Jalu Gaikwad

Horror

3.3  

Jalu Gaikwad

Horror

भितीचा एक दिवस

भितीचा एक दिवस

5 mins
306


एक गाव अस विशिष्ट थोड अगळ वेगळं पण खूप छान होत,जेमतेम दोन हजार लोकसंख्या असलेले ते गाव विशेष म्हणजे त्या गावास जाण्यास कमीतकमी च्यार ते पाच तास किलोमीटरचे अंतर कापून जावे लागत असे.आपण चालत जरी जायचे म्हंटले तरी काहीही वाटत नशे.जाताना मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विशाल महाकाय दरी कडा इतकी भीतीदायक होती की  विचारण्याची सोय काय नाही, गाडी चार चाकी यदाकदाचित गाडी जर गलतीने काही का असेना नजरचुकीने दरीत कोसळली तर रस्त्यावर धाऊ शकत नाही इतकी कंडीशन खराब होत होती. असा हा रस्ता असे झाडे-झुडपे कडेने खूप होते दिवसा मात्र खूप सुंदर असा निसर्ग, मात्र अंधारी रात्री सुसाट असा भीतीदायक रोड, रात्रीचा प्रवास कोणीही करत नसत तो पाई असो अथवा गाडीने इतका भीतीदायक कारण या आधी अशा कित्येक या रोड वर घटना घडल्या त्या कारणाने रात्री प्रवास कोणीही करत नसत


गाव तसं खूप छान न्यार येथील लोकसंख्या कमी असल्या कारणाने गावामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडत असत गावात एक छान खूप छोटेसे मंदिर होतो, त्या गावांमध्ये पाणीदेखील मुबलक प्रमाणात होतं, पाण्याचा कालवा देखील होता त्यामुळे गावात पाण्याची कमतरता अजिबात नव्हती तेथे शेती ही खूप चांगल्याप्रकारे पीकत असे. पण एक मात्र खंत अशी होती की त्या गावांमध्ये आपली मुलगी कोणी देत नसत कारण तो रस्ता आडवळणी भितीदायक.


पण त्या गावातील व्यक्ती शहरात राहत असत ती व्यक्ती खूप मोठी पैशाने व आर्थिक दृष्टीने मनुष्यबळाने बलवान धनवान होती. त्या व्यक्तीस काही वैयक्तिक कारणाने त्याला गावी यायचं होतं. आणि तो शहरातून गावी येण्यासाठी निघाला. ही त्याची पहिलीच वेळ होती गावी येण्याची आणि पहिलीच रात्र होती. आणि शेवटची सुद्धा त्या रस्त्याने तो पुन्हा कधी आलं नाही आणि गेलाही नाही त्याचे कारण त्याला आलेला अनुभव निघण्यास निघाला सकाळी बाहेर पडला शहरातून येण्यासाठी त्याला कमीत कमी पाच तास लागे, त्यामुळे तो दिवसा बाहेर पडला दिवसा येण्याचे कारण म्हणजे ती महाभयंकर रात्र डोळ्यापुढे येत असे पण त्या व्यक्तीस असेच वाटत की आपण लवकरात लवकर दिवसाआड घरी जाऊ असा त्याचा उद्देश होता पण नियतीच्या पुढे कोणाचे काय चालत नसे. त्याला काय माहिती आपल्याला त्या अंधाऱ्या रात्रीला सामोरे जाणे लागने आहे


त्यानंतर अकरा बाराच्या सुमारास तो व्यक्ती थोड्या अंतरावर येऊन ठेपला गाडी थांबून नाश्तापाणी कडून थोड्यावेळाने तो परत गाडी चालू करतो पण आपल्या दिशेने निघून जातो थोडा वेळ जात असताना अचानक गाडीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण येते. गाडीमध्ये पेट्रोल तर खूप होते पण गाडीचा स्टार्टर बसत नव्हता फक्त त्याच्या गावाला जायचा रोड अगदी दोन तासाच्या अंतरावर होता त्यात हा खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहिला जणू देव माझी परीक्षा बघत आहे आणखी एक म्हणजे की रात्र डोळ्यापुढे दिसत होती गाडी बिघडल्याने मला वेळ खूप होत होता आणि पाच ते सहा तासाने रात्र होणार होती मनात भीती बसली होती गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन तो दुसरा प्रायव्हेट गाडीने मेकॅनिककडे जाऊन तो मेकॅनिकलला घेऊन येतो गाडी दुरुस्त करण्यासाठी सांगतो मेकॅनिक गाडी पाहून काम सुरु करतो आणि ओके ही करतो पण गाडी कमीत कमी दोन-तीन मिनिट चालू होते आणि बंद पडते


त्याच्यानंतर त्याने पुन्हा गाडी ओके करण्याचा प्रयत्न केला पण गाडी चालू झाली नाही तो म्हटला गाडी गॅरेजला घेऊन जावे लागेल त्यासाठी दोन दिवस लागतील गाडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो लवकर ओके नाही होणार असे ऐकताच हा व्यक्ती खूप घाबरून जातो कारण त्याचा वेळ खूप जात होता कारण त्याला त्याच्या गावाच्या रस्त्याने जायचं होतं पण ते दिवसा आता मात्र संध्याकाळ होत राहिली काहीतरी विचार करून गाडी गॅरेजमध्ये ठेवण्याचा विचार करून तो तिथून निघून जातो. आणि प्रायव्हेट गाडी ची वाट बघू लागला दुसरा पर्याय नव्हता गाडीची वाट बघता बघता एक बस त्याला भेटली त्या बस मधून बसून तो आपल्या गावाच्या दिशेने गेला गाडी त्याच्या गावाच्या स्टॉप पर्यंत आले तो उतरला आणि पाहिलं की अंधारच अंधार आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा होता.


आता मी कुणाला सांगू कोणाला बोलू कोणाला फोन लाऊ कारण दिवसभर फोन वापरून वापरून विचार झाला होता त्यामुळे त्याचा वापर तो जाताना करू शकत नव्हता आता मात्र रात्रीचे दहा वाजले होते. तो असंच हळूहळू चालत राहिला धडपडत राहिला त्याला मनाशी वाटत होतं कोणीतरी येईल आपल्या मदतीला कोणाचा तरी गाडी येऊन जाईल पण तसं काहीच नाही झालं रस्त्यातून जाताना असे वाटते की आपण एका गुहेतून जात आहे असा हा रोड, त्याला जाण्याची भीती नव्हती त्याला भीती फक्त एक अंधाराची कारण काहीच दिसत नसेल आकाशातील प्रकाश सुद्धा दिसत नसेल कारण दोन्ही बाजूने झाडाने वेढलं होतं. त्यामुळे नाजुक सा प्रकाश सुद्धा रस्त्यावर पडत नव्हता इतका काळाकुट्ट अंधार. अवघ्या अर्ध्या तासाचा रोड पण बीचाराने अख्खी रात्र काढली.


कसेबसे निघत निघत रात्रीचे बारा एक वाजले कधी कधी कळलेच नाही मी इतका रूबाबत राहणारा कधी गाडीतुन खाली नाही उतरलेला आणि आज हे माझा हाल, अचानक आकाशामध्ये वीज कडाडली पावसाची चाहूल लागली हळू हळू पाऊस येऊ लागला आता मात्र खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला कारण आडोशाला काहीच नव्हते आता मात्र भिजत जावे लागेल. अचानक एका गाडीचा आवाज प्रकाश अंधुक अंधुक दिसला आणि तो खूप खुश झाला जणू देवानेच माझ्यासाठी पाठवले आहे गाडी जवळ येताच तो पटकन गाडीमध्ये उडी मारून बसतो, थोडा मनाला धीर वाटू लागतो. पण पावसात भिजल्यामुळे त्रास खूप होत होता गाडी हळू जात असताना पुन्हा एकदा जोरात मोठ्याने अचानक विज मोठ्या प्रमाणात कराडचे प्रकाश त्याला खूप मोठा दिसत आहे आणि ज्या गाडीमध्ये बसला होता त्या गाडीमध्ये ड्रायव्हर सीटवर कोणीच नव्हते गाडी आपोआप चालत होती, हेच हेच पाहताक्षणी तो एका गावाजवळील मंदिरासमोर गाडीतून उडी मारतो आणि तेथे जाऊन तो बसतो, जणू असे वाटले देवाने ती गाडी माझ्यासाठी पाठवली पण जे प्रकाशामध्ये जे पाहिलं ते वेगळच वातावरण झालं होतं आता मात्र पहाट होत होती सकाळचे सहा वाजले तो तिथून उठला आणि आपल्या घरी जाण्यासाठी निघाला.


तो कुडकुडत घरी पोहोचला. आणि हा रात्री झालेला प्रकार सर्व गावकऱ्यांना सांगितली आणि आपल्या गावकऱ्यांसाठी योग्य असा नवीन मार्ग काढू असा मोठा निर्णय घेण्यात आला शासनाकडे प्रस्ताव गेला काही दिवसांनी प्रस्ताव मंजूरही झाला नवीन मार्ग शोधण्यात आला आणि नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले, त्यानंतर गावकरी खूप आनंदात राहिले नवीन रस्त्याने परत भीतीचे वातावरण राहिले नाही पण त्या रात्री चे रहस्य हे रहस्यच राहुन गेले की त्या गाडीमध्ये कोणीच नव्हतं पण गाडी चालली कशी होती हे मात्र परमेश्वराची लिला होती काय??? आणखी काय वेगळं विचित्र रहस्य आज पर्यंत खुलं नाही झालं........


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror