Mayuri Kadam

Romance

3.2  

Mayuri Kadam

Romance

बंद कुपीतलं प्रेम

बंद कुपीतलं प्रेम

3 mins
1.6K


कथेचं नाव : बंद कुपीतलं प्रेम

नवराई माझी लाडाची लाडाची ग...

         आवड हिला चंद्राची चंद्राची ग...

       नवराई माझी नवसाची नवसाची ग...

        अप्सरा जणू इंद्राची इंद्राची ग....

       मोगरा,बकुळ, जाईच्या फुललेल्याअंगणात जुईभोवती फेर धरून बायका गाणी गात होत्या. नाजूक, गोरीपान जुई लिलीच्या फुलासारखी फुलली होती.मैत्रीणी जगदीशच्या नावानं चिडवू लागल्या जगदीशचं नाव घेतल्याबरोबर जुईंच्या अंगावरर रोमांच फुलत होता.

     परीसारखी दिसणा-या जुईचे हात मेंदीचे रंगल्यामुळे सौंदर्यात अधिकच भर पडू लागली . सगळं वातावरण उत्साहानं फुलून गेलं होतं. तिखट, गोड जिन्नसांचा सुगंध येत होता.इतक्यात जुईची मोठी काकू द्रौपदाबाई आली आणि म्हणाली " चला ,चला जुईला हळद लावायची तयारी करा".

      "नव-याकडची उष्टी हळद आणा पोरींनो लवकर" नव-याची म्हणजे जगदीशला लावलेली उष्टी हळद आपल्याला लावली जाणार. त्याची अर्धांगिनी होण्याची सुरुवात या क्षणापासून होणार.गावतील पाटलांचा मुलगा  

दिसायला देखणा, गर्भश्रीमंत असूनही त्याला जराही कशाचा गर्व नव्हता.सगळ्यांशी अदबीने वागणा-या जगदीशने पहिल्या भेटीतच जुईचं मन जिंकून घेतले होते.जगदीश ही तिच्यातील कवयित्रीवर भुलला होता.

        ॲरेंज मॅरेंज असूनसुद्धा "एक दूजे के लिए" या प्रमाणे ते एकमेकांवर प्रेम करीत होते. नव-याची उष्टी हळद काकींनी तीला लावली आणे तीच्या डोक्यात एकच कळ आली काही केल्या तीने हळद लावून घेतली नाही. तीच्यात एवढी शक्ती आली की १०-१० बायकांना मागे ढकलून ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. आई बाबांना काहीच कळेना .आई बाबा तिच्या खोलीत गेले पाहतात तर तीला भयंकर ताप आला होता.डॉक्टरांनी तपासून गोळ्या औषधे दिली आणि ती झोपी गेली.

         सकाळी हॉलवर जाण्याची सगळी तयारी सुरु झाली जुईचे डोके जड झाले होते. तीला रात्री काय घडले काही आठवेना.आपल्याला काय होतंय हे समजेना.अंधुकपणे तीला आठवू लागलं,आपण अंगणातून धावत येऊन आपल्या खोलीत शिरलो आणि झोपी गेलो पण असे का झाले तीला कळेना.

आई जुईच्या खोलीत आली.

      "बाळ उठतेस ना? हाॅलवर जायला उशीर होईल.काय होतंय तुला?

आई उशाशी बसून काळजीच्या स्वरात बोलू लागली.

      " माहित नाही आई. मला हळद लावून घ्यावीशी वाटली नाही.हळदीचा 

स्पर्शही नकोसा वाटत होता." जुई रडवेल्या स्वरात बोलू लागली.पाहुणेमंडळीमध्ये चर्चा होऊ लागली.   

       आईने तीला हाताला धरून उठवले.हातात गरम गरम आल्याचा चहा दिला.चहा घेऊन तीला बरं वाटलं.चहा घेता घेता संपूर्ण घरावर तीने नजर

फिरवली.संपूर्ण घर झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांनी सजले होते.जिकडेतिकडे बायकांचा आवाज व श्रृंगार पाहून ती उभी राहिली.मनातल्या मनात देखण्या , रुबाबदार जगदिशचं रुप आठवून ताजीतवानी झाली आणि हाॅलवर जाण्याच्या तयारीला लागली.

       आईने जुईच्या कपाळाचे चुंबन घेतले.बाबांनी मायेनं तिच्या केसांवरून हात फिरवला.जुईमध्ये आणखी उत्साह संचारला आणि ती

पटापट तयारी करु लागली.

       हाॅलवर जगदिश जुईची वाटच पाहत होता.त्याने तिच्याकडं चोरटा नेत्रकटाक्ष टाकला.तीनेही त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केले.बरोबर बरीच ज्येष्ठमंडळी असल्यामुळे ती नवरीच्या खोलीत गेली.लग्न साग्रसंगीत पार पडले.

सगळ्यांचे पाहुणचार झाले.जुई , जगदिश संपूर्ण व-हाड वाड्यात आलं.

        प्रशस्त जुन्या पद्धतीचा वाडा,दारात गोकर्णीची वेल, दिमतीला नोकर चाकर,देखणा, आपली काळजी घेणारा जगदिश,आपल्या आई-वडिलांसारखे

जगदिशचे आई वडिल हे सारं पाहून जुईला भीती वाटू लागली की, आपल्या सुखाला कुणाची नजर तर नाही ना लागणार?कारण हळदीच्या वेळचा 

प्रसंग आठवत नसला तरी काहीतरी चुकीचं घडलं हे तीला सारखं जाणवत होतं मनात भीतीनं कापरं भरलं.हात थंडगार झाले.

        जगदिशने जुईकडे पाहिले.नाजूक, सुंदर जुईच्या चेह-यावर नव्या

 नवरीच्या तेजाऐवजी कसलीतरी चिंता आहे हे त्याने ओळखले.

        काय झालंय जुई?दडपण आलंय का?

            अं............ ना........ही..

        "मग चेह-यावर कसली चिंता दिसतीय?

       " घाबरू नकोस तू ईथल्या वाड्यातली परी आहेस ,तुझ्या मनाविरुद्ध ईथं कोणीही तुझ्या मनाविरुद्ध  वागणार नाही. Relax........

   जुईला जगदिशच्या हाताचा ऊबदार स्पर्श उर्जा देवून गेला पण मन मात्र चिंतेच्या खाईतच होते.मनात तरंगणा-या विचारांचे ढग घेऊन जुई सजवलेल्या प्रशस्त मऊमऊ गादी असणा-या पलंगावर बसली होती.मधुचंद्राची खोली छान 

सजवली होती.खिडक्यांना लावलेले निळसर सोनेरी पडदेअधिकच खुलून दिसत होते.

        जुई विचार करु लागली. जगदिश खोलीत आल्यानंतर त्यांच्याशी खूप खूप बोलायचं ,तो किती चांगला आहे याबद्दल धन्यवाद द्यायचे.

आणि मग त्यानंतर त्याच्या कुशीत शिरुन स्वत:ला वाहून द्यायचंअशा विचारात असतानाच जगदिश खोलीत आला.

      "मग काय चाललंय आमच्या परी राणीचं?".

      "काही नाही.जगदिश तुम्ही किती चांगले आहात. मी कोणत्या जन्मी

पुण्याईचं काम केलं असेल तेव्हा तुम्ही मला मिळाला आहात."

      " ए, वेडाबाई असं नाही बोलायचं"असं म्हणत जगदिशने तीला जवळ घेतले तोच जुईला विजेचा शाॅक लागल्यासारखे झाले.ती काही केल्या जगदिश ला जवळ येऊ देईना.जगदिशला काही कळेनासे झाले.

        तीच्या आवाजात बदल झाला.ती एका पुरुषी आवाजात बोलू लागली." मला हात लावायचा नाही .मी ...मी....माधव. जुईचा मित्र.आम्ही काॅलेजमध्ये असल्यापासून माझे जुईवर प्रेम होते.मला तीला एक ना एक दिवस प्रपोज करायचे होते पण हिंमत नव्हती.मी खूप लाजरा होतो आणि एक दिवस तीचे तुझ्याशी लग्न ठरलेल्याचे समजले.मी पुरता वेडा होऊन आत्महत्या

केली.मी जुईला माझ्याशिवाय कोणाचीही होऊ देणार नाही. हे माझं बंद कुपीतलं प्रेम आहे."आवाजातला स्वर चढता होता.

          खोलीतला मधुचंद्रासाठी सजवलेला बिछाना पेटला.खिडकीचे पडदे पेटले,आग पसरु लागली.बेडरुममधून धूर उसळू लागला.

          जुईच्या देहातून एक सफेद आकृती पुसट होत जाताना दिसली

आणि जुईच्या थकलेल्या अवस्थेत कासावीस होऊन जीव गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance