आसरा
आसरा
आज त्याचा वाढदिवस होता अप्पाना माहित होते की, आज तो येणार भेटवस्तू वाटणार खोटी काळजी असल्यासारखे दिखावे करणार आशीर्वाद घेणार आणि निघून जाणार त्याचा वाढदिवस टाळण्याचे हे अप्पाचे दुसरे वर्ष होते सकाळ पासून इथून कुठे तरी निघून जावे असेच त्याना वाटत होते त्याची होणारी चिडचिड देशपांडे आजोबा गुपचूप टिपत होते
"काय अप्पा काय झालं ..."?.
"काही नाही देशपांडे "
"अहो मघास पासून मी तुमची तळमळ पाहतोय सांगा काय झालं ते "?
"मला आज बाहेर जावंस वाटतेय "
"बाहेर कुठे "?
"माहित नाही पण कुठेतरी "
"कुठेतरी म्हणजे?"
"कुठेही"
"अहो तुम्हला कुठे जायचं हेच माहित नाही तर इथून जायला कसे देतील तुम्हाला माहित आहे ना त्याच्या वर आपली जबाबदारी आहे ती "
"हो पण काहीतरी करा पण मला बाहेर जाऊ द्या "
"अहो पण तुम्ही जाणार कुठे आपल्याला कोणी नाही म्हूणन तर आपण इथे आहोत ना आणि आज तो श्रीकांत देवधर बिसिनेसमॅन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे येणार आहे मस्त भेट वस्तू देतो तो आणि आज आपल्याला बाहेरच जेवण पण मिळणार अहो ह्या वयात मस्त खायचं आणि जगायचं आणि हो कुठे जाण्याचा विचार सोडा तुम्ही "
"बिसिनेसमॅन म्हणे बिसिनेसमॅन मलाच काहीतरी करायला लागणार ह्या थोड्या वेळेच्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी"
अप्पा रूम मधून बाहेर येतात आणि वॉच मॅन ची नजर चुकवून बाहेरचा रस्ता धरतात मागे न वळता त्यानी बरेच अंतर पार केले होते ते थांबले सुटकेचा श्वास घेतला समोर त्याना गणेश मंदिर दिसले ह्या सारखी चांगली जागा नाही असे म्हुणुन अप्पा मंदिरात शिरले गणेशाचरणी नतमस्तक होऊन डोळे बंद करून शांतपणे ते खाली बसले मंदिरात भक्ताची ये जा होती दुपार होत आली तरी ध्यान लीन झालेलं अप्पा तसेच होते पुजारी घरी जाण्याच्या वेळी अप्पाना हाक दिली
"आजोबा आजोबा "
"हा कोण "?
"अहो मी मंदिरातला पुजारी आजोबा सकाळ पासून ध्यान लावून बसलात दुपार होत आली घरी जायचं नाही का उठा आता मंदिर पण बंद करण्याची वेळ झाली "
"घरी माझं कोणी नाही म्हूणन तर ह्या विघ्हर्त्याच्या चरणी येऊन बसलो "
"अहो पण आता तुम्हला जावे लागेलं आम्ही दोन तासा साठी मंदिर बंद ठेवतो "
"कृपया पण मी इथे बसू शकतो आणि दोन तास "
"आजोबा मंदिर बंद असते मग तुम्ही कसे बसाल "
"पण मी इथे फक्त बसून राहणार तुम्ही बाहेरून कुलूप लावून जाऊ शकता आणि तुमच्या मंदिरच्या संपत्तीला हात लावण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा येणार नाही कृपया माझी समस्या समजून घ्या "
"बरं आजोबा मी तुमच्या वर विश्वास ठेवतो आणि जेवणाचं काय तुमच्या उपाशी राहाल नाही तरी माझ्या घरी चला "
"नको नको विचारल्या बदल धन्यवाद पण मला भूक नाही आहे तुम्ही निसंकोच जा आणि परत या "
"बरं काळजी घ्या "
"अप्पा चला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्याला हॉल मध्ये सगळयांना बोलवले"
"अप्पा अप्पा अरे हे अप्पा कुठे गेले "?
"अरे अप्पाना कुठे पहिले का?"
"नाही"
"अरे देवा हे अप्पा आता कुठे गेले कुठे शोधू याना सौरभला सांगितलेले बरे "
सौरभ ह्या आसाराचा व्यवस्थापक
"सौरभ बाळा"
"काय आजोबा काय झालं "
"अप्पा देवधर कुठे दिसत नाही"
"दिसत नाही म्हणजे "?
"केले कुठे"?
एकीकडे वाढदिवसाची गडबड तर दुसरीकडे आप्पाची शोधाशोध
पण वाढदिवस पार पाडला आणि परत सगळे अप्पांच्या काळजीत गुंतले
"कोणाला अप्पा काही सांगून गेले का" ?
"नाही"
"मला वाटते आपण पोलीस कॉम्प्लिन्ट करावी"
"थांबा सकाळी अप्पा मला बाहेर कुठे तरी जायचं आहे मला बाहेर जाऊ द्या थोड्या वेळासाठी हेच सांगत होते मला वाटते ते परतील आपण थोडा वेळ वाट पाहू या "
देशपांडे आजोबाच्या बोलण्यावर सगळे सहमत झाले आणि नजर वाटेवर लावून बसले. एवढ्यात अप्पा येताना दिसले. सगळ्यांनी एकच आवाज केला... अप्पा आले. अप्पांसमोर प्रश्नांची सरबत्ती चालू झाली. कोणी त्यांना निष्काळजीपणा म्हणाले, तर कोणी आणि काही... सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर अप्पांनी सुरवात केली.
"माफ करा ह्या जीवाला आज तुम्हला मी खूप त्रास दिला पण हे मी मुद्दाम नाही केलं माझी समस्या तशी होती म्हूणन मला आज असे वागावे लागले कधी न सांगावं लपून ठेवाव असच ठरवलेले पण नाही आज मी का असे वागलो ह्यचे कारण तुम्हला कळायला पाहिजे नाही तर तुमचा माझ्या वरचा विश्वास उठेल आणि निष्काळजी पणाचा धब्बा कायमचा माझ्या वर बसेल आज आपल्या आसरा मध्ये नेहमी प्रमाणे श्रीकांत देवधर वाढदिवस साजरा करायला येतो आपल्यासाठी भेटवस्तू जेवण आणतो आपला आशीर्वाद घेऊन निघून जातो हे त्याचे करण्याचे दुसरे वर्ष गेल्या वेळी हि मी बरं नाही म्हूणन त्याचा समारंभात भाग घेतला नाही आणि ह्या वेळी तेच कारण पचणार नव्हतं म्हूणन मी थोडा वेळ बाहेर गेलो आता मी हे का केलं तुमच्या अनेकांच्या तोंडातून त्याची वाहवा ऐकली कि काय माणूस आहे आपला वाढदिवस आमच्या सारख्या बरोबर साजरा करतो पण तो आपल्या आई वडिलांची तेव्हडीच काळजी घेत असेल उत्तर नाही कारण असच जर असत तर त्याचा हा दुर्देवी बाप ह्या आसाराच्या भिंतीत गुदमरला नसता
"काय तुम्ही त्याचे वडील "?
"हो पण मुद्दाम मी ओळख लपवली कारण कुठल्या तोंडाने सांगणार होतो कि तो माझा मुलगा ज्याने मला घरातून बाहेर काढले आणि मला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही आणि त्याला हे सुद्धा माहित नाही कि मी जिवंत आहे की नाही माझ्या पत्नीनंतर वाटलेले की माझा हा सांभाळ करेल पण दोन वर्षांपूर्वी मी घर सोडले ते कायमचे. मग मला सांगा मी आज केले ते बरोबर होते की चूक..."
सगळ्यांचे डोळे पाणावले
सौरभ पुढे आला आणि म्हणाला," ह्या पुढे ह्या वास्तूची दारे त्या श्रीकांतसाठी कायमची बंद असतील हा तुमच्या ह्या मुलाचा शब्द आहे."
अप्पा आम्ही सगळे तुमचे आहोत म्हणून अप्पांना सगळ्यांनी उचलून धरले. अप्पा त्या प्रेमाच्या सागराला डोळे पाणावून पाहात होते...
