अश्रूंचा अबोला...
अश्रूंचा अबोला...

1 min

601
डोळ्यातल्या अश्रूंचा अबोला
अनुत्तरीत असला तरीही
शब्दांपेक्षा अधिक बोलका
ते सूकूनही जातील कधीतरी...
उत्तराचा ठसा मात्र सोडून जातील
तसा शब्दांचा मार कायमचा
सलणारे, बोचणारे प्रश्न करणारा
पण शेवटी अश्रू बनूनच संपवणारा...
ध्यास असावा प्रेमाच्या मायेचा
कधी स्वतःच्या अंतर्मनाच्या 'स्व'चा
घडवेल आयुष्य आपल्या स्वनपूर्तीचं
नकळत देन प्रेमसाथीची स्वतःला...