Vishal Kadlag

Others

3.9  

Vishal Kadlag

Others

वडील .....जीवनाचे खरे शिल्पकार

वडील .....जीवनाचे खरे शिल्पकार

2 mins
208


वडिल जीवनाचे खरे शिल्पकार...

* म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल..*


*• कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.*


*• वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका....*


*• वडिलांचा आदर करा..त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील..*


*• वडिलांचा सन्मान करा,यातच तुमचे भले होणार...*


*• वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल..* 


*•वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला....


*• वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात..


*• वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका....


*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही ... आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही..पण बाप तो बापच असतो..


*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे... पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.

*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल..

*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते...तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही...


*बाप असो वा वडील...तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही...


*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो...हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही..


*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे,धगधगता अग्नी आहे..पण मावळला की सर्वत्र अंधार आहे..


*म्हणूनच म्हणतो,, बाप बाप असतो...आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही...मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही...


*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही...


*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही..


 *आपल्या वडिलांना मानसन्मान देऊन बघा ...आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही...!


Rate this content
Log in