STORYMIRROR

Gauri Ekbote

Tragedy

2.0  

Gauri Ekbote

Tragedy

अश्वत्थामा आणि डॉक्टर यामिनी

अश्वत्थामा आणि डॉक्टर यामिनी

5 mins
3.2K


काही लोक आपल्या आयुष्यात येतातच मुळी थोड्या काळासाठी पण जे काही देऊन जातात ते अविस्मरणीय , अद्भुत , अनाकलनीय पण असू शकतं , असाच काहीसा अनुभव डॉक्टर यामिनी ला आला

डॉक्टर यामिनी म्हणजे एक शापित अप्सरा , दिसायला एकदम अप्रतिम .... हा शब्द पण कमी पडतोय , आरसपाणीच , बहुतेक देव खूप निवांत होता हिला बनवताना.. फिकट तपकिरी मोठे डोळे , सावळा वर्ण , उंची५.५ , सडपातळ अंगकाठी , कमरेपर्यंत रुळणारे केस , वय वर्षे २६ . Beauty with Brain हे समीकरण यामिनीला बघितल्यावर कळतं.

यामिनी पेशाने Dermatologists होती पण तिला ट्रॅकिंगची , भटकंती ची विशेष आवड होती , जेव्हा केव्हातिला वेळ मिळे ती एकटी किंवा ग्रुप बरोबर जात असे . नर्मदा परिक्रमा करण्याचं खूप दिवस पासून तिच्यामनात होत , त्या बद्दलची जवळपास सगळी माहिती तिने घेतली होती एका ग्रुप बरोबर तिने जाण्याचं ठरवलं

१४ दिवस १३ रात्र लागणार होते . सर्व इंदोर ला भेटून ओंकारेश्वर पासून परिक्रमा सुरु होणार होती. Online search , पुस्तक ह्यामुळे बरीच माहिती तिला मिळाली होती .एकदा असच वाचता वाचता यामिनीला झोप लागली आणि कुणीतरी खूप जुन्या दुखण्याने विव्हळत असलेला आवाज तिला आला . तो इतका जवळून आल्याचं तीला जाणवलं कि ती झोपेतून जागी झाली . सकाळचे ५. ३० झाले होते. ती उठली . फ्रेश झाली, योगा केला , आणि कामाला लागली ..

निघण्याचा दिवस आला मोजकंच सामान घेऊन यामिनी इंदोर पोहोचली , तो दिवस ते इंदोर मार्केट फिरूनदुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर ला निघणार होते

ओंकारेश्वर ला ग्रुप मधील काही लोकांनी पूजा करून संकल्प केला आणि परिक्रम सुरु झाली, ग्रुप मधले जबलपूर चे शर्मा uncle आणि यामिनी ह्यांची छान गट्टी जमली. त्यांना पण ट्रेकिंग , adventure ट्रेकिंग मध्ये इंटरेस्ट होता .

असच बोलता बोलता ते यामिनीला सांगत होते, “मा नर्मदा कि महिमा अपार है ! जिसे आम लोगों के लिये समझन और सुलझाना संभव नाही है !उनकी कृपा हमेशा अपने भक्तोपर बनी रहती है! यही वजह है कि वह ऊन भक्तो का भी ध्यान राखती है जो अपने किसी बुरे कर्म कि वजह से भटक गए और प्रायश्चित करना चाहते है !ऐसे हि एक चिरंजिव अश्वत्थामा है ! जो कहते है कि महाभारत के काल से मा कि परिक्रमा के परिसर मे रहते है” आणि त्यांनी तिला अश्वत्थामाची सर्व माहिती सांगितली तो कोण होता , कसा युद्धात कौरवां बरोबर पांडवां विरुद्ध उभा होता आणि कसा त्याला कृष्णा ने शाप दिला . बोलता बोलता खूप रात्र झाली होती म्हणून शर्मा uncle झोपायला निघून गेले पण यामिनीला काही झोप येत नव्हती , का कुणास ठाऊक आज तिला तो स्वप्नातला विव्हाळालेला आवाज आठवला , थोडे पाय मोकळे करायला म्हणून ती बाहेर पडली , काकांनी सांगितलेली गोष्ट आठवत ती चालत होती . आणि नकळत ती कॅम्प पासून खूप दूर गेली तिला कळलं पण नाही , आजूबाजूला खूप अंधार आणि जंगल होत एकी कडे नर्मदा नदी आणि दुसरी कडे जंगल असा तो पर

िसर होता ,, एक ठेच लागल्यामुळे यामिनी भानावर आली आणि तिच्या लक्षात आलं कि ती खूप लांब जंगलात निघून अली आणि मोबाइल पण कॅम्प मधेच राहिला , सुरुवातीला ती घाबरली पण थोड्यावेळाने सावरली नदीच्या काठावर बसू सकाळी नक्की कोणी तरी दिसेल असं तिला वाटलं

म्हणून काठावर एका जागी दगडावर बसली, वातावरण खूप मस्त आणि सात्विक होत , चंद्र पुर्ण होता, पौर्णिमेच चांदणं, भरून वाहणारी नर्मदा, आल्हाद दायक हवा, वातावरण दैवि झालं होत, खूप मस्त वाटत होत यामिनीला कुठलीही भीती मनात नव्हती, आणि मागून कुणीतरी येतंय असं तिला जाणवलं एवढ्या रात्री आपल्या सारखंच कुणी असेल असं तिला वाटलं आणि ती मागे वळली , बघते तर मागे एक उंचपुरा , पिळदार शरीरयष्टीचा, रुबाबदार , व्यायाम करून कमावलेलं शरीर , एका योध्या सारखा पण डोक्याला काहीतरी बांधलेला एक तरुण उभा होता. " कोण आहात तुम्ही , रस्ता भटकलात का ? मी काही तुमची मदत करू शकतो , तुम्ही खूप जंगलात निघून आला आहात " तो व्यक्ती बोलला. यामिनी "हो मी ... कदाचित खरंच रस्ता चुकले , पण तुम्ही ? तुम्ही पण का same pinch , बसा की इथेच सकाळ पर्यंत नक्की कुणीतरी येईल नदी काठी " तो व्यक्ती यामिनीच्या पुढे उभा राहतो " नको मी उभाच राहतो ,, तुमचं नाव यामिनी ना ... डॉक्टर यामिनी , पुणे " यामिनी दचकते "हो पण मी तुम्हला नाही ओळखत तुम्हाला माझं नाव कस माहित " "मी एक अंदाज बांधला असं काही नाही तूमच्या गळ्यात असलेल्या त्या (Icard कडे बोट दाखवत )बघितलं " "oooh हो मी डॉक्टर यामिनी डर्मिटोलॉजिस्ट आहे " "म्हणजे ? " यामिनी हसून "म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ " "म्हणजे एक वैद्य .... , चला वैद्यबाई आपण चालत चालत बोलू कदाचित योग्य रस्ता सापडेल, तुम्ही कसकाय इकडॆ आलात म्हणजे जवळपास कुणा कडे भेटावयास " यामिनी "नाही मी इकडे ट्रेकिंग ला आलेले आणि थोडा विचार करत करत रस्ता चुकले " "बर " , यामिनी - "तुम्ही इथलेच का ?" ती व्यक्ती "हो वर्षानुवर्ष , कदाचीत युगांयुग " "काय ?" "हो मी इथलाच " , यामिनी "ह्या जंगलात तुम्ही काय करताय "मधेच तीच बोलणं थांबवत "अरे तो खड्डा सांभाळा वैद्यबाई, नाही तर तुमच्या साठी आत्ता लगेच वैद्य शोधावा लागेल " "ooo इथली बरीच माहिती आहे तुम्हाला " "हो मी इथेच असतो बोललो ना " "हम्म , एक विचारू का "यामिनी म्हणते , "हो विचार कि " "हे डोक्याला काय बांधलय" "हे….. ती एक प्रायश्चित पट्टी आहे " , यामिनी" प्रायश्चित पट्टी?", ती व्यक्ती "हो खूप मोठी गोष्ट आहे ती " , यामिनी "बर , ती open करता का , I mean काढता का , मी एक डॉक्टर…….. , तुमच्या भाषेत वैद्य आहे बघू काय आहे ते " "नको " "अहो बघू कदाचित मी काहीतरी मदत करू शकेल " "अहो राहू द्या हो " "बघा बोलत बोलत आपण गावा जवळ आलो" "इथून पुढे जा तुम्ही, तुम्हाला तुमचा योग्य मार्ग सापडेल " यामिनी बघते तर दूरवर कॅम्प असतो, बऱ्यापैकी उजाडलेलं असत, आणि मागे वळून बघते तर ती व्यक्ती गायब झालेली असते


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy