बाळू आणि त्याची गंमत
बाळू आणि त्याची गंमत
पांच वर्षाचा बाळू आज खूप खुश होता.दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तो त्याच्या आजीकडे कोकणात निघाला होता.सकाळीच आईबाबांनी त्याला घाईत उठवले होते आणि आता त्यांची कार कोकणच्या मार्गावर धावत होती. बाळूच्या आनंदाचे कारण म्हणाजे आबांकडे त्याला कार्टून नेटवर्क बघायला मिळायचे ज्याला मुंबईला बंदी होती. आनंदाच्या भरात वाट केव्हा संपली ते कळलेच नाही त्याला आणि आता तो आबांच्या घरासमोर उभा होता.तो गाडीतून उतरून आबांच्या घराकडे धावतच गेला. घाईघाईने आबा आजीला नमस्कार करून लगेच टीव्हीचा रिमोट हातात घेतला पण हे काय टीव्ही लागलाच नाही. आबांनी सांगितले की सध्या वीजखात्याचे काहीतरी काम चालले असल्यामुळे वीज चार वाजता नंतरच येईल आणि मगच त्याला टीव्ही पण बघता येईल.बाळू थोडासा हिरमुसला पण नंतर तरी बघता येईल ह्याचा विचारांनी वीज येण्याची वाट पाहू लागला. तेवढ्यात आईने त्याला जेवायला हाक मारली. जेऊन परत त्याने घड्याळाकडे बघितलं तर अजून दोनच वाजले होते.त्यांनी इकडे तिकडे बघितले.आजी आबा आणि आई सगळेच दुपारच्या झोपेत मस्त होते ,तो पण हळूच आईच्या जवळ जाऊन झोपला. आणि थोड्या वेळातच तो स्वप्ननगरीत प्रवेशला.
बाळूची आज परीक्षा संपली होती,म्हणून खेळायला मोकळा झालेला तो बाहेर आला खेळायला. पण त्याचे कोणीच मित्र नव्हते आले खेळायला.म्हणून वाट पाहत तो बागेतच बसला होता एवढ्यात त्याला काही छोटी मुले खेळायला येताना दिसली. ती जवळ आली तशी तो एकदमच आनंदाला. त्या मुलांमध्ये बद्रीनाथ, बुद्धदेव, छुटकी,राजू छोटा भीम सगळे आले होते...
त्यांनी सगळ्यांनी डबा ऐसपैस खेळायचे ठरवले.बाळू इतक्या आनंदात होता की स्वतः वरच राज्य घेऊन घेतले.ठरल्या प्रमाणे तो डोळे मिटून
झाडापाशी एक दोन तीन चार मोजत उभा राहिला आणि राजुने डबा दूर फेकला आणि बरोबरच सगळे जण लपले. दहा पर्यंत मोजून झाल्यावर बळूने डोळे उघडले.पाहतो तर कोणीच दिसेना,त्यांनी सगळ्यांना हाक मारली पण कोणी उत्तर नाही दिले. शेवटी त्याने तो डबा उचलून, ठरवलेल्या जागेवर ठेऊन सगळ्यांना शोधायला निघाला. बघता बघता तो बागेच्या एका कोपऱ्यात पोहचला. तिथे त्याला एक वेलीची कमान केलेली दिसली, त्या कमानी खालून जाताना त्याला डावीकडे एक दरवाजा दिसला. त्याला वाटले छुटकी तिथेच आहे म्हणून त्यांनी ते दार ढकलले .आणि हे काय दार ढकलताच समोर उभा होता लिटिल सिंघम.बाळूला वाटले आपण ह्याची मदत मागावी. ह्याला नक्कीच कळेल कोण कुठे लपले म्हणून. बाळूनी हळूच सिंघम ला विचारले,"मला मदत करशील का? सगळे लोक एकत्र लपले कुठेतरी मला इथे एकटे सोडून ".हे ऐकून सिंघम म्हणाला,"असे कसे सोडून जाऊ शकतात तुझ्या सारख्या छोटुश्या मुलाला." एवढ्यात बद्रीनाथ आणि बुद्धदेव नी जोरात शिट्टी वाजविली आणि ओरडले," सिंघम तू पण नाही शोधू शकत आम्हाला" हे ऐकून तर सिघमचा पित्ताचं गेला आणि तो ओरडला,"आता माझी सटकली".आणि त्यांनी सगळी कडे शोधायला सुरुवात केली.त्यांनी बाळूला एकीकडे बघायला सांगितले आणि स्वतः दुसरी कडे बघायला लागला.
इकडे बाळू पुढे वाढत चारीकडे बघत जात असता त्याला समोरं असलेला खड्डा दिसलाच नाही आणि तो त्यात पडला. रडवेला झालेला बाळू आता आई म्हणून रडणारच तेवढ्यात त्याला समोरून काहीतरी लाल निळे उडत येताना दिसले.जवळ आल्यावर बाळूला कळले की अरे हा तर स्पायडरमॅन. स्पायडरमॅन नी त्याला रडू नकोस सांगून त्याला उचलले आणि समोरच्या झाडावर बांधलेल्या जाळ्याचा टोकपर्यंत घेऊन गेला.स्पायडरमॅन त्याला "झाडावर बस मी येतो पांच मिनिटात" म्हणून निघून गेला. पण झाडावरून खाली पाहता बाळूची तर बोबडीच वळली.खूप उंच झाडावर बसवले होते त्याला स्पायडरमॅननी. बाळु ईकडे तिकडे बघू लागला.त्याला दुसऱ्या फांदीवर जग्गूबंदर दिसला. बंदरला बाळू ची भीती कळली होती त्यांनी त्याला उचलले आणि जिथे डबा ठेवला होता तिथे घेऊन जायला लागला पण डबाच्या जवळ उभा होता छोटा भीम.म्हणजे पुन्हा राज्य द्यायची पाळी बाळूवरच आली. पण बाळू आता रडकुंडीला आला होता म्हणून छुटकी स्वतः वर राज्य घ्यायला तयार झाली.
आता बाळूची लपायची पाळी होती पण त्याला काही सुचेना कुठे लपावे ते. तो विचार करत उभा राहिला तेवढ्यात बाजूला मिकी माऊस येऊन त्याला म्हणाला "ये माझ्या मागे मला लपायच्या खूप जागा माहित आहेत", बाळू त्याच्या मागे निघाला आणि एका बिळात जाऊन लपला.छुटकी ने सगळ्यांना शोधून काढले होते फक्त बाळू आणि मिकी सोडून म्हणून आता छुटकीच्या नकळत ह्या दोघांपैकी जर तो डबा कुणीतरी पुन्हा लांब टाकून आलं तर पुन्हा राज्य तिच्यावरच येणार हा नियम माहीत होतं बाळूला म्हणून तो बिळाच्या बाहेर निघायला लागला पण हे काय त्याचा हात तर बाहेर गेला पण पूर्ण शरीराला बाहेर जाताच येईना. तो जोरात जोरात ओरडू लागला," मला बाहेर काढा,मला बाहेर काढा" म्हणून.
आई त्याला गदागदा हलवून "उठ बाळा कुठे अडकला नाहीये तू" असे म्हणत होती. जागा झालेल्या बाळूला आईने ओरडण्याचा कारण विचारले तेव्हा त्यांनी कार्टून्स बरोबर कसा तो खेळत होता ह्याच वर्णन इतके निरागसपणे केले की आई आजी आणि आबा एकत्रच हसायला लागले आणि बाळूला काय खरे काय खोटे तेच कळेना.
