भय अलक-नजर
भय अलक-नजर
अरविंदा नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. हिरवी पैठणी, हिरवा चुडा आणि रंगलेली मेहंदी तिचा गौरवर्णं अजूनच खुलत होता. आज तिची पहिली रात्र होती. अनुराग खोलीत आला. तस अरविंदाची धाकधूक अजुनच वाढली. अनुराग तिच्या जवळ बसला. तीच रूप न्याहाळत त्याने आपल्या हाताने तिच्या हनुवटीला हलकेच धरून तिचा चेहरा वर केला. तिची खाली असलेली नजर वर झाली आणि अनुरागला त्याच प्रतिबिंब तिच्या डोळ्यात दिसलं. जे पूर्ण पणे उलट होत. आणि त्याला काही कळायच्या आत अरविंदाने तिचे अनुकूचिदार सुळे त्याच्या मानेत रुतवले आणि काही क्षणात त्याच सगळं रक्त लुचून घेतलं.

