कुजबजलेलं आयुष्य
कुजबजलेलं आयुष्य
माझ्या काॅलनीमध्ये काही अंतरावरच कारखान्याला जाणार्या कामगारांची झोपडपट्टयांची वस्ती आहे. त्या झोपडपट्याच्या अगदी शेवटच्या टोकाला कारखान्याला जाणार्या कामगारांच गरीब कुटुंब राहतं. रोजंदारीच्या आशेने ते कुटुंब खडकांवरच आपली झोपडी बनवून राहत होते. ती वस्ती पार करून मी रोज माझ्या शाळेला जायची त्या कुटुंबातीलच 'मनिषा ' नावाची मुलगी माझी मैत्रीण झाली होती. ती माझ्याहून 3-4 वर्षाने लहानच होती. मनिषा दिसायला खूप सुंदर होती. सरळ नासिका,पाणीदार डोळे,कुरूळे केेेस,गोबरे गाल. तीला बघून सगळ्यांनाच प्रश्न पडायचा की हे रत्न झोपडीत कसं काय?
मनिषाही माझ्याच शाळेत होती पण कधीकधी ती शाळेत यायची नाही. त्यामुळे माझी फारशी तिच्याशी भेट होत नसे. दिवस जाता जाता माझी दहावी कधी चालू झाली कळलंच नाही. जास्तीच्या तासिका शाळेत सुरू झाल्यामुळे सारखं सारखं त्या वस्तीपासून माझं नेहमीच जाणं येणं चाालू होतं .
एके दिवशी शाळेतून घरी जात असताना अचानक एक मुलगी माझ्या डोळ्यासमोर तिच्या बाळाला हातात घेऊन आली. माझी हरवलेेेली मैत्रीण पुन्हा सापडली. मला पाहताना मनिषाच्या डोळ्यातूून पाणी ओसंडून वाहत होतं. मी तिला मोठ्या धीराने विचारलं की तुझं लग्न कधी झालं? तिने मला तिच्या झोपडीत नेलं एका छोट्याशा चूलीवर चहा टाकतं असताना मला ती तिच्या कुजबजलेल्या आयुष्याची कहाणी सांगत होती. अगं श्रुति आमच्यासारख्या झोपडपट्टीतल्या पोरीचं आयुष्य असंच असतं.माझ्या बा च्या मालकाच्या पोराचा माह्यावर लई डोळा होता .सारखा साारख त्यो आमच्या झोपडीत यायचा. एकदा त्यानं मह्या बा कड लगीनाची मागणी घातली.आणं म्हणाला की तुह्या पोरीचं मह्याशी लगीन केलं तर बरयं नाही तुला कामावरच घेणार नाही. माझ्या बा ला त्याचा लई ताण आला. आणं त्याला वाटलं मव्ह लेकरू चांगल्या घरात जाईल मालक लई श्रीमंत आहीत. आण आपल्या पोरीचं तरी काय करायचं घरी ठेवून.. ना तिचं धड आपल्यामुळं शिक्शन व्हायलयंं ना कामावर नेता यायलयं म्हणून बा न माझं लगीन त्या पोराशी केेेलं. त्याला बी लई दारू प्यायचा नाद होता .
रात्री दारु प्याऊन त्यो घरी माझं शरीर उपभोगायचा त्याच्यापासून लांब पळायला लागले की चुलीतल्या जळक्या लाकडाचे मला फटके मारायचा असेच दिस मव्हा छळ करीत गेेले. आणंं पंधरा दिसाअगुदर हे पहीलं पोरगं झालं. मनिषाचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले होते.
पंधरा दिसाची मी वली बाळंतीण मी तरी बी मव्हा सासरा म्हणतोय की तूू एक तर भिकारीन तुह्यामुुळं आमची पाहूण्याामंदी इज्जत गेली. आता तू तुह्या नवर्यासोबत दुुसरीकड जाय सासर्यान बी घरातून हाकलून दिलं. आता मी इथ खुरपायला चालली आण मव्हा नवरा बा सोबत जातु कामाला. लई आयुष्याची परझड झाली बघ काय पाप केेलं ग म्या ?रडक्या आवाजात मनिषा बोलत होती. मी तीला धीर दिला व म्हणाले की अग मनिषा तुझं बाळ एकदा मोठं झालं की सगळं व्यवस्थित करेेल. त्याच्याकड बघून जग.जड अंतःकरणांने मी मनिषाचा निरोप घेतला.
कुजबजलेलं आयुष्य हा लेेख लिहीताना माझ्याही डोळ्याला पाणी आलं .ग्रामीण भागात मुलींंच्या असुरक्षिततेच्या भितीपोटी व गरीबीला कंंटाळून त्यांचे आई वडील मुलींचे अल्पपवयातच लग्न लावून देतात .
खरंच ही एक आपल्या सामाजिक आरोग्यासाठी दुखःद बाब आहे.
