अलक अतिलघुकथा
अलक अतिलघुकथा


अलक १
एक दिवस बाजारात फिरताना अननस विकणारा व्यक्ती दिसला. दिवसभर त्याची विक्री झाली नव्हती. थोडा तो नरव्हस दिसत होता, तिकडूनच एक व्यक्ती जात होता आणि त्याचा चेहरा बघून तो भावूक झाला व पूर्ण अननस घेऊन त्याचे पैसे त्याला देऊन तो समोरच्या बागेत गेला अन् तिथे खेळणाऱ्या मुलांना ते अननस वाटून दिले... त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व फळविक्रेत्या माणसाचा आनंद बघून त्या व्यक्तीला खूप समाधान वाटले.
अलक २
सई आॅफिसला जात होती. जाताजाता सिग्नलवर एक सुंदर मुलगी दिसली, पोटाची खळगी भरण्यासाठी गजरे विकत होती. केविलवाणा चेहरा बघून सईच्या मनाला खूप असवस्थ वाटले की या मुलीचे वय शिक्षणाचे पण परिस्थितीमुळे तिला असे गजरे विकावे लागतात... पण सईने पुढचामागचा विचार न करता तिच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. तातडीने तिने दुसऱ्या दिवशी त्या मुलीचे अँडमिशन एका शाळेत करुन राहण्याची व्यवस्था केली व तिच्या आयुष्यात मोरपंखासारखे रंग भरुन तिचे जीवन रंगमय केले. नातं कुठलंच नाही पण माणुसकीचं नातं सईने निर्माण केले...
अलक ३
एक वेळ असा होता, आम्ही मैत्रिणी एकत्र आल्याशिवाय करमत नव्हते. शाळेला सोबत, डब्बा खायला सोबत, सर्व गोष्टी आमच्या छान रंगायच्या. आमची मस्त ओसरी होती तिथे आम्ही सुट्टीच्या दिवशी खेळायचो आणि खूप धमाल असायची. पण, आज सर्वजण चारी दिशांना आहोत कधी गाठभेट नाही कधी फोन नाही. माझं नशीब! एका वळणावर ग्रुपमधली एक मैत्रीण भेटली, ती जेव्हा भेटली तेव्हा सर्व बालपण डोळयासमोर उभं झालं... तिच्या काॅन्टॅकमध्ये बऱ्याच मैत्रिणी होत्या... तिच्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो व लहानपणाच्या आठवणींना उजाळा मिळाला...