Vishal Kadlag

Others

4.0  

Vishal Kadlag

Others

पुनर्जन्म... (एक थरारक प्रसंग)

पुनर्जन्म... (एक थरारक प्रसंग)

2 mins
277


दुपारची वेळ होती वडील मला म्हणाले तुला यायचे का काकांच्या (वडिलांचे मित्र) गावी ..चल ..आम्ही निघालो व काकांना घेतलं आणि गावी जाण्यासाठी निघालो ..आणि पावसाळा असल्यामुळे वातावरण एकदम सुंदर (fresh) ,थोडासा पाऊस येऊन गेला होता ... आणि हळू हळू आमचा प्रवास सुरू झाला. मग ते दोघं मित्र असल्यामुळे एकदम हसत, खेळत ,बोलत एकदम मजेत प्रवास चालू होता.


प्रवासाचे निम्मे अंतर पार केले आणि मी मग माझा मोबाईल काढला आणि म्हटल बघावे किती अंतर राहील ते(google map) वर ...आणि इतक्यात एका वळण रस्त्याला आमच्या वाहनाच्या समोरून जोरात एक मोठ वाहन (long bolero) समोरून येताना दिसली मग वडिलांनी गाडी ची गती (speed)कमी असल्यामुळे गाडीचा ब्रेक दाबला व....वडील व काका ओरडायला लागले अरे भाऊ ..आणि बोलता बोलता भाऊची गाडी एकदम जोरात येऊन आमच्या वाहनाला येऊन धडकली आणि तीही wrong side ला येऊन आणि मी गाडीच्या मागे असल्यामुळे मी ही एकदम अदळलो आणि बघतो तर काय पायांना मार लागलेला ...आणि एक क्षण असा आला की काहीच सुचेना आणि मग मी क्षणात सावरलो पुढे बघतो तर वडिलांना मार लागलेला व काकांना डोक्याला जबर मार लागलेला मग गाडीतून उतरून पटकन वडील व काकांना गाडीच्या बाहेर काढले ..


समोरच्या गडीतला भाऊ तर बघायला तयार नाही आणि त्यात भाऊनी full मद्यपान केलेलं भाऊला तर खरचटले सुद्धा नव्हते. त्यात काकांना खूप लागलेलं त्यांना दवाखाण्यात घेऊन जाण्यासाठी एकही गाडी थांबेना आणि तो भाऊ बोलतो की जा तुम्ही जा...मग (मनात विचार आला की खरंच आजकाल माणुसकी शिल्लक आहे की नाही एक माणसाला गंभीर दुखापत झाली आहे आणि एकही माणूस मदत करत नाही याला काय म्हणावे मग काही वेळाने आसपासच्या लोकांनी आम्हाला दवाखान्यात नेले....


मग मी विचार करायला लागलो की आपणच सर्व गोष्टींचे शोध लावले. गाडी पण आपणच बनविली सर्व सुखसुविधा पण आपणच तयार केल्या पण माणसाकडे आजकाल time च नाहीये मग वेळे पायी एखाद्याचा जीव जरी गेला तरी कुणाला काडीचा ही फरक पडत नाही ...आणि मला वाटतय माणुसकी नावाची गोष्ट एक नावापुरतीच शिल्लक राहिली आहे......


पण या सर्व काही क्षणात आम्हा तिघांचे प्राण वाचले याला काय म्हणावे नशीब (luck) की पुनर्जन्म ....मी तर याला पुनर्जन्मच म्हणेन आणि तो अपघात इतका जबरदस्त होता की गाडी तर पूर्ण फुटली पण समोरच्या आम्ही वाचलो...

खरच हा आयुष्यातला पहिला पुनर्जन्माचा थरारक प्रसंग होता...🙏


Rate this content
Log in