STORYMIRROR

s Gingine

Romance

3  

s Gingine

Romance

अपूर्ण प्रेम❤️

अपूर्ण प्रेम❤️

1 min
3

साहिल आणि अंकिता एकाच कॉलेज मध्ये शिकत होते. दोघांची ओळख मैत्रीतून झाली.... पण नंतर त्यांची मैत्री खूप वाढत गेली आणि कधी ती मैत्री प्रेमात बदलली त्यांना च समजले नाही. साहिल खूप साधा आणि शांत मुलगा होता. आणि अंकिता खूप स्वप्नाळू आणि हुशार मुलगी होती. दोघेही रोज कॉलेज झाल्यावर भेटायचे, एकत्र फिरायचे चहा प्यायचे  आणि सोबत राहण्याचे आणि भविष्याचे स्वप्न बघायचे... एक दिवस अंकिता ने विचारले साहिल आपलं हे आयुष्यभर  असच राहील ना आपण आयुष्यभर असच सोबत राहणार ना ?"साहिल हसत म्हणाला, हो काहीही झालं तरी पण मी तुझ्यासोबत असेन." आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसत... कॉलेज संपले, आणि आता अंकिताच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला. तिच्या कुटुंबाने तीच लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले. अंकिता ने साहिल ला सांगितले, "मी तुझ्याशिवाय जगू  शकत नाही..."साहिलच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो म्हणाला, तुझं सुख माझ्यासाठी महत्वाचं आहे.. तू आनंदी राहिली पाहिजेस." लग्नाच्या दिवशी अंकिता खूप रडली... आणि साहिल दूर उभा राहून फक्त तीच सुख पाहत राहिला... शेवट: काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत... पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात...❤️🥹


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance