anjali wadurkar

Others

2  

anjali wadurkar

Others

तिच्या मनाविरुद्ध

तिच्या मनाविरुद्ध

3 mins
104


लग्न हे आयुष्यातील नवीन वळणावर म्हणतात की लग्न हा त्या स्त्रीचा दुसरा जन्मच असतो, पण हं खरा विचार केला तर त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला काय? वाटतं ते कुणीही विचारत नाही. लग्न या अडीच अक्षरी असलेला, शब्द आयुष्यातील नवीन रंग त्यात असलेले सुख, दुःख संपूर्ण जगाचं

त्यात सामावून ठेवलेला आहे. असं मला वाटतं लग्न म्हटलं, की अंगाला काटा येतो. माझ्या खरं ना मला असा प्रश्न पडला आहे. लग्न मला करायचं की माझ्या घरच्यांना कळतच नाही. माझ्यापेक्षा माझ्या लग्नाची खूप घाई घरच्यांना असते, त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो, हो हा लग्न म्हणजे, बघा, ना एक स्त्री एका जन्मात, स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून एक आई म्हणून एक आजी म्हणून असे बरेसचे नाव तिला या जन्मात म्हणजेच तिचे रुपं बघायला मिळतात, कधी कोणीतरी तिचा विचार केला असेल का? हा विचार करतात. पण फक्त तिच्या घरचे कशाकरिता करतात की मुलगी वयात, आली आहे आणि आता तीच लग्न, करायला हवं म्हणून करतात, मला असं वाटतं मुलीला तिच्या मनासारखं वागताच आलं नाही हो कसे तर लहानपणापासून ती मुलगी तिच्या आई-बाबांच्या हाताखाली वावरते आणि लग्नानंतर ती तिच्या नवऱ्याच्या मनासारखं वागेल, मग यात तिचं अस्तित्व कुठे आहे़.


मान्य करते की, तिचं जीवनच असतं असं कुटुंबांना समजून घेणं. पण कुटुंबाचंसुद्धा असत ना तिच्याप्रति आयुष्यातील तिच्या जीवनातील निर्णय तिला स्वतः घ्यायला, आणि ती स्वतः घेऊन सुद्धा शकते, ती मुलगी तिच आयुष्य तिच्या मनासारखं घालवू शकते, तिच्यातही क्षमता आहे. तिचं अस्तित्व निर्माण करण्याचं तिचं अस्तित्व आहे. या जगाच्या विरुद्ध जाऊन लढणाच , स्वतःच्या अधिकार मागू शकते . जेव्हा एखाद्या मुलीला तिच्या घरी पाहुणे पाहायला येतात. तेव्हा त्या मुलीला तयार करून त्या पाहुण्यांसमोर कांदेपोहे द्यायला लावतात, त्या वेळेस त्या मुलाला त्यांच्या कुटुंबांना ती मुलगी पसंत पडली की लग्न करून टाका. असे त्या मुलांचे घरचे निर्णय घेतात. मग हा कोणता न्याय फक्त त्या मुलाला ती मुलगी पसंत पडली म्हणजे झालं का अरे त्या मुलीला काय वाटतं असं कुणीही विचारत का ? तिला तर नाहीच मुळीच नाही, तर घरचे तिचे वडील कुटुंब त्यामुळे मुलीच्या मनाविरुद्ध ते लग्न का असो ना तर माझी मुलगी माझ्या मनाविरुद्ध कुठल्याही मुलाबरोबर लग्न करणार नाही. असे स्पष्टपणे त्या, मुलीचे वडील चार चौघात सांगतात. पण ह्या सगळ्यात त्या मुलीने तिचे मन मारतच आयुष्य घालवाचे का? असे खुप म्हणजे खुप कमी लोक असतील कि तिचे वडील स्वतःहून विचारेल कि तुझ्या आयुष्यात असे कुणी तरी आहे का? असेल तर सांग. आपण बघू, तर नाही कारण घरचाना त्यांचा समाज काय बोलेल , लोक काय म्हणतील, असे विचार येतात , पण या सगळ्यात . त्या मुलीला काय वाटतं , कोणीही तिला जवळ घेऊन विचारत नाही, अशा वळणावर कुणीही तिचे तिला साथ देणार नाही. किती कठीण असतं जेव्हा लग्न ह्या अडीच अक्षरी शब्दात सगळंच सामावलेलं असतं, तेव्हा त्या मुलीला तिचं जीवन मनसोक्तपणे जगायला आवडतं, पण जुनी परंपरा आणि वडील धारांमुळे ती त्यांच्यापुढे बोलू शकत नाही.  कुणी म्हणतात कि मुलगी फार शिकलेली नको का? तर उलट उत्तर देईल. वा म्हणजे मुलगा कितीही शिकला आणि शिकून, विदेशातील नोकरी करून तिकडे राहायला गेला तरी चालत. पण इकडे त्याचे आई वडील काय?करतात. ते पण त्याला विचारायला वेळ नसतो, ते चालतं यांना लोकांचे काही गैरसमज,आहे की मुलगी गोरीच करा. काळी करू नये, घारे डोळ्याचे लोकं तर मने चाप्टर असतात. हा... हा..  मला असं वाटतं की लग्न बाजूला सारून लोक तर अंधश्रद्धा बाळगतात.


असो पण आता तरी त्या मुलीचा विचार करा. मुला-मुलींमध्ये समानता आणा. मुलीचे लग्न हे वयाच्या एकविसाव्या वर्षी व्हायला हवं नाहीतर जास्त वय झाल. तर लोकं काय म्हणतील. शेवटी इथे लोकांचा विचार केला जातो तिच्या जीवाचं काय? काय चाललंय मला तर कळतच नाही. तसही हे शेजारी, समाज, फक्त बघायला येत.हो वाईट बोलायला तर आधी येतात. त्यांना सुखाचे क्षण आनंदी माणसं कधीच सांगली भासत नाही, मुलगी शिकली प्रगती झाली असे आपण म्हणतो खरंच ती शिकून मोठी झाली प्रगतिपथावर ही आज आहे. काही प्रॉब्लेम नाही. पण समाजातील लोकांची विचार सारणी अशी नकारात्मक आहे. आणि अशी विचार सारणी आज अनेकांचे घरच तोडत आहे. मुलगी आणि लग्न ह्या मुद्द्यावर जरा तिचा ही विचार करा. तिला मनसोक्तपणे लग्न ह्या विषयावर बोलायला भाग पाडा. लोक म्हणतात, की मुलगी हे परक्याचे धन असते. असे नकारात्मक विचार न करता हक्काने प्रेमाने चार शब्द बोलून तर बघा. ती मुलगी स्वतः सिद्ध करून दाखवेल की तिने ठरवलं तर सर्व शक्य आहे.या जगात तिला तिच अस्तित्व निर्माण करू दया. ती कधीही तुमचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही जगा आणि तिलाही जगू द्या. लग्नाच्या या अतिमहत्त्वाच्या शेवटच्या तिचा निर्णय कधी तिलाही घेऊ द्या.


Rate this content
Log in