सप्तरंगी स्वप्न
सप्तरंगी स्वप्न
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रंगढंगाचे स्वप्न असतात. हे स्वप्नच आपल्याला जगण्याची उमेद देतात. प्रत्येक जणच आपल्या स्वप्नांसाठी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील असतो. स्वप्न असतात अखंड आशेने भरलेली,हिंमतीच्या बळावर चाललेली,आत्मविश्वासाने खंबीर असलेली,गुरुजनांच्या आशीर्वादाने परिपूर्ण असलेली,शिकस्त प्रयत्नांने भरलेली.स्वप्न हसवतात,स्वप्न रडवतात,स्वप्नच आपल्याला भक्कम बनवतात. एखादे विशिष्ट ध्येय साध्य केल्यानंतरच जगाला आपली गुणवत्ता समजत असते. स्वप्नांमुळेच आपण स्वतःला ओळखू शकतो. अशीच बहूढंगी स्वप्न प्रत्येकाच्या आयुष्यात असलीच पाहिजेत. जेणेकरून आपल्याला जीवनाची शैैैली समजेल. आयुष्याची गोडी लागेल. विशेषतः कष्टाची जाणीव होईल. इंद्रधनुच्या कमानी सारखी स्वप्नांचीही कमान असावी. ज्यात विविध रंंगढंगाचे स्वप्न असावेत.त्या कमानीखाली आपण बसून तर पहा आयुष्य किती मौलिक आहे हे समजेल.
स्वप्न असावीत निसर्गाच्या संपत्ती प्रमाणे ज्या निसर्गााामध्ये रमणीय अशा विविध कुुुशलतेचा साठा असतो. ज्यात नकळत एक आगळेवेगळे सौंदर्य खुलते.
अशीच रंगीबेरंगी,विविध ढंगी स्वप्न आपण प्रत्येकजणच उराशी बाळगून असतो. ती स्वप्न जपा,त्या स्वप्ननांना पूर्ण करा. कारण स्वप्न बदलवतात माणसाला.
