भय...
भय...
एक दिवस मी आणि माझा भाऊ घरात झोपलो होतो. आमच्यासोबत आई पण होती. बातम्यांमध्ये जोरदार पाऊस सांगितलं होता. म्हटलं आता काय होतंय काय माहित... खूप पाऊस पडत होता. झाडे पडून गेली. बाहेर बघितलं तर सगळं असं जोरात पावसाचा आवाज येत होता. पत्र्यांचा आवाज पण ऐकू येत होता. पण हा पाऊस सगळीकडे होता. पण आवाजाने जीव नुसता कासाविस झाला होता. रात्राभर पाऊस होता. पुरुष कोणीच नाही. कशी तरी ती रात्र निघाली तेव्हा कुठे बरं वाटलं. ती रात्र आम्ही कधीच विसरू शकणार नाही.

