तोच जुना रस्ता
तोच जुना रस्ता

1 min

1.3K
*तोच जुना रस्ता*
निर्मनुष्य रानात
भेट तिची झाली
डोकावून पाही
फुले पाने वेली...(१)
अनोळखी झालीज
आवडणारी वाट
होता जेव्हा तिथे
प्रेमाचा तो थाट...(२)
तोच जुना रस्ता
छळतो मनाला
हजारो तुकडे
झालेल्या देहाला...(३)
आठवाचे ओझे
घेऊन हृदयात
मिटली पापणी
काही क्षणार्धात...(४)
पापणीत लपली
तुझीच ती छाया
तू लावली होती
प्रेमळ मज माया...(५)