटावर असणार्या विहीरीवर घरात पाण्याने भरलेले हंडे रिकामे करून आंम्ही भरायला घेऊन जायचो. घराजवळील जंगलात एका ओढ्यावर ती कपडे धुवायला जायची म्ह्णून पावसाळ्यात दर रविवारी आंम्ही ही आमच्या घरातील चादरी धुवायला त्या ओढ्यावर घेऊन जायचो. त्या ओढ्यावर काही महिला अंघोळ ही करायच्या . त्यामुळे राम तेरी गंगा मैली चा सीन आंम्हाला समोर पाहायला मिळायचा पण तो पाहण्यातही आंम्हाला तेंव्हा रस नव्हता आम्हाला रस होता तो कपड्यांना साबन लावता आपल्या चेहरयावर येणारे केस हळुच हाताने वर केल्यावर दिसणारा तिचा गुलाबी चेहरा पाहण्यात. तर पुजाचा नुसता मधूर आवाज जरी कानावर पडल तरी माझं मन तेंव्हा प्रसंन्न व्हायचं. आमच्या सोबत तिच्यासाठी बरेच जण धावले, आमची यशस्वी होण्याची शक्यता जरा जास्त होती पण आंम्हाला तिच्याकडून जे अपेक्षित होत त्या अपेक्षांना तिने पायदळी तुडवल. मला तिला प्रसिध्द झालेल पाहायच होत पण प्रसिध्दी कालांतराने आमच्याच पायाशी घुटमळू लागल्यावर मलाही प्रसिध्दीचा मोह टाळ्ता आला नाही आणि मग प्रसिध्दीची नशा चढू लागल्यावर पुजाच्या प्रेमाची नशा उतरली ती कायमचीच.

आमच्या गरीबीच्या काळात माझ्या प्रेमात पडाली ती अनिषा माझ्या घरापर्यत पोहचलेली ती माझी पहिली मैत्रिण होती. नाहीतर विनिताही माझ्या घरात कधीच आली नव्हती. अनिषा दिसायला अतिशय सुंदर पुजापेक्षाही, आवाजही गोड, मनमिळावू आणि सतत आनंदी असणारी तरूणी होती. मला माझी मैत्रिण म्ह्णून ती खुप आवडायची आजही आवडते. मी एक सामान्य माणूस असतो तर तिच्याशी लग्नही केल असत. पण माझ्या ध्येयाच्या मार्गात ती अडचण ठरली असती याची मला खात्री होती त्यामुळे मी लग्न, प्रेम आणि मैत्री यांची कधीच भेसळ होऊ दिली नाही. आज तिच लग्न होऊन ती संसारात रमल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. या दरम्यानच कोठेतरी मी माझ्या कथेतील नायिकेच्या सुषमाच्या प्रेमात पडलो. सुषमा एक अजब रसायन होत. तिच्या फक्त नावाने गेली दहा वर्षे मला तिच्याशी जोडून ठेवलय. तिच माझ्याकडे आकर्षित होण याला कदाचित प्रेम म्ह्णताही येणार नाही. तेंव्हा ती बारावीच्या वर्गात शिकत होती. माझी कामाला जाण्याची आणि तिची क्लासला जाण्याची वेळ एकच होती. आंम्ही दोघ एकाच बसस्टॉपवर उतरायचो, बस मधून उतरल्यावर थोड चालत गेल्यावर ती न चूकता माझ्याकडे मगे वळून पाहायची आणि गालात गोड हसायची, तिच हसण नव्हे तर ती हसल्यावर तिच्या गालाला पडणार्या खळ्या मला खूप आवडायच्या. या दरम्यान तिच्या आणि माझ्या आयुष्यात एक घटना घडली ज्या घटनेमुळे आंम्ही दुरावलो. त्या घटनेवर मी एक कथा लिहली ती एका प्रसिध्द दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर काही वर्षानंतर मला अपघाताने ती माझ्या एका जिवलग मित्राची बहिण असल्याचे कळ्ले आणि मग मी पुर्णता माघार घेतली, ती कायमचीच ! त्यानंतर मी तिच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण माझ्या कथेतील नायिकेच नाव मात्र बर्याचदा सुषमाच असायच कारण ते नाव माझ्यासाठी देणगी ठरत होत. मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त वेळ खर्च केला होता तो कवितासाठी ! आता मी तिला विसरण्याचा प्रयत्न करीत होतो पण ती आजही माझा पिच्छा सोडायला तयार होत नव्हती. कवितावर माझं एकतर्फी प्रेम होत पण आमच्यात संवाद कधीच झाला नव्हता. तिने प्रतिभाला माझ्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न का केला असावा ? माझ्या बद्द्ल तिच्या मनात अचानक प्रेम का निर्माण झाल असावं की कोणीतरी माझ्या प्रेमात स्वतःहून पडलय हे पाहून तिचा अहंकार दुखावला असावा ? ती प्रतिभा सोबत जशी वागली तसा तिचा स्वभाव खचितच नव्हता. माझ्याकडून कधीच कोणावर जाणन बुजून अन्याय झाला नाही. मग मी कवितावर तरी अन्याय कसा करू शकतो. माझ्या बद्द्ल तिच्या मनात काही असेल नसेल पण एकदा चर्चा करून सार स्वच्छ करायलाच ह्वं असा विचार विजय करीतच होता इतक्यात् प्रतिभा आल्यावर तो तिच्यासह खरेदीला निघून गेला.

एक दिवस बसस्टॉपवर विजयला कविता दिसली असता तो तिच्या जवळ गेला तो बोलण्या पूर्वीच कविता त्याला म्ह्णाली,’’ अभिनंदन ! प्रतिभा आणि तुझ लग्न ठरल्याबद्द्ल . हिंमत करून मला कधी का नाही विचारलस की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही ? त्यावर विजय तिला म्ह्णाला,’’ मी तुला विचारायला घाबरत नव्हतो ! मी घाबरत होतो तो मी मिळविलेल्या नावाला माझ्या निष्कलंक चारित्र्याला ! ते गमवायला मी कोणासाठीही तयार नव्ह्तो. तू का नाही विचारलस ? विजयने प्रश्न करताच कविता म्ह्णाली,’’ मी विचारल असत तर तुला माझ्या चारित्र्याबद्दल शंका आली असती अशी मला भिती वाटत होती. तू माझ्या गोर्या रंगाला आणि माझ्या तारूण्यावर फिदा झाला आहेस असं ही मला वाटत होत पण नंतर तुझ्या आजुबाजुला घुटमळ्णार्या कित्येकजणी पाहिल्या आणि माझं मत बदलत गेल. सुरूवातीला तू जे बोलायचास त्या मला थापा वाटायच्या तुझ्या राहण्यात आणि बोलण्यात खूप तफावत होती म्हणजे तुझं राहण चित्रपटातील नायकासारखं आणि बोलण एखाद्या साधूसारखं ! तुझ्यावर त्या तरूणी लट्टू का होत असत ते कोड मला आजही उलगडत नाही, कदाचित ते तुलाही उलगडलेले नसावं. सुरूवातीला मला वाटत होत तुला माझ्या सोबत फक्त टाईमपास करण्यातच रस असावा. पण नंतर जस जसा तू मला कळ्त गेलास तस तशी मी तुझ्या प्रेमात डुंबत गेले. पण हे सर्व कळेपर्यत वेळ निघून गेली होती आणि तू प्रतिभाच्या प्रेमात पडला होतास. मी माझ्या परीने प्रतिभाला तुझ्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो फसला. त्यावर विजय म्हणाला,’’ माझ्या हद्यात आजही तुझ्यासाठी जागा मोकळी आहे पण् आता माझ्यावर माझा नाही तर प्रतिभाचा अधिकार आहे. माझ्या मनात आता तुझ्या बद्दल कसलाच किंतु परंतू नाही आयुष्याच्या कोणत्याही वळ्णावर जर आपण पुन्हा समोर आलो तर मी तुला नक्कीच ओळ्ख दाखवेन अनोळखी होणार नाही हा माझा तुला शब्द आहे. त्यावर कविता विजयला म्ह्णाली तू तुझ्या आयुष्यात इतरांच्या सुखासाठी असंख्य गोष्टींचा त्याग केलास ! आज मी तुझ्या आणि प्रतिभाच्या प्रेमासाठी माझ्या तुझ्यावरील प्रेमाचा त्याग करते. कविता डोळ्यात आलेले अश्रू फुसत जाताना प्रतिभाने लांबूनच पाहिले आणि विजयच्या जवळ येताच ती विजयला म्ह्णाली,’’ काय म्ह्णत होती तुझी माजी प्रेमिका ? काही नाही ! आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देत होती. त्यावर किंचित रागावत प्रतिभा म्ह्णाली,’’ माझ्या नशिबाचा हेवा आणखी किती जणिंना वाटणार आहे देव जाणे ? मला तर वाटत लग्नानंतर पहिल्यांदा मला तुझीच नजर काढावी लागेल. कविताने केलेल्या या विनोदावर कवितासह विजयही मनमुराद हसला...

‘समाप्त’Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Bamne

Similar marathi story from Inspirational