वाईट वृत्ती
वाईट वृत्ती
प्रत्येक जण म्हणतो की हा जो आहे तो खूप वाईट आहे किंवा त्याची वृत्ती खूप वाईट आहे. पण मी मला आलेला अनुभव सांगणार आहे. खरं तर ना जगात कोणीच वाईट नसतं, द्रुष्ट नसतं. भोवतालची परिस्थितीच एखाद्याला वाईट बनायला भाग पाडते. कोणालाच वाटत नसतं कोणाच्याही आयुष्यात वाईट घडावं पण परिस्थिती तसं घडवते आणि काही गोष्टी मनाला पटत नसल्यातरी कोणाच्यातरी दबावाखाली त्या स्वीकाराव्या लागतात. खूप शूरवीर म्हणतात की कोणालाही घाबरायचं नाही,कोणाच्याही दबावाखाली राहायचं नाही पण...
जगात असेही काही लोक आहेत ज्यांना जबरदस्तीने कोणााच्यातरी दबावाखाली राहावं लागतं. आणि अनेकदा खूप जण म्हणतात की ही ही अमूक गोष्ट म्हणजे पाप आहे आणि 'पाप हे पापच असतं.' पण ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट नाईलाजास्तव करावी लागत असेल तर ती व्यक्ती पापी म्हणायची का? असो. खरंतर जगात कोणीच चांगलं-वाईट किंवा पापी - पुण्यवान नसतं प्रत्येकाचे विचारच, भोवतालची परिस्थिती एखाद्याला घडवत किंवा बिघडवत असते.
