अनामिक भय
अनामिक भय


एक अनामिक भीती सतत पाठलाग करत रहाते,
माझ्यातला आत्मविश्वास कमी करत रहाते,
मनासारख्या जगण्याला छळत रहाते,
जगण्याचा गुंता वाढवत रहाते ,
कुठल्या वेळी कुठलं रूप धारण करेल ते सांगता येत नाही ...
कधी पुरूषातील स्त्री तर कधी स्त्रीमधील
पुरूष जागृत होउन मानगुटीवर बसतो,
कथा कादंबर्या मधील भूत मग प्रत्यक्षात अवतरण लागते ,
कोणत्याही कामात आड येत रहाते...
ताठ मान माझी मग
सहारा शोधत रहाते ...
सहारा शोधत रहाते ...