STORYMIRROR

Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

अंधश्रध्दा.

अंधश्रध्दा.

5 mins
198

     एका सरकारी कार्यलयातील एका वरिष्ठ चतुर्थश्रेणी कर्मच्या-याला त्याच्या शैक्षणीक पात्रतेमुळे व विभागाच्या धोरणामुळे त्याला पदोन्नतीवर त्याच्या कार्यभूमि वरुन दुस-या ठिकाणी स्थानानतरीत करण्यात आले होते. तो व त्याचे कुंटुंब फार आनंदात होते. कारण त्याच्या कुंटुंबातील तो पहिला व्यकित होता, जो सरकारी नौकर झाला होता. आणी आता त्याने ग्रुप तृतिय श्रेणीमधे उडाण घेतली होती.त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. त्याला तृटीयश्रेणी म्हणुन नविन ठिकाणी कार्यग्रहण करण्याची ओढ लागली होती. साधारणता बहुतेक कर्मच्या-यांची प्रबळ इच्छा जम बसलेल्या ठिकाणावरुण दुस-या नविन ठिकाणी जाण्याची फारशी नसते. त्याला पदोन्नती पण तीथेच मिळावी अशी मंशा त्याची असते. त्यासठी ते जीवापार प्रयत्न करित असतात॰ सर्व प्रयत्न असफल झाल्यावर ते पदोन्नती पण बहुतेक नाकारतात. सदैवाने त्याची कर्मभूमि आनी जन्मभूमि एकच होती. त्यामुळे तो कदाचित बढ़ती घेणार नाही असे नविन कार्यालयाच्या काही कर्मच्या-यांना वाटत होते. कारण त्या मागे त्यांचा निहित स्वार्थ होता. 

           जर त्याने पदोन्नती नाकारली, तर तीथल्याच कर्मच्या-याला तीथेच पदोन्नती मिळण्याची शक्यता दाट होती. पण तो कर्माचारी ग्रुप ” सी “ मधे येण्यासाठी हपापलेला होता. तो नियत तीथिवर नविन कार्यालयता कार्यग्रहण करण्यासाठे येवुन ठेपला होता. त्याच्या आगमणामुळे तुरळक कर्मच्या-यांची निराशा झाली होती. पण अधिकत्तम कर्मचारी खुश झाले होते. त्यांनी त्याचे नविन कार्यालयात व नविण श्रेणिमधे मनपूर्वक स्वागत केले होते. कार्यालय अधिकारी पण त्याच्या वर खुश होता.

       नविन कर्मचारी शारिरीक दृष्ट्या अत्यंत सड-पातळ व अशयक्त वाटत होता. तो बोलतांना सारखा हाफत होता. त्याने स्वतःने कबुली दिली की तो दम्याचा जुना रोगी होता. त्याला नंतर कार्यालयात येण्यास विशेष त्रास होवु नये म्हणुन अधिका-याने त्याला तीथील कॉलोनी मधे क्वाँटर देण्यात यावे म्हणुन प्रधान कार्यालयाला विशेष सिफारीश पण केली होती. त्याला सरकारी निवास मिळाले होते.

       मुलांच्या वार्षिक परिक्षा झाल्या नंतर तो आपले कुंटुंब नविन ठिकाणी घेवुन आला होता. त्याला दोन मुली आणी दोन मुल अशी एकूण चार संतती होती. मोठी मुलगी दुस-या गांवी पॉलीटेकनिक करुण राहिली होती. ती साधरण मुलगी होती. खेटे घेत –घेत तीने अंतिम वर्षात प्रवेश केला होता. परिवार अत्यंत खुश होता, कारण मागे-पुढे आपली मुलगी इंजिनिअर होणार !. बाकी त्याची मुले शाळते जाणारी होती. त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणुन प्रयत्नशिल होता. काही दिवसातच त्याचा चांगला ठाव-ठिकाणा जमला होता. आता परिवाराची सांसारीक गाडी रुळावर वेगाने धावु लागली होती. त्या कुंटुंबाचा वाड-वडिलांचा बिडी बनवण्याचा व्यवसाय होता. तो धंदा ते जुण्या ठिकाणी अतिरिक्त आमदाणी मिळावी म्हणुन करित होते. नविन ठिकाणी पण त्याने आपल्या अनुभवा प्रमाने बिडीच्या व्यवसायीकाला गाठले होते. तो त्याच्या कडुन बिडी बनवण्याची सामग्री आणत होता. आणी तयार बिडया घेवुन जावुन, पुन्हा नविन सामग्री आणत होता. संपूर्ण परिवार त्यात लागला राहत होता. कार्यालयात कोणालाच काहीच आक्षेप किंवा किरकोळ त्रास नव्हता. अधिकारी-याची पण त्याच्या धंदयाला मुक सहमती होती. तो आपल्या मोठया परिवारासाठी अतिरिक्त धन अर्जित करण्यात त्याला काही वावगे वाटत नव्हते. सगळ काही सुरळीत चालत होते.

       अचानक एके दिवशी त्याने अधिका-याला संध्याकाळी धार्मिक पुजा-पाठ आहे म्हणुन संपूर्ण परिवाराला आमंत्रीत केले होते. अधिका-याने उत्सुकतावश अन्य कर्माच्या-यांना कार्यक्रमा विषयी विचारपूस केली होती. संधी मिळताच सर्व कर्मचारी साहेबाच्या आजु-बाजुला जमा झाले होते. सर्वांनाच चांगले माहित होते कि त्यांचा अधिकारी हा वैज्ञानिक दृष्टिकोण व वैज्ञानिक स्वाभावाचा होता. त्याला जादु-टोणा व अंधश्रेधेवाले अन्य धार्मिक कर्मकाण्ड पटत नव्हते. तो त्याचा फार विरोधी होता। अंधश्र्ध्दा निर्मूलन चळवळीचा समर्थक पण होता. तो छत्रपति शिवाजी, तुकाराम, माहात्माफुले, आंबेडकर ते डॉ.दाभोलकरांचे उदाहरणे नेहमी देत होता. त्यामुळे कर्मच्या-या त्यांना धार्मिक पुजे बद्दल कसे सांगावे हे त्याच्या पूर्वी उमजत नव्हते. अनायसे त्यांना ती सुवर्ण संधी प्राप्त झाली होती. तेव्हा काही कर्मच्या-यांनी त्याला सांगितले कि नविन कर्मच्या-याच्या छोट्या मुलीच्या आंगत आठवडयातुन दोन दिवस देवी येते !. बरेच भक्तगण तीच्या दर्शानासाठी त्या दिवसावर येत असतात. देवी त्यांना आर्शिवाद देते. आणी मग त्यांची समस्या दूर होते. हे सर्व ऐकल्यावर अधिका-याचे काण उभे झाले होते. आणी त्यांनी लगेच आपला निर्णय सांगितला की ती मानसिक रोगी आहे. तीचा योगी तो लगेच उपचार करने आवश्यक होते. अन्यथा त्या मुलीचे जीवन धोक्यात येईल !. असा इषारा अधिका-याने दिला होता. तेव्हा एक कर्मचारी म्हणाला होता कि साहेब जुण्याठिकाणी त्यांचे स्वतःचे मंदिर होते. त्या दिवसावर तीथे बरेच भकतगण येत होते. परिवाराला चांगला चढावा मिळत होता. परिक्षेच्या दिवसात विद्यार्थांची तीच्या कडे झुंबड होत होती. ती परिक्षेत येणारे प्रश्न सांगत होती. ते विद्यार्थी तिच्या कडे विषयाचे पुस्तक देत होते. जिथे ती बोट ठेवत होती. त्याच प्रश्नवर ते खुन करत होते. आणी त्याच प्रश्ननांची तयारी करुन ते आपले भविष्य घडवित होते. तेव्हा अधिकारी त्यांना म्हणाला, जर हे खरे होते. तर तीची मोठी बहिन मेरिट आली असती. व ती देशातील नामवंत इंजिनिअरिंग कॉलेज मधुन इंजिनिर झाली असती. ती कां बरं, पॉलीटेकनीक मधे खेटे घेत बसली होती. तीने आपल्या बिमार पापाला कां बर दुरस्त अजुन पर्यंत केले नाही !. तो कसा तरी उभा राहतो. आणी पूर्ण शक्तिने दोन –चार शब्द मोठया मुशकिलने बोलतो. संपूर्ण स्टॉफ चिडीचुप झाला होता.

        अधिकारी व त्याचा परिवार पुजा-पाठ मधे गेले नव्हते. पण कॉलनीत त्याला भीड आणी आकाशात त्याच्या निवासस्थानी खुप दाट धूर पसरलेला दिसला होता . हा नजारा तो नंतर नेहमीच पाहत होता . संविधानाने प्रत्येकाला आपल्या रुढी ,विश्वासाप्रमाने धार्मिक विधी करण्याचा अधिकार दिला आहे। याची जाण त्याला होती. या धुरामुळे त्याच कर्माचा-यांची प्रकृति नेहमीच ढासळत होती. त्याला सहकर्मिंनी अनेकदा रुग्णालयात भरती केले होते.

            त्या मुलीला मानसिक रोग होता. वया प्रमाने तो सारखा वाढत चालला होता. तीच्या हालचाली कडे अधिका-याचे लक्ष्य होते. तीला त्या अधिका-या विषयी व्देष निर्माण झाला होता, कारण तो त्याचा परिवार सोबत कधीच तीच्या दर्शनासाठी गेला नव्हता. व्देष सारखा संचित होत गेला होता .आनी मनुरुग़्णा प्रमाने काही कारण नसतांना तीने अधिका-याच्या परिवारा सोबत भांडण केले होते. तेव्हा नंतर त्याने त्याचा परिवाराला समजावण्याचा प्रयास केला होता. आणी तीला कोणत्या तरी चांगल्या मनोचिकित्सकाला दाखवण्याचा सल्ला दिला होता. पण संपूर्ण परिवाराने सर्व-शक्तिने अधिका-याचा विरोध केला होता. तेव्हा पासुन अधिका-याने आपले कान पकडले होते आणी त्याने त्यांना त्यांच्या कर्मावर सोडुन दिले होते. सुदैवाने काही महिण्यातच त्याची दुस-या ठिकाणी बदली झाली होती.

      त्याच्या ठिकाणी नविन अधिकारी आला होता. जुण्या अधिका-याच्या प्रसंगावरुण तो बरच काही शिकला होता. राव गेले आणी पंत आले होते. त्या परिवाराच्या व्यवहारत काही फरक पडला नव्हता. पण नंतर त्याच्या जिवणात धक्कादायक प्रसंग ओढावल्या गेला होता. प्रत्येक आठवडयात होना-या धूरामुळे त्याची प्रकृति सारखी ढासळत गेली होती. डॉक्टरांनी त्याला धूरापासुन दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण अंहकार ,खोटी प्रतिष्ठा व आर्थीक बाबीमुळे त्याच्या परिवाराने धार्मिक विधि बंद केली नवहती. विनाश कारी विपरीत बुध्दी॰ तो शेवटी अस्थमाच्या शेवटच्या टप्यात पोहचाला होता. आणी शेवटी श्र्वास घेणे कायमचे कठिन झाले होते. जर त्या परिवाराने पूर्वीच्या अधिका-यांचे म्हणने ऐकले असते, तर घरप्रमुखाचा हात सगळयांच्या डोक्यावर कायम असता !. आनी मुलगी दुरस्त होवुन तीने आपल्या उज्जवल आयुष्याची वाट-चाल सुरु केली असती !.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy