STORYMIRROR

vaishali vartak

Tragedy Others

2  

vaishali vartak

Tragedy Others

भेट अखेरची

भेट अखेरची

3 mins
22

वाढदिवसाचा दिवस . खर पहाता तर , आता काही जन्म दिवस साजरा करण्याचे वय नाही . आणि तसे ही आपल्याकाळीं कुठे लहानपणी आजच्या सारखे वाढदिवस साजरे करायचे.कित्येक घरी तर आज वाढदिवस माहीत पण नसायचे. पण , सध्या तर वाढदिवस साजरे करण्याचे फँडच झाले आहे. अगदी सकाळपासून आपण फोन जवळ अथवा फोन हाताशी घेऊन बसावे लागते . आणि व्हाट्सअपवर तर वाढदिनाच्या शुभेच्छा दुथडी भरुन वहात असतात....मग 2/4 तासांनी..... धन्यवाद देणाचे काम करावे लागते . .... त्याशिवाय हल्ली तर आदल्या दिवशीच रात्री 12 वाजता, दिवस सुरु म्हणून बारापर्यत जागून केक कापणे ..शुभेच्छा देणे चालते. अर्थात तिच्या कडे रात्री ला केक कापणे झाले ही नव्हते व होत पण नव्हते. पण सकाळ पासून फोन ची वर्दळ सुरु झाली होती. त्यामुळे ती पण येणारे फोन रिसीव्ह करत होती. तसे पहाता... तिचे फारसे लक्ष नव्हते.....येणा-या फोनकडे. पण काय करणार? फोन तर घ्यावे लागत होते. आणि मग ओघाने .....बोलणेही आलेच. फोन आला की डोळ्यात पाणी तरारायचे, थोडा दाटलेला आवाज व लगेच समोरुन सांत्वनाचे संभाषण. खरच आहे .दिवसच तिच्या साठी तसाच होता. सकाळी तिने चहा घेतल्यावर कपाटातून चार गुलाब डायरीत ठेवून वाळवून (वाळलेले आपल्यासाठी बर का ! पण तिच्या साठी ते गुलाब अजून तितकेच टवटवीत आहेत .) त्या वाळविलेल्या फूलांची तयार केलेली फ्रेम हातात घेऊन , क्षणभर पहात असता नकळतच अश्रूंचा वर्षाव त्या फोटो फ्रेमवर होत होता.... हो ...तशीच आहेत ती फूले. तिला वाढदिनाच्या दिवशी, तिच्या मिस्टरांनी दिलेली फूले होती ती.. तिने ती फूले प्राणापलीकडे जपलीत .अगदी शेवटची आठवण नात्याने तिने त्या फूलांची फ्रेम करुन घेतली व ती फ्रेम तिला जवळ असली की मिस्टर अजून सोबत आहेत असे वाटते. त्यांच्या सहवासाचे मानसिक सुख तिला मिळते . त्या फ्रेमशी ती बोलते. व सहवास सुख अनुभवते. खरच 4/5 वर्षापूर्वी जन्मदिवस निमित्तानं दोघे जण एकत्र मssस्त बाहेर जेवावयास गेले . आल्यावर एकत्र बसून निवांत नेहमी प्रमाणे गप्पा केल्यात....तसेही त्यांच्यात वाद फारच कमी व्हायचे. ... फारच कमी जोडपी अशी असतील..... हल्लीच्या काळात , कीं वाद नाही होत. नक्कीच दोघे एकमेकास पूरक होते. वरूनच जोडी देवाने करून पाठविली होती म्हणायचे. एकदुजेके लिए म्हणतात ना तसे जोडपे होते. गप्पा झाल्यावर दुपारचा चहा घेऊन तिचे मिस्टर तिच्या संमतीने कल्ब मधे ब्रीज खेळावयास तिला येतो म्हणत निघाले. येथे घरी संध्याकाळी दीर व वहीनी शुभेच्छा देण्यास व, संध्याकाळी एकत्र जेवण करुयात असे आमंत्रण देण्यास आले होते. दीर म्हणाला, वहिनी असेही ,....तुम्ही , मियाबिबी सकाळी एकत्र जाऊन आलाच आहात .आता रात्री आपण एकत्र जेवुयात .असे ही मुलगा परदेशात व मुलगी तिच्या सासरी तिच्या संसारात रममाण. त्यामुळे तुम्ही दोघे आम्हीही दो.चला य मग आमच्याच कडे तेथेच एकत्र जेवु हो ,चालेल की असे म्हणत तिने संमती पण दिली. थोड्या गप्पा झाल्या ...सकाळी कुठे जेवलो त्याचे वर्णन झाले. तेवढ्यात फोन आला. भावजींनी फोन जवळ असल्याने त्यांनी फोन घेतला . आणि. !... ऐकावे ते नवलच.! धक्का देणारे ,आकाश कोसळल्या गत... तिचा दीर अस्वस्थ दिसला. फोन ठेवत ,तो म्हणाला ,"" दादाला हॉस्पिटल मधे नेले आहे. आपल्याला तिकडेच निघावे लागेल .लगेच तीघे जण हॉस्पिटल मधे जावयास निघाले. असे काय झाले असेल ह्या विचारात पोहचले. पण,... दुर्दैव आड आले. तिच्या मिस्टरांची प्राण ज्योत आधीच मालवली होती.... सर्वच अचानक. .....नाही त्रास.... नाही दुःख... सर्वच अघटित.....दिवसभर दोघांनी... दिवस छान मजेत घालविलेला. काय .... आणि संध्याकाळ,.. एकदम जोडीतील एक जीव होताचा नव्हता झाला . काय झाले असेल? कसा विश्वास ठेवायचा? . आत्ता जातांना माझ्या सोबत स्वतःच्या हाताने बागेतील गुलाब फूले खुडून आणलीत काय !...आणि म्हणाले "हं हा एक गुलाब माझ्या लाडक्या हो हो माझ्या लाडक्या मुली कडून तुला. हा एक तुझ्या लाडक्या मुलाकडून.तुला. आणि हे एक ...नातंडांकडून ... आणि हे माझे स्वतःचे माझ्या प्रिय बायकोसअशी ही फूले देत ,पुन्हा वाढदिनाच्या शुभेच्छा देत.हसत मुखाने निरोप घेत ,"येतो" म्हणत निघालेला, सदा active तिचा जोडीदार तिला कायमचा सोडून गेला होता. सहाजिकच ती शेवटची फुलांची वाढदिनाची भेट ठरली होती. तिने पण अगदी प्राणापलीकडे जपली आहेत.,आज पण ती फूले तिला , "मी तुझ्या जवळच आहे "ची सदा जाणीव देत असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy