आठवणीतली कॉलेज लव्ह स्टोरी
आठवणीतली कॉलेज लव्ह स्टोरी


मला आजही आठवतात, माझ्या कॉलेजमधले ते दिवस... मी खूप एन्जॉय करायचे कॉलेजमध्ये... खरं सांगायचं झालं ना पहिल्यांदा दहावी पास होऊन मी कॉलेजमध्ये गेले ना एवढी एक्साईट नव्हते, पण ओके मी मस्तीत मिरवणारी होती. कॉलेजचा पहिला दिवस मला आजही आठवतो. नवीन मिळणारे मित्र-मैत्रिणी नवीन सर, टीचर... खरं सांगायचं झालं ना मी कॉलेजमध्ये असताना मला नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि खूप मित्रसुद्धा मिळाले. मित्र म्हणायला तर सौरभ सॉलिड होता. आणि आहेसुद्धा. आम्ही मैत्रिणी ट्युशनमध्ये सुद्धा एकत्र होतो. माझ्या काही मैत्रिणी गावाकडच्या तर काही शहराकडच्या होत्या. मी शहरामध्येच होते. माझे काही मित्रसुद्धा बाहेरगावचे होते. कॉलेजमध्ये येताना त्यांना थोडा त्रास व्हायचा पण कॉलेज आमचं खूप मजेशीर होतं. कॉलेजमध्ये आम्ही खूप मज्जा करायचो. कॉलेजमधले तास आणि आम्ही कॉमर्स स्टुडंट त्यात खूप मजा यायची. अकाऊंटचे सर आम्हाला खूप छान शिकवायचे. फेवरेट सर होते ते आमचे आणि आत्तासुद्धा आहेत.
माझ्या कॉलेजमध्ये ना एक मानसी नावाची मुलगी होती. म्हणजे माझी मैत्रीण होती, पण आम्ही एवढं क्लोज नव्हतो, क्लासमेटसारखी होती. दिसायला खूप सुंदर, लांब सडक केस तिचे, दिसायला नाजूक गोरी गोरी पान, गुलाबी ओठ, तपकिरी डोळे, नाजूक होती ती आणि प्रेमळसुद्धा होती. तेवढेही रागीट स्वभावाची पण शांत होती ती. कॉलेजच्या दिवसांमध्ये ना प्रत्येक कॉलेजमध्ये एक सुंदर हिरोसारखा मुलगा असतो, म्हणजे दिसायला बरं... आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे आमच्या क्लासमध्ये मोहित नावाचा मुलगा होता. दिसायला खूप छान होता तो. गोरा पान सुंदर होता आणि तो प्रत्येक मुलीला वेड लावणारा होता. सगळ्या मुली त्याच्यावर फिदा व्हायच्या. पहिल्या नजरेत कुणालाही तो आवडेलच असा होता. मला स्वभाव तर त्याचा माहिती नव्हता, पण सगळे म्हणतात छान आहे तो आणि कॉलेज म्हटलं की मित्र-मैत्रिणींमध्ये राग असतोच ना प्रत्येकालाच असतो, त्यात काही नवल नाही. तो माझ्या क्लासमधला हिरो होता ना म्हणजे मोहित त्याला सगळे लाडाने माही म्हणायचे. इव्हन सर पण म्हणायचे लाडाने लाडका होता. तो आणि माही सोबत राहणारा त्याचा जिवलग मित्र म्हणजे सागर आणि तोसुद्धा छान होता.
नवीन कॉलेज आणि नवीन लोकं यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये एक नवीन परंपरा होती ती म्हणजे की सगळ्यांनी कॉलेजमध्ये पारंपारिक कपडे घालून यायचं. तर मुलींनी असं ठरवलं होतं की आपण सगळ्यांनी साडी घालायची आणि बॉईज लोकांनी त्यांना आवडेल ते घालायचं. तर त्या दिवशी कॉलेजमध्ये फंक्शन असताना मानसीने खूप छान फिक्कट गुलाबी कलरची साडी त्यावर मॅचिंग, बांगड्या, नथ आणि तिला शोभेल असेच सुंदर हलकंसं मेकपसुद्धा तिने केलं होतं. त्यात ती दिसायला खूप सुंदर आणि त्याही पेक्षा सुंदर तिच्या अंगावरची साडी तिला खूप शोभून दिसत होती. त्यावर आमच्या क्लासचे बॉईज लोक पण काही कमी नव्हते, सगळ्यांनी रंगीबिरंगी जसे रंग उधळले असे कपडे सगळ्यांनी घातले होते. त्यामध्ये आमचा माही, कॉलेजचा हिरो तो आधीच गोरा असल्यामुळे त्याने ब्ल्यू कलरचा शर्ट घातला होता. त्यावर ब्लॅक कलरचा जीन्ससुद्धा आणि त्यावर तो खुप सुंदर दिसत होता आणि त्याने डोळ्याला गॉगलसुद्धा लावलेला. आम्ही तर पाहताक्षणी त्याच्यावर फिदा झालेलो तर खरी गंमत आता होती.
ती म्हणजे ज्यावेळेस आमच्या लाडक्या माहीने मानसीकडे पहिली नजर टाकली त्याच वेळेस तिच्या प्रेमात पडला असे बॉईज लोक म्हणायचे हा मला नाही माहिती आणि मानसीही त्याला बघता क्षणी थोडी लाजलेली होती. आणि त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग अजूनच उठावदार दिसत होता. गुलाबी दिसत होती ती, पूर्ण लालीलाल झालेली मानसी आणि माहीला सगळे एकमेकांच्या नावाने चिडवायचे आणि काही दिवसांमध्ये त्यांचे दोघांवर कधी प्रेम झालं ते कळलंच नाही. छान दिसायचे ते दोघं. मानसीसुद्धा शांत होती त्याच्यापुढे आणि तो पण शांतच होता. आणि त्यामध्ये ते असतं ना कोणी नजर लावायला येतं दोघात तिसरा मग त्यात तिसरा व्यक्ती कोण तर माझ्याच कॉलेजमधली माझी मैत्रीण ऐश्वर्या. दिसायला ती पण छान होती. सावळा वर्ण रेखीव डोळे नाजूक ओठ आणि बारकीशी होती ती. तिलासुद्धा माही आवडायचा. आमच्याप्रमाणेच ऐश्वर्यासुद्धा शांत स्वभावाची होती. बरं ते आमच्यासमोर हा पण मात्र मनात तिच्या वेगळेच काही असायचं. जेव्हा मानसी माहीसोबत काही कॉलेजच्या कामानिमित्त बोलायचे तेव्हा ऐश्वर्याला खूप चीड यायची. राग यायचा मानसीला आणि माहीला एकत्र बघितल्यावर. ऐश्वर्याला ते नकोसं वाटायचं. पण काय असतं ना प्यार तो किसी एका होता है दुसरे से तो हम बाट नही सकते ना... पण काही असो, आम्हा सर्व मैत्रिणींना मानसी, ऐश्वर्या आणि माही यांची लव्हस्टोरी म्हटलं, तर मज्जा यायची.
लव्ह स्टोरी हा शब्द काढला तर आम्ही आणखीनच त्या तिघांची खिल्ली उडवायचो तसेच ट्युशनमध्येसुद्धा आमचा अख्खा क्लास सोबत होता. आणि सातपुते सर तेच आम्हाला अकाऊंट शिकवायचे. कॉलेजप्रमाणे ट्युशनमध्ये सुद्धा आमचे बरेचसे प्रोग्राम चालायचे. आता या तिघांच्या लव्ह स्टोरीला एक वेगळंच वळण मिळणार होतं ते म्हणजे आमच्या क्लासेसमध्ये रक्षाबंधनाचा अनोळखी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र यायचं आणि त्यामध्ये गंमत अशी की जेवढे पण बॉईज होते. त्यांना प्रत्येकांना एका मुलीने राखी बांधायची त्यात आमचा लाडका माहीसुद्धा होता. त्यात माझं नशीब फारच खराब त्यादिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू असताना नंबरवाईज एका एकाना जायचं होतं. त्यामध्ये माझा नंबर आणि आमचा लाडक्या माहीचा नंबर एकाच वेळेस आला. शीट मला तर खूप दुःख झाले त्यावेळेस. माझ्या कॉलेजच्या लाडक्या माहीला मी राखी बांधली, त्यादिवशी खूप वाईट दिवस होता तो. मी देवाकडे मनोमन प्रार्थना करायचे मला माही नको येऊ देऊ. पण शेवटी उपरवाला अभी क्या कर सकता है... विधात्याने लिहुन ठेवले असेल की काय माहिती नाही पण मला नाईलाजाने माहीला त्या दिवशी राखी बांधावी लागली आणि त्या दिवसापासून आमच्यात भाऊ आणि बहिणीचे नातं.... असो पण त्या दिवशी काही वेगळेच घडणार होतं मानसीच्या आयुष्यात.
आमचा सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप प्रोग्राम झाल्यानंतर एकत्र जमला होता. त्यामध्ये मानसी आणि ऐश्वर्यासुद्धा होते बसलेले. त्यामध्ये आमच्या क्लासमधली लाऊडस्पीकर म्हटलं, तरी चालेल ती म्हणजे माया ऐश्वर्या आणि मानसीला तिने एक टोला दिलाच लाडक्या माहीचा. तो म्हणजे असा दोन शिकारी आणि एक पक्षी. आता याचा अर्थ काय तर मानसीने फारच मनावर घेतलं, ती बिचारी माया गंमत करत होती. आम्हीसुद्धा मजाक करत होतो तिची, पण तिला ते आवडलं नाही म्हणजे मानसीला बरं... तर त्यामुळे आमच्या मानसीने एक निर्णय घेतला, त्याच वेळेस की माहीला ती भाऊ मानेल. आम्ही मानसीला खूप समजून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. शेवटी सगळे आपापल्या घरी जात असताना मानसीने माहीला आवाज दिला. माही थांब म्हणून आणि त्याचक्षणी, तिने बॅगमधूनच माहीसाठी राखी काढली आणि त्याला बांधून दिली. तो बिचारा काय करणार खाली मान घालून त्याने ती राखी बांधून घेतली. फार वाईट वाटलं आम्हाला. पण साधीभोळी मानसी तीसुद्धा कुणाला सांगेल. डायरेक्ट सांगणारीसुद्धा नव्हती ती आणि त्याच वेळेस ऐश्वर्याच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. ऐश्वर्याला वाटलं, की त्या दिवसापासून माही माझा... तर तो तिचा गैरसमज होता. त्या दिवसापासून, सगळं बदललेलं होतं. मानसी मानसीच्या कामांमध्ये व्यस्त होती. तर माही बिचारा लांबूनच मानसीकडे चोरून नजरेने बघत असायचा, ऐश्वर्याने खूप प्रयत्न केला, माही सोबत बोलण्याचा तिच्या मनातले बोलसुद्धा तिने सांगितलं असेल कदाचित त्याला. पण तो मात्र तिला साध्या मैत्रिणीप्रमाणे समजायचा. खरंतर आम्ही चार-पाच मैत्रिणी मुलींमध्ये असायचो, तर ऐश्वर्या आणि तिच्या काही मैत्रिणी त्यांचा व्हाट्सअप ग्रुप होता. आमच्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा, आम्ही फक्त बघत बसायचं बघता बघता कॉलेजची परीक्षा आणि कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. आम्ही तेव्हा बारावीमध्ये होतो. तेव्हाच हे सगळं घडलेलं. आम्ही सगळे आता नवीन वाटेवर होतो. सगळे आपापल्या गावी जाणार होते. आणि सगळ्यांना नवीन मार्ग मिळणार होता. प्रत्येकांनी आपल्या भविष्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं. कॉलेजची मस्ती आणि कॉलेजची ती लव्ह स्टोरी त्या तिघांच्या आठवणी आजही आठवणीतच आहे. अकरावीपासूनची मैत्रीण आणि त्यातले अनुभव खरंच खूप अविस्मरणीय आहे. कधी विसरू नाही शकत, त्या दिवसाला मी...