भविष्याची आस
भविष्याची आस
मी एका खेडेगावातून शहराकडे स्थंलातरीत झालेली मुलगी. जन्मतःच माझ्या वाटेला संघर्ष हा आलेलाच. सगळं बालपण हे कुटुंबियाच्या आजारपणात कसं गेलं हे कळलंच नाही. साधारणतः 11ते 12 वर्षााची असल्यापासुनच माझ्यावर एक प्रकारची जबाबदारीचं आलेेेली होती. माझ्या वडिलाचं आजारपण सुरू झालेलं होतं. त्या कारणास्तव मला माझं गाव सोडावं लागलं. इयत्ता 6पर्यंत माझं शिक्षण हे 'जिल्हा परिषद' या शाळेत झालं. नंतर मला शहरातल्या अनोळख्या शाळेत टाकण्यात आलं.
तसं तर मी अभ्यासात शहरी मुलांपेक्षा मध्यमच हुशार होते. पण माझ्या अभ्यासाविषयी असलेल्या जिज्ञासेेेने मला अभ्यासाविषयी ओढ लावली. मी सन 2019-20या शैक्षणिक वर्षात 10मध्ये 91%प्राप्त करून उत्तीर्ण झाले. हा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझं घर तर अगदी
फुलासारखं बहरून गेेेलं होतं. आई बाबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडून वाहू लागले. आता सगळं काही छान होणार. माझ्या आई बाबांचं स्वप्न पूर्ण होणार असं वाटतं होतं पण नियतीची मात्र वेगळीच इच्छा होती.
एका महिन्याच्या आत माझ्या वडिलाचं हृदयविकारानेे निधन झालं. दिव्याची उजळलेली ज्योतच शांत झाली होती. सगळीकडे अंधार पडलेला होता.
माझ्या घरात मीच मोठी. सगळी जबाबदारी मला नकळतपणे स्वीकारावी लागली. सगळी मााझी स्वप्नं अंधूक दिसत होती. काय करावंं हे काहीचं सुचत नव्हतं. मी सारखी मनातल्या मनात रडायची आणि माझ्या मनातल्या भावना ओळखणारी ती एकमेव माझी आई होती. आई म्हणाली की बाळा! आपण
तरी बाबा नसताना तुटपुंज्या उत्पन्नावर जगतो. तू त्यांचा विचार कर ज्यांना दिवसेंदिवस खायलाही मिळत नाही. तुझ्या बाबांंनी तरी सर्व जबाबदाऱ्या पेलत तुला आयुष्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय.
अगं जगात असेही काही लोक आहेत ज्यांना आई बाबांचं प्रेम काय असतं हेच माहित नाही. बाळा! रडून प्रश्न सुटत नाहीत तर रडणं सोडून दिल्याने
प्रश्न सुटतात. आयुष्यात संकट ही आपली नेहमीच क्षमता तपासतात. आईनं माझ्या मनातल्या निराशेला दूर केलं आणि मला नव्या आशेने आयुष्य जगण्यासाठी प्रेरीत केलं.
तेव्हापासून मी मुळीच न रडता हसत खेळत येईल त्या संकटाचा सामना करायलाा शिकले. भविष्याकडे मी नवीन आशेने बघायला लाागले आणि त्या दिवशी ठरवलं की असं प्रेरणादायी व्हायचं की माझ्यापेक्षा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या प्रत्येकाला एक नवा आशेचा किरण मिळाला पाहिजे.
