STORYMIRROR

Vishal Kadlag

Others

2  

Vishal Kadlag

Others

... Father's day.....

... Father's day.....

1 min
106

पपा, बाबा, डॅडी, वडील, डॅड, पिता, पिताजी खरच काय शब्द आहेत ना हे ... आज fathers day .खरतर fathers day हा एका दिवसाचा कधीच नसतो. कारण वडिलांचं महत्व एक दिवसांचं कधीच असू शकत नाही.


वडिल काय असतात हे त्या व्यक्तीलाच कळतं ज्याचे वडील लवकर देवाघरी गेले आहेत.कारण वडिलांचं अस्तित्व असं आहे की जे आपल्याला कायम जगाशी भिडण्याची,लढण्याची शक्ती देतं. कारण वडील ही एक अशी व्यक्ती आहे.जी शब्दांमध्ये कधीच व्यक्त होऊच शकत नाही.


वडिल ही व्यक्ती आपल्या सोबत असेल तर आपण जग जिंकू शकतो आणि जिंकल्यानंतर सर्वात जास्त आनंद ही वडिलांनाच होतो. वडिलांना अमुक अमुक काम आहे असं एकदा सांगितलं ना मग ते पूर्ण होणारच यात काही शंका नाही, मग ते काहीही असो.


प्रत्येकाची सुरुवात ही वडिलांपासूनच होते आणि त्यांच्यामुळेच आपण पहिल्यांदा ओळखले जातो. ते वडीलां मुळेच, कारण वडील जीवनाची सुरुवात आहे,ओळख आहे,करियर आहे,प्रत्येक निर्णय म्हणजे वडिल आहे. प्रत्येक गोष्ट ही वडिलांचीच देणगी आहे . वडील हे सर्वस्व,सर्वकाही,पूर्णब्रह्म ,पूर्णत्व आहेत . 


.............. वडील हे असं नाव आहे जिथे सर्व काही आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन