Vishal Kadlag

Inspirational

3.5  

Vishal Kadlag

Inspirational

अब्दुल कलाम जीवनप्रवास

अब्दुल कलाम जीवनप्रवास

1 min
112


बालपणातील स्वप्ने आयुष्यात खरी होतात का? डॉ. अब्दुल कलामांच्या बाबतीत तरी हे नक्की म्हणता येईल की, बालपणातील स्वप्न आयुष्यात खरी होतात!

कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ या दिवशी चेन्नईजवळच्या रामेश्वरम या गावी झाला.त्यांचं लहानपण याच गावी गेलं. या गावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला समुद्रकिनारा. गावातली सगळी लहान मुलं या समुद्राच्या अंगाखंद्यावर वाढली, अस म्हटल तरी चालेल.कलाम यांच्या वडिलांचा व्यवसाय तर मासेमारी करण आणि नावा चालवणं हा होता.त्यामुळे लहानपणी वडीलांसोबत तासनतास समुद्रावर असायचे. वाळूत खेळण आणि शिंपले गोळा करणं हा त्यांचा छंद होता. या किनाऱ्यावर कायम सीगल पक्षी यायचे. या पक्ष्यांकडे बघत बसणं, त्यांच निरीक्षण करण त्यांना फार आवडायचं. एकदा त्यांना वडिलांकडून कळलं की हे पक्षी कितीतरी मैलांचा प्रवास करून इथे आलेले आहेत, तेव्हा त्यांना सीगलविषयी फारच कुतुहल वाटायला लागलं, या पक्ष्यांना उडता कस येत? हे पक्षी न थकता उडू कसे शकतात? आपल्यालाही अस उडता येईल का? उडण्यासाठी काय बर कराव लागेल? असे अनेक प्रश्न त्यांना पडायचे.


आपणही असाच आकाशात संचार करावा, असं त्यांना फारच मनापासून वाटायचं, हेच त्यांचं लहानपणच स्वप्न आपण विमानाचा पायलट व्हायचं, विमानात बसणारा रामेश्वरममधला पहिला मुलगा आपणच व्हायचं,अस ते स्वप्न पाहत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational