STORYMIRROR

Akshay Jadhav

Horror Thriller

4  

Akshay Jadhav

Horror Thriller

आफ्रिकेतील अतर्क्य

आफ्रिकेतील अतर्क्य

52 mins
22

(प्रस्तुत कथा काल्पनिक असून कोणत्याही घटनेशी किंवा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही)


या जगात काही वेळेस इतक्या विलक्षण घटना घडतात कि त्यामागचं विश्लेषण करूनसुद्धा त्या घटना घडण्यामागच प्रयोजन कळत नाही. प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या देशांमध्ये असल्या घटना या भाकडकथा अथवा खुळचट कल्पना म्हणुन केराच्या टोपलीत जमा होतात. पण तरीही अशा काही विलक्षण घटनांवर काही लोकांचा ठाम विश्वास आहे. अशाच प्रकारातली घटना काहीशी माझा बाबतीत पण घडली.

हि हकीकत माझा आफ्रिकेत ८०-९० च्या दशकाला वास्तव्याला असतानाची आहे, मी ज्या कंपनी मध्ये काम करत होतो. त्या कंपनीने उत्पादनाचा एक नवीन कारखाना आफ्रिकेतल्या एका गावाजवळच असलेल्या भागात काढला होता, त्या कारखान्याचे आत्तापर्यंतचे कामकाज आणि उत्पादन प्रक्रिया याचा आढावा घेण्यासाठी मला तेथे पाठवण्यात आलेलं होतं. नवीन उत्पादनामध्ये काही सुधारणांची गरज आहे कि नाही हे पहाणे हा कंपनीचा मुख्य उद्देश होता.

आफ्रिका खंड म्हणजे दूरदूरवर पसरलेला विस्तीर्ण जंगल प्रदेश, कित्येक आफ्रिकन आदिवासींच्या जमाती तिथल्या प्रदेशात वास्तव्याला होत्या. हे आफ्रिकन आदिवासी तऱ्हेतऱ्हेचे विचित्र गैरसमज पाळून होते त्याचा नंतर मला प्रत्यय आलाच. अशा या प्रदेशात माझं आगमन झालं. माझी व्यवस्था तिथेच कंपनीच्या एका गेस्टहाउस वर करण्यात आली होती, काही हवं नको असल्यास कंपनी चा एक नोकर नेमून दिलेला होता तो तेथीलच राहणारा होता., जेवणासाठी मात्र गावातल्या खानावळीवर जावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला सुरुवात केली, मी कंपनी मधल्या सगळ्या विभागाच्या कामकाजांचा आढावा घेतला. कामाची ठराविक पद्धती सुरुळीत चालू आहे कि नाही ते पाहिलं. काही त्रुटी असल्यास त्या संदर्भात संबधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या. गेस्टहाउस वर परतल्या नंतर दिवसभराच्या कामाचा आढावा घेणारा अहवाल बनवत असे जो मायदेशी गेल्यानंतर मला माझा वरिष्ठ अधिकार्यांना सुपूर्त करावा लागणार होता. तसंही जास्त काही काम नसल्याने आणि कंपनीच्या या ब्रांचच्या लोकांसाठी मी वरिष्ठ असल्याने मी कंपनीमधून लवकरच परत गेस्टहाउस पर्यंत पोहोचत असे. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था एका खानावळीत झालेली होती. माझा नोकराने त्याचं नाव बोमान (इंग्रजीत Bouman) होतं, त्याने मला माझी खानावळ दाखवुन दिली जी गेस्टहाउस पासून जवळच होती आणि माझं गेस्टहाउस हे देखील एका गावाजवळ होतं, आणि कंपनी शहराच्या एका बाजूला. जाण्यायेण्यासाठी कंपनी ची गाडी असल्यामुळे जास्त त्रास न्हवता. एकंदरीत माझी व्यवस्था कंपनीने नीट लावलेली होती. माझा नोकर बोमान हा आफ्रिकनच होता पण त्याला बऱ्यापैकी इंग्लिश येत असल्यामुळे भाषेचा अडसर येण्प्रयाचा प्रश्नच न्हवता, बोमान हा बाजूच्या गावातच राहत होता, रोज सकाळ संध्याकाळ तो गेस्ट हाउस वर साफसफाई करायचा. काही हवं नको असेल तर ते पहायचा, बोमानने मला रात्री अपरात्री अनोळखी भागात जास्त वेळ फिरू नका असा सल्ला दिलेला होता. मी त्यामागचं कारण विचारलं तर तो डोळे मोठे करून म्हणाला कि रात्रीची वेळ हि पिशाच्चासाठीची असते अनोळखी रानावनात ती भटकत असतात. मी त्याच्या हो ला हो केलं. पुढे मला समजलं कि आफ्रिकन लोकांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे विचित्र समज होते. जादुविद्या आणि मंत्र तंत्र जाणणारे अनेक मांत्रिक, कित्येक निषिध्द क्षेत्रे कि जिथे जायला आफ्रिकन लोकं कचरत न्हवे तर धजावतसुद्धा नसत. पण मी मात्र काम आणि परत गेस्ट हाउस यातच व्यस्त असल्याने दुसरीकडे लक्ष द्यायला फारसा वेळ न्हवता. त्या रात्री बोमान ने मला जी खानावळ दाखवुन दिली होती तिथे नेहमीप्रमाणे मी जेवायला गेलो.

खानावळ कसली एक प्रकारची झोपडीच होती ती, थोडसं लाकूड आणि झाडांच्या वाळलेल्या फांद्या पासून छप्पर बनवलेलं होतं. बाहेर पाच सहा लाकडाच्या ढलप्या पासून बनवलेली बाकडी टाकलेली होती. मोडके तोडके लाकडाचे टेबल्स बनवलेले होते. खानावळीत जेवण हे त्यामानाने चांगले मिळत होते. कोपऱ्यातल्या जागेवर दोघे तिघे आफ्रिकन गप्पा मारत होते, ती लोकं कदाचित शहरी असावीत, या खानावळी मध्ये बऱ्याचदा परदेशी लोक येत असत त्यामुळे मला पाहून त्या मंडळींना आश्चर्य वाटलं नाही. ते लोकं आपल्याच गप्पांमध्ये दंग होते. आसपास खाण्याची दुसरी एवढी चांगली व्यवस्था नसल्याने परदेशी मंडळी येथेच येत असावीत. कुठे बसावा असा विचार करत मी बाजूलाच उभा होतो.


“ इथे नवीन आहात काय “ बाजूच्याच बाकड्यावर बसलेला एक गोरा इसम माझाकडे पाहून अस्खलित इंग्लिश मध्ये म्हणाला.


मी त्याचाकडे पाहिलं, मध्यम वयाचा असा तो शरीराने चांगलाच मजबूत वाटत होता. तो कदाचित युरोपिअन भागातला असावा.


“हो नवीनच आहे” मी त्याला प्रतुत्तर दिलं.


“छान, या इथे बसा.” आपल्या समोरच्या बाजूला निर्देश करत तो म्हणाला.


मी गुपचूप त्या गोऱ्या इसमासमोर जाऊन बसलो, याचा पुढ्यात असलेल्या भांड्यामध्ये कसलातरी द्रव पदार्थ होता, सूप असावं बहुधा, तो इसम माझं निरीक्षण करतच होता, तेवढ्यात खानावळी मधल्या पोऱ्याने माझापुढे जेवणाच ताट आदळलं.


“माझा नाव अॅलन, आपला हात पुढे करत तो म्हणाला. मी त्याचाशी हात मिळवला त्याची पकड खूपच मजबूत होती. मजबूत बांध्याचा असा तो इसम होता.


“ भारतीय आहात ” त्याने प्रश्न केला . मी कसनुस हसत हो म्हणालो.


“ तुमच्या गव्हाळ वर्णावरून ओळखलं.” आपले पांढरेशुभ्र दात दाखवत तो हसला.


जेवता जेवता आमचं संभाषण सुरु झालं. मी इथे कंपनीच्या कामानिमित्त आलो असल्याचं अॅलनला सांगितलं. अॅलन हा एक कलंदर माणूस असल्याच माझा लक्ष्यात आलं. काही वर्षापूर्वीच त्याने सैन्यदलातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली होती. कुटुंबात जवळचे कोणी न्हवते, पत्नीशी घटस्फोट झालेला होता. मुलबाळ न्हवती. पण संपत्ती बरीच होती. अॅलनला फिरण्याचा बराच नाद होता. बऱ्याच देशात तो फिरलेला होता. युरोप, आशियाई देश आणी अरब देशांमध्ये फिरून झाल्यानंतर त्याने आपला मोर्चा आफ्रिकेकडे वळवला होता. आफ्रिकेतल्या दाट वनराई मध्ये सफारीसाठी तो प्रथमच आलेला होता. इथून जवळचं राहणाऱ्या एका आफ्रिकन माणसाकडून त्याने एक घर भाड्याने घेतलेलं होतं. आणि सध्या आफ्रिकेतल्या सफरीची रोमांचीकता तो अनुभवत होता. इथले सफरीचे एक दोन किस्से त्याने मला ऐकवले, विविध प्राणी आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षी त्यांचा वावर यावर बरंच बोलणं झालं.दिवसभर काम करून दमून भूक लागल्याने मी त्याचं बोलणं नुसत ऐकत होतो आणि जेवता जेवता भुवया उडवून प्रतिसाद देत होतो. आमच्यामध्ये बऱ्यापैकी ओळख निर्माण झाली, जेवण संपल्यावर आम्ही बाहेर खानावळीच्या बाहेर आलो, आता आमच्यामध्ये बऱ्यापैकी ओळख म्हणा वा मैत्री म्हणा झालेली होती. त्याने मला त्याचा भाड्याचा घरामध्ये एकदा येण्याच निमंत्रण दिलं. मी त्याला होकार दिला आणि हसतच त्याचा निरोप घेतला. दिवसभर काम करून संध्याकाळी गेस्टहाउस वर येणे हाच दिनक्रम बनला होता, कंपनी च्या कामाचा आढावा घेऊन त्यावर टिपणं बनवण्याचं माझं काम जोरात चालू होतं. 


दरम्यानच्या काळात अॅलनच्या भाडोत्री घरी जाणं झालं. अॅलनच्या घरात फारसे सामान न्हवतेच, एक बेड, लाकडी कपाट ,टेबल, खुर्ची आणि टेबलावर सफरींच्या माहितींची काही पुस्तके पडलेली होती बस एवढचं. अॅलनने माझं यथोचित स्वागत वगैरे केल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो, म्हणजे बोलत तोच होता मी आपलं उगाच ऐकत होतो. अॅलनच्या गप्पांना काही कमी न्हवती, आफ्रिकेत आल्यापासून त्याने काय काय अनुभव घेतले तो ते सांगत होता. इथल्या विक्षिप्त लोकांबद्दल त्याला त्याच्या घरमालकाने देखील सांगितलेलं होतं. इथले काळी जादू करणारे मांत्रिक काहीही करू शकत होते त्यांना बऱ्याचशा विद्या अवगत होत्या. एकदा घरमालकाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला कसलीशी पिशाच्च बाधा झाली होती तर त्यांनी एका मांत्रिकाला बोलावलेल होते तो मांत्रिक फारच पोहोचलेला होता. त्याने त्या मुलाला पिशाच्चापासून मुक्त केलं. हे अॅलन निर्विकारपणे सांगत होता, अॅलनने जंगलातील काही भागात फेरफटका सुद्धा मारला होता. तो सांगत होता कि अफ्रिकेतील दुपारच रखरखत उन म्हणजे एक वैतागच होता, अशा भर दुपारी अॅलन जंगलात गेला होता. असं म्हणून त्याने सांगायला सुरुवात केली-

त्याने जाताना जवळ त्याचं रायफल नेलं होतं. पायात जाड बूट, हाफ शर्ट आणि शॉर्ट प्यांट असा पेहराव करून तो निघालेला होता. आफ्रिकेच्या जंगलात झाडी झुडुपे यांची गर्दीच होती, चालण्याच्या रस्त्यावर वाळलेले गवत पसरलेलं. पायवाट अशी म्हणून नाहीच, अशाच एका भागातून कपाळावरील घाम टिपत तो जात होता. चालत असतानाच बाजूच्या पसरलेल्या झुडुपातून कसलातरी खुसपुसल्यासारखा आवाज आला, काहीतरी वाळलेल्या गवतावरून घासत चाललेल होतं. अॅलनने आपले कान टवकारले आणि आणि तो आवाजाचा कानोसा घेऊ लागला. तो खुसपूस आवाज त्याच्या शेजारच्या झाडीमधूनच पुढे सरकत जाऊ लागला. अॅलन ने रायफल वरची पकड घट्ट केली आणि आवाजाचा पाठलाग सुरू केला, हळूहळू खुसपूस पुढे सरकत होती तसा अॅलन देखील पुढे सरकत होतं. तो आवाज कसला असेल याचीच त्याला उत्सुकता लागलेली होती. पुढे झुडुपांची रांग संपणार होती आणि झुडुपात जे काही होतं ते बाहेर येणार होतं. अॅलन सावधपणे पुढे सरकू लागला. झुडुपांची रांग संपल्याबरोबर अॅलन थोडा थांबला आणि रायफल पुढे रोखली. अचानक त्या झुडुपामधून मध्यम जाडीचा एक भलामोठा साप बाहेर आला. अॅलन बाजूला थांबला. तो साप शांतपणे जाऊ लागला, अॅलनने पहिलं की तो साप एक असाधारण प्रकारचा होता कारण त्याचा अंगावर विविध रंगांचे पट्टे होते. असला चट्टेरीपट्टेरी विलक्षण साप प्रथमच तो पाहत होता. साप आपल्या वेगाने पुढे निघून गेला. निसर्गाची ती नयनरम्य रचना पाहून अॅलन खरच खूप प्रभावित झाला होता. तसं तो सांगत असताना त्याचा चेहर्‍यावरूनच मला ते दिसत होते, तसाच काही अंतर पुढे गेल्यावर त्याला एक भलमोठा अजगर एका मोठ्या झाडाखाली आरामात लोळत पडला होता. जवळपास २०-३० फूट लांब असावा असं अॅलनच मत होतं. त्याचा तोंडापासून जरा मागे तो काहीसा फुगलेला होता, एखाद हरिण किंवा रानडुक्कर गिळल्यामुळे तो फुगीर दिसत असावा, आपले भक्ष गिळून तो अजगर आरामात पहुडला होता. तिथून पुढे गेल्यावर अॅलनला बरेच विशेष पक्षी पाहायला मिळाले जे त्याने कधीच पाहिलेले न्हावते. एका निलवर्णी असा पक्षी दिसला त्याचा डोक्यावर असणारा तूरा तर फुटभर लांब असा होता हे सांगताना अॅलन एका लहान मुलाप्रमाणे खुदूखुदू हसत होता. दुपारच्या त्या रखरखत्या उन्हात त्याला अजून जास्त पुढे जाण झालं नाही, म्हणून आपला घामाने निथळणारा लालबुंद झालेला चेहरा घेऊन तो परत आला.


अजून बरचं काही पहायची इच्छा त्याला होती, निसर्गाने आफ्रिकेच्या जंगलाला अजून कोणत्या देणग्या प्रदान केल्या असतील हे पहायची त्याला खूप उत्सुकता होती. वाघ आणि बिबट्या सारखे हिंस्र प्राणी देखीला त्याला पहायचे होते पण सध्यातरी तशी अनुकूल संधी त्याला मिळालेली न्हावती. अॅलनने माझा केलेला पाहुणचार पाहून खरच मी सुखावून गेलो होतो, कोण कुठला परदेशी माणूस त्याची आणि माझी मैत्री होते काय आणि बर्‍याच वर्षापूर्वीची जिवलग मैत्री असल्यासारखं तो माझाशी भरभरून बोलतो काय. खरंच ही परदेशी माणसे असतातच विलक्षण जेवढ्या सहजतेने आपण एका गावातून दुसर्‍या गावात जातो तेवढ्याच सहजतेने ही मंडळी या देशातून त्या देशात फिरत असतात. आपल्या इथे जरा कोणी इसम कुठे पूर्वेच्या देशात कोणी जाऊन आला की लगेचच खूप लांब जाऊन आलोय असा इस्त्री केलेला कोरा चेहरा करून भुवया उडवत सांगतात. एकूणच काय तर अॅलन आणि माझे चांगलेच मेतकूट जमले होते. त्यालासुद्धा एकदा माझा गेस्टहाऊस वर बोलावाव असं मला वाटू लागलं. त्यामुळे आमची मैत्री अजूनच द्रुढ झाली असती. मग मी लगेचच अॅलनला पुढच्या वेळी माझा गेस्टहाऊस वर यायचं निमंत्रण दिलं आणी त्याने आनंदाने ते मान्य केलं. आणी तसा मी त्याचा घरातून त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो.


माझा नेहमीचा दिनक्रम चालू होता कंपनी मध्ये जाणे, कामाचा आढावा घेणे, संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना देणे. कामाचा आराखड्यासंदर्भात त्यांचाची चर्चा करणे हे चालूच होतं. नंतर गेस्टहाउस यायचो तेवढ्यात बोमान आलेलाच असायचा तो सगळं घर वगेरे आवरून चहा पाण्याचं बघायचा. थोडा वेळ आराम करून मग मी माझा रोजचा कामाचा अहवाल लिहायला घ्यायचो. त्यात रात्र व्हायची मग नंतर रात्री जेवण करायला खानावळी मध्ये जायचं. दिवस नेहमीसारखे चाललेले होते पण मला आता परतीचे वेध लागलेले होते कारण इथली आफ्रिकन जेवणाने आणि राहणीमानाने मी खरंच कंटाळलो होतो. आता मायभूमीची ओढ लागलेली होती. आपल्या लोकांची आठवण येऊ लागली होती. पण मला कुठे माहित होतं कि हि आफ्रिकन भूमी मला एवढ्या सहजासहजी सोडणार न्हवती.

त्यादिवशी अॅलन अचानक माझाकडे संध्याकाळी जेवणाच्या वेळेच्या आधी आला, तेव्हा मी अहवाल लिहित बसलो होतो.

“ अरे आलास तू ..ये ये बैस “ जवळच्या खुर्चीकडे निर्देश करत मी त्याला म्हणालो आणि परत अहवालातील वहीत डोकं खुपसू लागलो.

“ बसायचं वगेरे सोड बाबा, आज जरा लवकर जेवायला जाऊयात का आपण? दारामध्येच उभं राहून अॅलन ने मला विचारलं.

“ का रे बाबा .. आज लवकर.. आज काही विशेष आहे का ? मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो.

“ तसं काही विशेष नाही, आज जरा मला माझा घरमालकाकडे थांबायचं आहे म्हणून म्हटलं कि लवकर जेऊन गेलो असतो. अर्थात तुझं काम लवकर होणार असेल तरच ..” अॅलन म्हणाला.

“ अरे हे काय.. झालंच माझं काम “ असं म्हणून मी लगबगीने उठलो आणि तयार होऊन अॅलन सोबत खानावळीवर नेहमीपेक्षा लवकर गेलो.

आम्ही जरा लवकर गेलो असल्याने जेवण अजून बनत होते. त्यामुळे खानावळवाल्याने आम्हाला थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितले.

अचानक माझा लक्षात आलं कि अॅलन मगाशी म्हणत होता कि तो घरमालकाकडे आज थांबणार आहे म्हणून, मग मी लगेचच त्याला त्याबद्दल विचारलं.

त्यावर “ काही नाही रे घरमालकाची मुलगी आजारी आहे, मागचे काही दिवस झाले, असं तो जरास त्रासिक सुरात म्हणला.

“ ओह्ह अच्छा मग डॉक्टरकडे न्यायचं आहे का तिला” मी त्याला विचारलं.

“ नाही रे आता बरी आहे ती ....असं म्हणून तो एकदम शांत झाला, आणि शून्यात पाहू लागला”

मला काहीच कळेना मधेच तो एकदम का गप्प बसला असं वाटलं कि तो काहीतरी लपवतोय माझापासून किंवा मला काही सांगायला कचरत आहे. मी पण जास्त त्याला काही विचारलं नाही आणि शांत बसलो. 

मला शांत बसलेला पाहून तो स्वतःच मला म्हणाला “त्या घरमालकाच्या मुलीला काही दिवस झाले खूप ताप येत होता. तापामध्ये तिची शुद्ध पण हरपली होती. त्यामुळे घरातल्या लोकांनी चर्चा विमर्श करून त्या मुलीला एका मांत्रिकाकडे नेण्याचं ठरवलं होतं. कारण त्यांचा म्हणण्याप्रमाणे तिला काहीतरी बाहेरची बाधा झालेली होती. काही दिवसांपूर्वी ती मुलगी शेळ्या चरायला म्हणून एके ठिकाणी चुकून गेली होती जी जागा इथली स्थानिक लोकं निषिद्ध मानतात.

" असं मग पुढे " मी कान टवकारूनच म्हणालो.

" मग काय कोंबडे बकरे आणि इत्यादींचा रतीब सुरु झाला" मांत्रिक ठराविक वस्तूची मागणी करू लागला कि हि लोकं त्याला ती वस्तू आणून द्यायचे.” अॅलन उत्तरला.

" पण मला खरच एक विचारायचं कि खरंच अशा विकृत पद्धती चा अवलंब केल्याने त्या मुलीला बरे वाटेल काय?" मी काहीश्या कुत्सितपणे म्हणालो.


माझा या सध्या भोळ्या प्रश्नावर अॅलन गालातल्या गालात हसत होता. मग त्यावर तो म्हणाला " अरे मित्र हीच तर गम्मत आहे इथली"


गम्मत ? कसली गम्मत? मी जरा गोंधळूनच मी विचारलं.

मला तर काहीच समजेना कि यात कसली गम्मत आली आहे, ताप आला तर एखाद्या वैद्य किवा डॉक्टरकडे दाखवावं असा आपला साधारण समज आहे. त्याऐवजी मांत्रिकाकडे नेणारा तो त्या मुलीचा बाप मला तद्दन मूर्ख वाटला किंवा भोळसट म्हणा आणि त्यात गम्मत आहे असा मला सांगणाऱ्या ह्या माझा परदेशी मित्राबद्दल मला काय म्हणावे, हेच मला कळेना.


माझा चेहऱ्यावरचे काहीच न समजल्यासारखे भाव किंवा बावळट भाव म्हणा, पाहून तो मला म्हणाला " मित्रा हीच तर इथली परंपरा आहे, ते काय करतात किंवा काय करत नाही हे फक्त आपण पहायच असत. त्याबद्दल काही तर्कवितर्क लढवायचे नाहीत, कारण हि लोकं अशी का आहेत हे आपल्याला माहित नाही, या मागे काही कारण असू शकतात आणि म्हणूनच नक्की काय प्रकार आहे हे पाहण्याकरिता मी काल माझा मालकासोबत त्या मांत्रिकाकडे गेलो होतो.


" ओह्ह असं " मी आश्चर्य वजा कुतुहलाचे भाव चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत म्हणालो.


काल रात्री एका कोंबड्याचा खुराक घेऊन मी आणि माझा मालक त्या मांत्रिकाकडे गेलो होतो. अस म्हणून अॅलनने सांगायला सुरुवात केली -

रात्रीच्या वेळी मी मालकाकडे सिगार पेटवण्यासाठी लायटर मागण्यासाठी गेलो असता मला अस दिसला कि मालकाच्या मुलीची तब्बेत खूपच ढासळलेली होती तिला उभं सुद्धा राहवत न्हवता, आणि मालक तिला आपल्या खांद्यावर घेऊन कुठेतरी जाण्याचा तयारीत होता. अचानक आलेलं मी पाहून तसं तो जरा चपापलाच पण तरी त्याने " बोला ना काय हवंय" अशी विचारणा केली.
मी सांगितलं कि मला लायटर हवा आहे तसं त्याने लगबगीने आत जाऊन मला लायटर आणून दिला

आणि माझ्या जाण्याची वाट पाहत तो उभा होता.


" मुलीची तब्येत अजून सुधारली नाही वाटत?" मी म्हणलो


" न .. नाही ना .. म्हणूनच तर परत हिला घेऊन चाललोय" जरासं चाचरतच घरमालक म्हणाला.

अॅलन असा आगंतुकासारखा आलेला पाहून खरंतर घर मालकाला जास्त आनंद झालेला न्हवता. पण तो अॅलनला अस हुसकावून लावू शकत न्हवता. आणी तसंही अॅलन घर मालकाला देत असलेल्या त्याच्या रूम चं भरघोस भाडं पाहून तो जेमतेम उत्पंन असलेला घरमालक त्याला काही म्हणून शकला नाही.


अॅलन जाण्याचीच तो वाट पाहत होता, अॅलनने पण ते ओळखलं, आणि त्याला म्हणाला कि " चला मी पण येतो तुमच्यासोबत."


" न.. ना..नाही तुम्ही कशाला तसदी घेताय.." असा ओढेवेढे घेत घरमालक म्हणला.


" त्यात तसदी कसली, झालं तर तुम्हाला मदतच होईल माझी. अशा अवेळी तुम्ही जंगलाच्या दिशेने जाणार म्हटल्यावर माझी सोबत तुम्हाला उपयोगी पडेल " अॅलन म्हणला.


अशा घटना इथे वरचेवर होत असतात, तुम्ही एवढं गांभीर्याने घेऊ नका अस म्हणत तो घरमालक अॅलनला टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण अॅलन काही ऐकायला तयार न्हवता. आणि घरमालकाला सोबत करण्यापेक्षा हि मांत्रिक वगेरे भानगड तरी काय आहे हे जाणून घेण्याचीच अॅलनला जास्त उत्सुकता होती.


त्यामुळे अॅलनच्या आग्रहाने म्हणा किंवा अॅलन देत असलेल्या भाड्याचा नोटांच्या वजनाने तो घरमालक दबला आणि अॅलनला सोबत घेऊन जायला तयार झाला. पण तिथे गेल्यावर तोंडातून चकार शब्द काढायचा नाही असं घरमालकाने त्याला बजावलं, त्यावर आनंदाने होकार भरत अॅलन घरमालकासोबत जंगलची वाट तुडवू लागला.


पुढे घरमालक त्याचा खांद्यावर त्याची आजारी मुलगी, कमरेला अडकवलेलं कोंबड आणि मागे अॅलन असा तो लवाजमा जंगलच्या दिशेने चालू लागला.

एका छोट्या पायवाटेने ते चालत होते, आजूबाजूला वाळलेल गवत आणि किर्रर्र काळोख. गावापासून चालत चालत ते बरंच अंतर कापत ते जंगलाच्या बाजूला आले.

पुढे अॅलन सांगू लागला - आतमध्ये दाट वनराई असलेल्या भागामध्ये आम्ही चालू लागलो, अंधार खूपच होता म्हणून मी छोटीशी मशाल पेटवली आणि तेवढ्याच उजेडात चालू लागलो. आजूबाजूला झाडांची गर्दी खूप होती त्यात काही मोठमोठे वृक्ष पण होते, रातकिड्यांचा आवाज वाढत होता. मधेच कोल्हेकुई ऐकू यायची, माझी उत्सुकता त्यामुळे अजूनच वाढत होती. इथल्या लोकांना असले वातावरण सरावाचे असल्यामुळे त्यांना या काळोखाचे आणि प्राण्यांचे फारसे भय असे न्हवते. मशाल सुद्धा लावू नका असा घरमालक म्हणत होता कारण रस्ता त्याच्या पायाखालचा होता. पण आता पायाखालचे सुद्धा दिसेना म्हणून मग मी जवळ असलेल्या लायटरने एक लाकूड घेऊन मशाल पेटवली. घरमालकाची मुलगी निपचित खांद्यावर पडून होती, घरमालकाच्या कमरेला अडकवलेलं कोंबड मधूनच घूर्र घूर्र असा आवाज करायचं. दाट वनराईच्या भागात जंगली श्वापाद असण्याची दाट शक्यता होती तरीसुद्धा आमचा धाडसी घरमालक एखाद्या सराईत वाटाड्या सारखा तरातरा चालत होता. गरज पडलीच तर ऐन वेळी काहीतरी हत्यार सोबत असावे म्हणून मी पूर्वी सैन्य दलात वापरत असलेला चाकू बुटामध्ये छुप्या पद्धतीने ठेवत असतो तो आतादेखील माझा बुटामध्ये होता. रात्रीच्या गडद अंधाराचा मागोवा घेत आणि कानावर पडणाऱ्या अनेक प्राण्यांच्या चित्र विचित्र आरोळ्या ऐकत काही वेळातच आम्ही जंगलाच्या अशा एका भागात पोहोचले जिथे बऱ्याच शिळा आजूबाजूला पडलेल्या होत्या. काही काही तर ३-४ पुरुष उंच अशा होत्या. जणू काही शिळांचा घोळकाच जमलेला असावा. अशाच ४-५ मोठ्या शिळांच्या मध्यभागी दोन चार लाडकं जाळून विस्तव केलेला होता. आणि त्या धगधगत्या विस्तावासमोर एक माणूस मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला होता अंग झाकण्यासाठी जेवढं कापड लागतं तेवढच त्याने घातलेला होता. आणि दोन्ही दंडावर हत्तीच्या दातांचे ताईत बांधलेले होते. डोक्याभोवती दोरीसारखा काहीतरी गुंडाळलेला होतं. अगदीच रापलेला चेहरा आणि कृश शरीरयष्टी असलेला हा मनुष्य एक मांत्रिक होता, एका लाडकाच्या सरळसोट ओंडक्याप्रमाणे तो दिसत होता. हा नक्की जेवण करतो कि नाही अशी शंका त्याची शरीरयष्टी पाहून माझा मनाला चाटून गेली. मला बाजूलाच उभा राहायला सांगून, किंबहुना गप्प राहायला सांगून घरमालक त्या दगडी शिळेच्या मध्ये शेकोटीजवळ गेला, खांद्यावरचा मुलीला खाली जमिनीवर झोपवलं, कमरेच कोंबड मांत्रिकाच्या पुढ्यात ठेवून, आफ्रिकन भाषेत काहीतरी बडबडत शरणागती पत्करल्यासारखे हातवारे करत घरमालक त्या मांत्रिकाला काहीतरी बोलला.
त्या मांत्रिकाने सावकाश डोळे उघडले आणि पुढ्यात टाकलेल्या कोंबड्याकडे पाहिलं. मग बाजूला बसलेल्या घरमालकाकडे पाहून त्याने काहीतरी गूढ विचारत असल्याप्रमाणे आफ्रिकन मध्ये काहीतरी विचारलं जे काही मला कळल नाही, त्यावर घरमालकाने खाली मान घालून उत्तरं दिलं. आपली करारी नजर घरमालकावर रोखून काहीतरी तो बोलला जे घरमालकाने खाली मान घालून ऐकल. इतक्यात त्या नजर बाजूला उभा असलेल्या माझावर वळली. आणि तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे पाहून आफ्रिकन मध्ये काहीतरी बोलला. घरमालक माझाकडे वळून परत त्या मांत्रिकाकडे पाहून काहीतरी कुजबुजला, त्यावर तो मांत्रिक अधिकच चवताळला आणि घरमालकाला जोरजोरात काहीतरी बोलू लागला, एकंदरीतच माझे घरमालकासोबत येणे त्या मांत्रिकाला पसंत पडलेले न्हवते. त्या मांत्रिकाचा तो रागीट चेहरा खूपच भेसूर दिसत होता. घरमालक काकुळतीला येऊन त्या मांत्रिकाला समजावत होता अखेरीस काही वेळाने तो मांत्रिक शांत झाला, त्याची समजूत घालून घरमालक माझाशेजारी येऊन उभा राहिला.

तो मांत्रिक एवढा का चवताळला असं मी घरमालकाला विचारलं असता बोटानेच चुप्प बसण्याची खुण करून घरमालक समोर पाहत राहिला. तो मांत्रिक घरमालकाच्या मुलीजवळ गेला. ती मुलगी निपचित पडलेली होती. बाजूला पडलेली घरमालकाने आणलेली कोंबडी त्या मांत्रिकाने घेतली आणि जवळ असणाऱ्या धारदार सुऱ्याने तिचे डोके उडवले. रक्ताच्या काही चिळकांड्या त्या मांत्रिकाच्या चेहऱ्यावर उडाल्या. अगदी निर्विकारपणे जणू काही हे रोजचेच काम आहे असं त्या मांत्रिकाचे वर्तन होतं. डोळे मिटून मांत्रिकाने आकाशाकडे पाहिलं जणू काही मंत्र म्हणत असावा, कोंबडीच्या रक्ताने त्याचे हात भरलेले होते त्याच हाताच्या एका बोटाने त्याने त्या मुलीच्या शरीराभोवती जमिनीवर एक गोल रिंगण तयार केलं. आणि खाली गुडघ्यांवर बसून अगम्य भाषेत हातवारे करत तो काहीतरी बडबडू लागला. काही वेळाने शांत झाला आणि नंतर घरमालकाकडे पाहून काहीतरी म्हणाला. तसा घरमालक मला सोबत घेऊन त्या जागेपासूनच काहीअंतरावर असणाऱ्या एका मोठ्या शिळेच्या बाजुला घेऊन गेला. आम्ही त्या शिळेच्या बाजूला आलो तिथून आम्हाला मांत्रिक आणि ती मुलगी दिसत होती. तिथे आल्यावर मी घरमालकाला विचारलं

“ काय झालं, काय म्हणाला तो मांत्रिक” अॅलनने उत्सुकतेने विचारलं

“ बाजूला जाऊन थांबा ‘ते’ येण्याची वेळ झालीय “ घरमालक उत्तरला.

“ ते.. कोण 'ते' “अॅलनने अजूनच उत्सुकतेने विचारलं

माझा प्रश्नावर घरमालकाने मोठा उसासा घेतला आणि म्हणाला “ तुम्ही येथे आलेलं त्याला मुळीच आवडलेलं नाही म्हणूनच तो मला रागवत होता. परदेशी लोकं आपल्या प्रथा परंपरांवर विश्वास ठेवत नाहीत उलट त्यात बिब्बा घालतात असं त्याचं म्हणणं होत.

“ पण तुम्हाला कबुल केलं त्याप्रमाणे मी तर शांतच होतो,” अॅलन म्हणला.

“ मी पण त्याला तेच सांगितलं कि हा माणूस माझा विश्वासातला आहे. हा आपल्या कामात काही अडथळा आणणार नाही. मग त्यावर कसाबसा तो शांत झाला” घरमालक समोर पाहत बोलला.

“ ओह्ह असं झालं तर... बऱ आपण इथे लांब का उभे आहोत आणि कोण येण्याची वेळ झालीय असं मांत्रिक म्हणतोय” अॅलन संशयाने समोर पाहत म्हणाला.

अॅलनच्या प्रश्नाने खरंतर घरमालक त्रासला होता पण तरीही तो अॅलन कडे पाहत म्हणाला. “ हे बघा महाशय मी जे सांगेल ते नीट ऐका थोड्याच वेळात या मांत्रिकाचा विधी पूर्ण होईल, त्यानंतर मांत्रिक ज्याची उपासना करतात ते येतील. आणि ते माझा मुलीला बरं करतील. त्यामुळे आपण शांतपणे काहीही आवाज न करता इथे या शिळेमागे उभे राहायला त्या मांत्रिकाने सांगितलंय. थोडीजरी आगळीक आपल्याकडून झाली तर आपण सगळे त्या मांत्रिकासकट जीवानिशी जाऊ ”

घरमालक असं म्हणताच मला परिस्थितीच गांभीर्य लक्षात आलं, माझा मनाला उगाचच वाटून गेलं कि आणि जे कोणी येणार असेल ते कसं असेल खरंतर याबाबत माझी भीती मिश्रित उत्सुकता अगदीच शिगेला जाऊन पोहोचली. समोर मांत्रिक काहीतरी बडबड करत होता. रातकिड्यांचा आवाज पण वाढला होता हि अंधारी रात्र काळरात्र ठरेल कि काय अशी शंका माझा मनाला चाटून गेली. क्षणभर हृदयाची धडधड वाढली, बुटामध्ये असलेला चाकू पायानेच हालचाल करून जागेवर असल्याची खात्री करून घेतली, पण परत वाटलं जर खरंच जे येणार असेल ते अमानवीय किंवा अनैसर्गिक असे काहीतरी असेल तर आपला चाकू काय कप्पाळ कामाला येणार आहे. कारण पिशाच्चाला भौतिक शस्त्र अस्त्रांनी इजा करता येऊ शकेल कि नाही शंका आहे. अचानक मांत्रिक त्याची बडबड थांबवून समोर अंधारात जंगलाच्या दिशेने पाहू लागला आणि कानोसा घेऊ लागला. मांत्रिकाची बडबड कि मंत्र जे काही असेल ते थांबल्याने मी आणि घरमालक सतर्क झालो. मांत्रिकाने आमच्याकडे मान वळवली आणि घरमालकाकडे पाहून 'शिळे मागे जा' अशा अर्थाची खुण केली. 

आणि तसं माझा घरमालक “ते” येत आहेत असं मला धीरगंभीर आवाजात म्हणाला आणि जवळजवळ मला ओढतच जरा लांब असणाऱ्या एक शिळे मागे घेऊन गेला.

आम्ही शिळे मागे जाऊन उभे राहिलो. आमच्या समोर थोड्या अंतरावर तो मांत्रिक आणि घरमालकाची निपचित पडलेली मुलगी दिसत होती. मांत्रिक आता शांतपणे गुडघ्यावर बसून होता. त्याचा बाजूच्या शेकोटीचा अग्नी मंद होत होता. तेवढ्यात अचानकच एक मोठी डरकाळी जंगलाच्या भागातून आम्हाला ऐकू आली ती एवढी मोठी होती कि माझ्या अंगाचा थरकापच उडाला, घरमालक पण भ्यायला पण बोलला काही नाही, जंगलामधून ती डरकाळी आलेली होती. त्या डरकाळी नंतर जंगलामध्ये एक विचित्र शांतता पसरली आमच्या आजूबाजूला देखील ती जाणवली इतकी कि मला माझा श्वासाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. एखादा वाघ किंवा अजून कोणता हिंस्र प्राणी आला तर काय होईल या विचाराने खरंतर माझा कापरं भरलं. तो प्राणी त्याचा अणकुचीदार दात्तांनी आणि हिंस्र पंजांनी आपलं शरीर एका खाटकासारखं सोलून काढेल किंवा आपलं शरीर सुद्धा उरणार नाही असे बारीक बारीक तुकडे करेल. पण नंतर वाटलं एवढे डरपोक आपण केव्हापासून झालो. अरे हट, जास्तीत जास्त काय होईल मरूनच जाऊ ना. असंही कोण राहिल आहे मागे आता आपल्या. जे होईल ते होईल पण हा हि अनुभव घ्यायला हवाच असा मी विचार करत असतानाच मंत्रीकासामोरच्या असणाऱ्या शिळेमागे असणाऱ्या झाडांमागे कसलीतरी खुसपूस झाली. मी आणि घरमालक कान टवकारून पाहू लागलो. झाडांच्या मागून कोणीतरी पुढे येत असल्याचा आवाज येऊ लागला तसा मांत्रिक खाली नमन करत असल्याप्रमाणे जमिनीवर झुकला. ती खुसपूस हळूहळू पुढे येत होती, झाडामागून एक मोठी काळी आकृती समोर येऊ लागली, अखेर आम्ही वाट पाहत होतो ते पिशाच्च आलेलं होतं. मी अक्षरशः डोळे विस्फारून पाहू लागलो. घरमालक त्या पिशाच्चाला पाहताच आमच्या समोरच्या शिळेवर दोन्ही हात ठेवून डोके खाली झुकवून उभा होता. ती आकृती नक्की कशी होती सांगता येत न्हवत, चांगली ८-९ फूट उंच असून, एखाद्या झाडाप्रमाणे दिसत होती. डोके उभट लांब असल्याप्रमाणे दिसत होते. हात झाडाच्या फांद्यांसारखे लांबलचक होते. पाय पण लांब आणि रुंद होते. चेहरा अंधारामुळे दिसतं न्हवता, चेहरा होता कि नाही हे देखील कळत न्हवत. एकूणच एका झाडासारखा तिचा आकार असावा असा अंदाज मी बांधला. ती आकृती जशी शिळेच्या जवळ आली तस वातावरण खूप शांत झालं कसलीही हवा किंवा कीटकांचे आवाज नाही जणू काही आम्ही जंगलात नसून मोकळ्या मैदानातच उभे आहोत .

मांत्रिक हात खाली वर करत त्या आकृतीला उदेशून स्वागत केल्यासारखे काहीतरी बोलू लागला. त्या पिशाच्चाने मांत्रिकाकडे पहिले आणि घोगऱ्या आवाजात काहीतरी विचारले तो आवाज एवढा भयप्रद होता कि माझा जागी एकदा भित्रा मनुष्य असता तर कधीचाच बेशुद्ध पडला असता. त्या मांत्रिकाला बोलल्यानंतर ते पिशाच्च जवळच निपचित पडलेल्या मुलीजवळ गेलं आणि आपलं फांदिसारखा हात हवेतच त्या मुलीच्या शरीरावर धरला आणि त्याचं स्थितीत आपल्या हाताने त्या मुलीच्या शरीराभोवती एक अदृश्य रिंगण तयार केलं त्यासरशी त्या मुलीच्या आजूबाजूची त्या रिंगणातली धूळ उडाली आणि वरच्या बाजूने हवेत निघून गेली. मुलगी निपचित पडून होती, आणी मी हा सगळं प्रकार डोळे फाडून पाहत होतो उभ्या आयुष्यात असला अद्भुत प्रकार मी पाहिलेला न्हवता. जणू काही गोठल्याप्रमाणे मी उभा होतो. त्या पिशाच्चाने त्याच घोगऱ्या आवाजात मांत्रिकाला काहीतरी सांगितले तसे मांत्रिकाने मान डोलावली. मांत्रिकाने त्याच्या पुढ्यात असलेल्या मुलीला उचललं आणि त्याचा मागे असणाऱ्या शिळे जवळ तिला झोपवलं, नंतर घरमालकाने आणलेल्या कोंबडीचा मुंडकेवजा देह त्या मांत्रिकाने त्या पिशाच्चाच्या पायाजवळ ठेवला. त्या पिशाच्चाने दोन्ही हात बाजूला करत वर पाहत घोगऱ्या आवाजात काहीतरी उद्गार काढले त्यासरशी त्याच्या आजूबाजूची जमिनीवरची खूप सारी धूळ उडू लागली आणि त्या धुळेचे मोठे रिंगणच तयार झाले. बहुतेक ते कोणत्यातरी विशिष्ट शक्तींना पाचारण करत असावेत. घरमालक अजूनही शिळेवर डोके ठेवून होता. मी शिळेच्या बाजूने थोडासा झुकून एक डोळा बाहेर काढून ते दृष्य पाहण्याचा प्रयत्न करू लागलो, तोच त्या धुळीचे लोट माझापर्यत पोहोचले आणी डोळ्यांमध्ये धुळीचे काही कण गेल्याने माझे डोळे चरचरले आणि मी थोडासा मागे सरकलो आणी तिथेच घात झाला. मागे सरकले असता माझा पाय एका झाडाच्या वाळलेल्या काटकीवर पडला आणी कड्ड असा आवाज झाला. तो आवाज ते पिशाच्च आणि मांत्रिक यांपर्यंत पोहोचला. पण त्या आवाजासरशी त्या पिशाच्चाची मान गर्रकन आमच्याकडे वळाली. त्याने तसे पाहताच मी चटकन शिळेमागे लपलो पण आता त्याचा काही एक फायदा न्हवता. त्या पिशाच्चाला कळाले होते कि त्याचा कामामध्ये कोणत्यातरी माणसाने अडथळा आणलेला आहे. आणि आपल्या कामामध्ये अडथळा आणलेला त्या पिशाच्चाला चालणार न्हवतं असं मांत्रिकाने आधीच सांगितलेलं होतं.

त्यानंतर ते पिशाच्च आपली मान मांत्रिकाकडे वळवून त्या मांत्रिकाला जोरजोरात बोलू लागले त्याचा तो उग्र आवाज ऐकून मी आता खरोखरच भयाने गोठून गेलो, मला वाटलं आता काही खरं नाही. आणी त्या पिशाच्चाच्या त्या भयावह आवाजाने घरमालक भानावर आल्यासारखा दचकून हात झटकून उभा राहिला. मांत्रिक पण काहीतरी चाचरत उत्तरं देऊ लागला तसा त्या पिशाच्चाचा आवाज आणखीनच वाढला. घरमालकाला काय होत आहे तेच कळेना शिळेमागे असल्यामुळे पुढचे दृष्य त्याला काही दिसत न्हवते आणि काडीच्या आवाजाने पिशाच्च एवढं चवताळले असेल याचा त्याला अंदाज येईना. तसा मांत्रिकाचा जोरात ओरडल्याचा आवाज येऊ लागला तसमात्र मी आणी घरमालक शिळेमागून डोकी काढून समोर पाहू लागलो तर आमची बोबडीच वळाली त्या पिशाच्चाने मांत्रिकाला गळ्याला पकडून वर उचलले होते. आणि मांत्रिक जमिनीपासून ३-४ फूट वर लटकत होता. त्याचा तोंडाकडे पाहत ते पिशाच्च गुरकावत होते एकंदरीत आमच्या तिथे असण्यामुळे त्याला भयंकर राग आला होता त्यामूळेच तो मांत्रिक आत्ता अशा अवस्थेत होता. घरमालक तर तोंडच पाणी पळाल्याप्रमाणे मटकन खालींच बसला. त्या पिशाच्चाचा सेवक असणाऱ्या त्या मांत्रिकाची हि दशा आहे तर आपलं काय होईल हे विचार येताक्षणी माझा मेंदू तीव्र गतीने काम करू लागला माणसाला जीवाची पर्वा वाटल्यावर तो कसलेही काम मागे पुढे न बघता करू शकतो. त्या पिशाच्चाने मांत्रिकाच्या गळ्याला पकडून त्याला हवेतच उभं केलं होता, मांत्रिक ओरडतच होता. आणि माफी मागत असल्यासारखे हातवारे करत होता. त्या पिशाच्चाला अधिकच राग आला आणि त्याचा मागे असलेल्या एका मोठ्या शिळेवर त्याने त्या मांत्रिकाचे शरीर एका चेंडूप्रमाणे भिरकावून दिले. मांत्रिक लोळागोळा होऊन कण्हत पडला ते पिशाच्च त्याचाकडे वळून अजून त्याला काहीतरी बोलू लागलं. बस्स मी मनात म्हणालो हाच मोका आहे इथून पळ काढण्याचा नाहीतर त्या मांत्रिकापेक्षा सुद्धा जास्त बत्तर अशी आपली अवस्था होईल. घरमालक भान हरपल्यासारखा उभा होता त्याला मी घरमालकाला गदागदा हलवून बोललो.

“ मुलीला उचल पटकन आपल्याला निघायला हवं”

घरमालक तांद्रिक असल्याप्रमाणे पिशाच्च त्या मांत्रिकाला कसे यातना देत आहे पाहत होता त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच न्हवत. पिशाच्चाने मांत्रिकाला परत त्याचा नरड्याला धरून शिळेला टेकून वर उचलले. मला वाटले कि आता काही खरे नाही. हे पिशाच्च मांत्रिकाला यातना देण्यात व्यस्त असेपर्यंतच आपल्याला वेळ आहे नंतर आपली काही धडगत नाही. घरमालक तंद्रीतून बाहेर यायचे काही नाव घेईना. तसं वैतागून मी त्या घरमालकाला एक जोरदार कानाखाली लगावली तसं तो घरमालक भानावर आला आणि गाल चोळत माझ्याकडे निष्पाप नजरेने पाहू लागला.

“ मुलीला उचल. जा लवकर, आपल्याला पळायला हवं आता. “ मी म्हणालो

घरमालक भेदारल्यामुळे जागचा हलेना पण तो निदान भानावर आलेला होता. मग मी स्वतःच मुलीला घ्यायला दुसऱ्या शिळेमागे गेलो. पिशाच्च मांत्रिकाला पकडून उभंच होतं त्याची पाठ माझाकडे होती त्याचाच फायदा घेऊन मी त्या मुलीला हळूच पायाला धरून ओढलं तशी ती थोडीशी कण्हली याचा अर्थ ती शुद्धीवर येत होती. चाललेल्या प्रकारची त्या बिचारीला काहीच कल्पना न्हवती. मुलीच्या तिच्या पायाला धरून ओढलं आणि हळूच खांद्यावर टाकलं, आणी हळूच बाजूला जळणार विस्तवाच एक लाकूड काढून एका हातात घेतलं आणी सावधपणे पाउल टाकत परत शिळेच्या बाजूला येताच पिशाच्चाने गर्रकन मान मागे वळवली. त्याची पूर्ण मान माझ्याकडे वळाली जणू काही मानेमध्ये हाडेच नसावीत. ते पाहून माझा पाचावर धारण बसली आणि मी घरमालकाकडे पाहून जोरात ओरडलो

“ पळ लवकर आत्ता”

आणी मागचा पुढचा विचार न करता मुलीला खांद्यावर घेऊन आणि दुसऱ्या हातात विस्तवाचे लाकूड घेऊन पळू लागलो. तसं जोरदार डरकाळी फोडल्याचा आवाज मागून ऐकू आला इतका कि पूर्ण जंगल दणाणून जावं. पळता पळता मी मागे वळून पाहिलं त्या डरकाळीच्या आवाजाने घरमालक पूर्ण भानावर येऊन माझ्यामागे जीवाच्या आकांताने पळत होता आणि पिशाच्चाने हाताने मांत्रिकाचे डोके धडावेगळे केले होते. आणि त्याचा शरीराची छिन्नविच्छिन्न अवस्था तो करत होता.

आता प्रसंग बिकट होता ते पिशाच्च कधीही आमच्यामागे येणार होतं जीवाच्या आकांताने मी पळत होते खांद्यावर मुलीच्या ओझ्याने वेग थोडा मंद पडू लागला. घरमालक तर तोंडाने कसलातरी आवाज करत माझ्याही पुढे पळत होता. मला माझा वेग वाढवावा लागणार होता. अचानक मागून अजून एक डरकाळी ऐकू आली कदाचित पिशाच्च भयंकर चिडलेले असावे ते आमच्याच मागावर असून ते आता सहजासहजी आम्हाला सोडणार न्हवते. आता जीव आहे तर सगळं काही असं वाटून मी माझा सैन्यदलातील प्रशिक्षण आठवून खांद्यावर ओझे असतानादेखील वेग वाढून कसे पुढे जावे या तंत्राचा वापर करत माझा वेग वाढवला. घरमालक पुढे पळत असल्यामुळे आणि हातातील मशालीमुळे मला मार्ग मिळत होता. वाटेत येणाऱ्या झाडाझुडुपांची पर्वा न करता मी आता वेगात पळू लागलो. मागून आवाज जवळ येत होता पिशाच्च आता आमचं अगदी जवळ आल्यासारखं वाटत होत. मागे वळून पाहावं ते कुठे आहे असं म्हणून मी मागे पहिले एवढ्यात अचानक एका दगडाला पाय लागून माझा पाय अडखळला आणि माझा तोल गेला. पडता पडता हातातली मशाल मी बाजूला भिरकावली आणि मुलीला काही लागू नये म्हणून तिला घट्ट पकडले. आणि तिला पकडूनच जमिनीवर पडलो. झाला आता काही खरं नाही ते पिशाच्च आमची अवस्था नक्कीच मांत्रिकासारखी करणार. मुलगी अजूनही अर्धवटच शुद्धीत होती पडल्यामुळे ती जरा जोरात कण्हली. माझा हातातून मशाल पडल्याने बाजूला पडलेल्या वाळलेल्या गवतांमध्ये आग लागली. आणि आमच्या आजूबाजूला आग पसरू लागली. घरमालकसुद्धा पळता पळता थांबला आणि मागे पाहू लागला. ते पिशाच्च मोठ्याने आवाज करतच जवळ आला. मी मरणाला सिद्ध झालो वाटलं बस्स एवढचं आयुष्य आपलं. आपल्यामुळे या बापलेकीचा जीव मात्र जाणार या विचाराने याही अवस्थेत मन विषण्ण झालं. एवढ्यात ते पिशाच्च आगीच्या जवळ आले. आणि जोरात ओरडले. आमच्या आजूबाजूला पूर्ण आगीच्या ज्वाळा पसरल्या भोवतीच्या झाडाझुडपानी पण आग पकडली. पिशाच्च बीभत्सपणे लांबूनच ओरडू लागले. इतक्यात माझा माझा लक्षात आले आमच्या आजुबाजूला असलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे पिशाच्च जवळ येत नाहीये. अरे हो खरंच, कदाचित आगीला ते ओलांडू शकत न्हवते. आग हि त्या पिशाच्चाची कमजोरी असावी कि काय. पिशाच्च तिथे उभा राहूनच आवाज करत होतं. मी क्षणाचाही विलंब न करता मुलीला पटकन उचलून खांद्यावर घेतले.

बाजूला पडलेली मशाल परत हातात घेतली. आणी घरमालकाला म्हणालो “ हे बघ पिशाच्च आगीमुळे पुढे येत नाहीये, तू मुलीला खांद्यावर घे आणि जोरात पळत सूट मी आलोच तुझा मागे”

त्यावर घरमालकाने होकारार्थी मान हलवली. आणि माझ्याकडून त्याने मुलीला आपल्या खांद्यावर घेतले आणि पळू लागला. मी सुद्धा त्यामागे पळत पळत आजूबाजूला दिसेल त्या झाडांना झुडूपांना मशालीने आग लावत पळू लागलो. आम्ही पिशाच्चाला बरेच मागे सोडले होते कारण जेथे आम्ही पाय ठेचकाळून पडलो तिथे खूपच वाळलेले गावात होते मशाल बरोब्बर त्यावरचं पडली ज्याने आग खूपच भडकली होती. त्या पिशाच्चाचे भयंकर चित्कार अजूनही ऐकू येत होते पण ते आता लांबून येत होते. देवाची कृपाच कि काय मला मशाल घेण्याची बुद्धी झाली होती. आणि आमचा जीव वाचला. आम्ही पळत पळत गावानजीक आलो. आजूबाजूला कोणताही धोका नसल्याचं पाहून एकमेकांशी एक अक्षरही न बोलता आमच्या घरामध्ये शिरलो.

दुसऱ्या दिवशी अॅलनन काल सांगितलेल्या त्या पिशाच्चाच्या भयानक अनुभवाचा विचार करतच माझा दिवस गेला. खरंच असं झालं असेल माझ्या मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली खोटं म्हणावं तर अॅलन तसं का सांगेल त्यात त्याचा काय फायदा, नाही नाही ते विचार माझा डोक्यात चालू झाले. इथ राहणं खरोखरंच सुरक्षित तर आहे ना असं वाटू लागलं. संध्याकाळी कंपनीमधून घरी आल्यावर घर खायला उठलं. जाताजाता बोमानला विचारावं आणि उगाचच मनाची सांत्वना करावी म्हणून त्याला विचारलं कि इथे खरंच मांत्रिकांना पिशाच्च इत्यादी शक्ती अवगत असतात का? त्यावर त्याने होकार भरला. अॅलनच्या घरमालकाला बोमान ओळखत होता आणि त्याची मुलगी पण तशीच बरी झालीय असं तो मला सांगू लागला. अच्छा म्हणजे अॅलनच्या घरमालकाची मुलगी बरी झाली होती तर. का कुणास ठावूक मला या घटनेची संपूर्ण माहित त्या घटनेसंदर्भात निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून जाणून घायची होती. तसं करण्यामागे माझे खरंतर माझे दोन हेतू होते एक असा कि अॅलन खरंच जे सांगत होता ते खरं होतं कि दारूच्या नशेत जंगलात रात्री अपरात्री भटकल्यामुळे आणि नंतर रात्री स्वप्न पडल्याने त्याचा डोक्यातून निघालेली हि काथोकाल्पित घटना होती कि दुसरंच म्हणजे हे जर खरं असेल तर आपण या जागी कितपत सुरक्षित आहोत हे कळणार होतं. जंगलाचा भाग मी राहतो होतो त्या जागेपासून इतका जवळ न्हवता तसा तो तितका लांबदेखील न्हवता. कोणत्या हिंस्र प्राण्याचा आणि नुकत्याच ऐकलेल्या अॅलन च्या भयानक पिशाच्ची अनुभवाचा धोका आपल्यापर्यंत पोचला तर? विचारानेच मला घाम फुटला एकतर माझा स्वभाव तसा भित्राच होता. रात्रीच काय तर दिवसासुद्धा जंगलात जायची हिम्मत माझ्यात न्हवती. जर इथे राहण्यात काही धोका असेल तर लवकरात लवकर आपलं बाडबिस्तर बांधून दुसरीकडे राहायला गेलेलं बरे कारण कंपनीचं आढावा घेण्याचं काम अजूनही संपलेलं न्हवत. काय करावं ते कळेना, तसं मला एक कल्पना सुचली कि आपण जरा अॅलनच्या घरमालकाला स्वतः भेटून त्याचाशी बोलून खऱ्या गोष्टीचा उलगडा करावा आणि पुढचं पाउल उचलावे.

त्या संध्याकाळी मी जेवणाच्या आधी अॅलनच्या घरमालकाला जाऊन भेटायचे ठरवले. तसं तो कुठे राहतो हे मला माहित होतेच, लगबगीने मी त्या घरमालकाच्या घराजवळ गेलो. घराच्या आजूबाजूला ४-५ शेळ्या जे खुंटीला बांधलेल्या होत्या, त्यांचा पडलेल्या मलमूत्राचा तीव्र वास दरवळत होता, बाजूलाच कोंबड्यांचे खुराडे असा सगळा प्रकार होता. मुख्य दरवाजा काहीसा उघडा होता. मी हातानेच त्यावर टकटक केली. तेव्हा आतून घरमालक बाहेर आला. मुलीच्या तब्बेतीची चौकशी करायला आल्याचं मी खोटच सांगितलं.


तो मला ओळखत असल्यामुळे त्याने मला आत घेतलं. आतमध्ये मंद असा दिव्याचा प्रकाश होता. आणि बाजूला घरमालकाची बायको आणि बरी झालेली मुलगी शांतपणे बसलेले होते. थोडं आत आल्यावर पाहतो तर की अॅलन देखील भिंतीला टेकून आढ्याकडे बसलेला होता. खरंतर अॅलन इथे असणार हे मला अपेक्षित न्हवते कारण अॅलन हा भाडेकरू असल्यामुळे तो त्याचा रूम मध्ये असेल असा माझा अंदाज होता. आणि तसंही अॅलन समोर मला घरमालकाला जास्त विचारपूस करावी असं वाटत न्हवत. मी अॅलनच्या बाजूला जाऊन बसलो.


‘’अरे तू इथे’ अॅलनने माझाकडे पाहून म्हटलं.

‘’हो, मुलीची तब्बेत कशी आहे ते पहायला म्हणून आलो पाहायला.’’ मी उतरादाखल म्हणालो.

‘’ देवाची कृपाच म्हणायची म्हणून ती बरी झाली म्हणायची आणि आमचं जीव देखील वाचला. घरमालक मधेच बोलला.


घरमालक वर पाहून आफ्रिकन भाषेत देवाचे आभार वगेरे मनात असल्यासारखे हातवारे करत होता.


‘’ अहो तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही कोणाचे काही वाईट केलंय काय ’’ घरमालकाने अजून काहीतरी बोलावे म्हणून मी उगाचच विषय वाढवायचा म्हणून बोललो.

‘’ यादिवशी हे साहेब होते म्हणूनच मला माझा आणि माझा मुलीला सहीसलामत परत आणता आले. घरमालक अॅलन बोट दाखवून म्हणला.


घरमालक एवढे अॅलनचे गोडवे गात असल्याचे ऐकून खरंतर ती पिशाच्चाची घटना खरीच असावी कि काय असा मला वाटून भीतीने पोटात गोळा आला. कारण हे जर खरं असेल तर मला मी एका धोक्याचा ठिकाणी राहतोय अशी शंका रास्त ठरली असती.


नंतर घरमालकाने मला परत एकदा अॅलननेच सांगितलेली ती घटना, ते दोघे कसे मांत्रिकाकडे गेले, पिशाच्च कसे मागे लागले हे परत विस्तारितरित्या सांगितलं.

घरमालकाची पत्नीनेदेखील आफ्रिकन मध्ये काहीतरी बडबडली. त्यावर घरमालक देखील तिला काहीतरी उत्तरला ते साहजिकच मला आणि अॅलनला न कळल्यामुळे घरमालकाने ते मोडक्या तोडक्या इंग्रजीत भाषांतर करून सांगितलं.


माझी बायको म्हणतेय कि ‘’ बिर्नाख पिशाच्च असल्याने खरंतर पोरीचा जीव वाचला, आणि मला पण तसच वाटतंय, नाहीतर ख्रास्तर किंवा बाडूम्बी पिशाच्च असत तर एव्हाना आम्ही कोणीच वाचलो नसतो’’ असं म्हणत घरमालक पुन्हा वर पाहत आभारप्रदर्शन करू लागला. मी आणि अॅलन जरा बुचकळ्यातच पडलो कारण आता घरमालकाने उल्लेख केलेला बिर्नाख किंवा ख्रास्तर हा की प्रकार आहे हे दोघांनाही कळाल न्हवता. आम्ही तसं घरमालकाला विचारलं कि हा काय प्रकार आहे. त्यावर घरमालक म्हणाला कि “प्रत्येक पिशाच्च हे विशिष्ट शक्तींच्यावर प्रभुत्व मिळून असते जसं कि आजारामधून मुक्तता, शत्रूचं खंडन, पिकाची आणि जनावरांची उत्तम पैदास अशा गोष्टी त्या पिशाच्च साधना केल्याने मांत्रिकाला मिळतात. त्यामुळे त्या त्या शक्तीं मिळवण्याकरिता मांत्रिक ठराविक पिशाच्चाची साधना करत असतात. जशा त्या पिशाच्चान्मध्ये शक्ती असतात. तसं त्यांच्यामध्ये एखादी कमजोरी सुद्धा असते, जसं कि बिर्नाख पिशाच्च हे आगीला मोठा लोळ असेल तर ओलांडून जाऊ शकत नाही. ख्रास्तर पिशाच्चाला पाण्याची भीती. बाडूम्बीला कोणत्याही वाद्याचा आवाज सहन होत नाही असे अनेक पिशाच्चाचे प्रकार असतात आणि त्यांचा जशा ठराविक शक्ती असतात तशा कमजोरी सुद्धा असतात. त्यामूळेच असे पिशाच्च आजूबाजूला येऊ नये किंवा त्रास देऊ नये म्हणून आमच्या इथे कधी मोठी शेकोटी करून लहानसहान वाद्ये वाजवत राहतात, प्राणी पाळतात किंवा अनेक गोष्टी करतात ज्या इथे बाहेरून येणाऱ्या लोकांना विचित्र वाटतील पण असं करणे हे आमच्या संरक्षणासाठी आणि फायद्याचे असते किंवा तशी प्रथाच आहे इथली. प्रामुख्याने यामागे अशा पिशाचांचा उपद्रव होऊ नये हि धारणा असते ‘’


घरमालकाने दिलेली ती अभिनव माहिती ऐकून माझा तर पोटात गोळाच आला एकतर अॅलनने सांगितलेली घटना सत्य असल्याचं आढळलं आणि दुसरं म्हणजे अशी बऱ्याच प्रकारची पिशाच्च असतात हे ऐकून धडकी भरलेली होती. आता काय करावे हा प्रश्नच माझ्यापुढे होता कारण कुठेही गेले तरी आफ्रिकन भूमीतली पिशाच्च सगळीकडे असणार होती त्यामुळे घर बदलून फायदा न्हवता. आता करावे तरी काय विचार करतच मी आणि अॅलन घरमालकाचा निरोप घेऊन खानावळीकडे निघालो.


जेवण करत असताना मी शांत असल्याचं पाहून अॅलन म्हणाला ‘’ की झाला खूप शांत वाटतोय आज, कामाचं काही टेन्शन आहे का”

“ अं हो जरा जास्तच काम पाहावं लागतं म्हणून जरा त्याच विचारात होते” असं बोलून खरंतर मी घरमालकाने केलेल्या पिशाचांच्या त्या इत्यंभूत वर्णनाने गर्भगळीत झालो असल्याचं सांगायची लाज वाटून चक्क खोटं बोललो. होतो आणि मलाच माझा या खोटे बोलण्याची कीव वाटली, कि साला काय भित्रे आहोत आपण. ज्या व्यक्तीसोबत ती भयानक घटना ,घडली ज्याने ते पिशाच्च प्रत्यक्ष पहिले तो अॅलन किती स्थिर होता आणि माझा त्या घटनेमध्ये काहीही सहभाग नसून किंवा ते पिशाच्च पहिले देखील नसून माझी हि अवस्था. खरंच अॅलनच्या धाडसाच कौतुक करावं तेवढ थोडंच होतं. प्रसंगावधान राखून त्याने घरमालकाच्या मुलीचा जीव वाचवला होता.


आमचं जेवण संपत आले तसं अॅलन मला म्हणला “ चल आज माझा रूमवर झोप, तेवढ्याच गप्पा होतील आणि एक दोन घोट घेऊयात. डोळे मिचकावत अंगठा तोंडाकडे नेत अॅलन म्हणला.


उद्या मला तसंही फारस काम न्हवत उशिरा गेलो असतो तरी चालल असत आणि बरेच दिवस मी सुद्धा दारू प्यायलेलो न्हवतो कधी मधी मी घ्यायचो, पण इथे आल्यापासून कामाच्या धावपळीत काही जमलं नाही. शिवाय पिशाच्च प्रकरण कळल्यापासून मी जरा धास्तावलेलोच होतो. त्यामुळे अॅलनची ती विनंती मी चटकन स्वीकारली आणि आम्ही दोघे त्याचा रूमकडे जाण्यासाठी वळलो.


रूमवर शिरताच जास्त वेळ न दवडता आम्ही लगेचच ग्लास भरायला सुरुवात केली. अॅलनने एक त्याचसाठी आणि एक माझासाठी ग्लास भरला आणि चियर्स असं म्हणत आम्ही ग्लास तोंडाला लावला. अॅलन त्याचा सैन्यदलातील आयुष्याबाबत सांगत होता. जसजसं पिऊ लागलो तसं गप्पांना रंग येऊ लागला अर्थात बोलत तो होता मी आपलं ऐकत होतो मधेचच ओह्ह, रिअली असे आश्चर्य वजा कुतूहलमिश्रित उद्गार काढायचो. माझा त्या उद्गारांनी प्यायलेला अॅलन अजूनच चेकाळून बोलायला लागायचा.


हळू हळू रात्र चढायला लागली आणि दारूचा अंमल पण चढू लागलेला होता. रातकिड्यांचा आवाज जास्तच येऊ लागला. आम्ही जिथे पीत बसलो होतो तिथेच बाजूच्या भिंतीवरच एक खिडकी होती ती अर्धी उघडी होती आणि तिथून थंड हवेचा झोत माझा अंगावर येत होता. दारू चढल्याने आणि थंड वाऱ्याचा झोताने मला झोप येऊ लागली, अॅलन काही थांबायचे नाव घेईना, त्याचा गप्पा अविरत चालूच होत्या. मला गुंगी येऊ लागली आणि मी कधी झोपी गेलो कळलंच नाही. अचानक रात्री कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. मी जरासा दचकूनच उठलो. खिडकी वाऱ्याचा आवाजाने करकरत होती, मला उठायची अजिबातच इच्छा न्हवती पण खिडकीची करकर चालू असताना झोप लागणारच न्हवती. कसाबसा चरफडत मी उठलो. खिडकीची अवस्था खरंतर बिकटच होती, पूर्णपणे जुनाट झालेली दिसत होती. खिडकीपाशी येऊन मी कसाबसा उभं राहिलो कारण दारूचा काहीसा अंमल अजूनही माझावर होता तसचं दारूमुळे अंगही जरासं ठणकत होतं.


खिडकीपाशी उभं राहून मी माझी दृष्टी बाहेर टाकली अंगावर थंड हवेचा झोत अलगद माझा अंगावर आला. समोर पाहिलं तर दूरदूरवर फक्त मैदानच दिसत होतं आणि काहीशी झाडे, मी खिडकी ओढून बंद करणार एवढ्यात समोरच्या झाडामागे कसलीतरी खुसपूस मला जाणवली. कसलेतरी जंगली जनावर किंवा सरपटणारा प्राणी असेल असं समजून मी खिडकी ओढून घेणार इतक्यात ..


समोरच्या झाडामागून झाडाच्या वाळलेल्या फांदिसारखा दिसणारा एक लांब हात मागून पुढे आला आणि झाडामागून कसलीतरी आकृती डोकावून पुढे पाहू लागली, ते दृष्य पाहताच भीतीने माझी बोबडीच वळाली. हा भ्रम आहे कि सत्य मला काहीच थांग लागेना. जागच्या जागी थीजल्यासारखा मी तिथेच खिडकीपाशी उभा होतो. त्या झाडामागून फांदिवजा हातापाठोपाठ एक गोलाकार रुंद डोके बाहेर आले. ज्याला डोळे असे न्ह्व्तेच त्या जागी फक्त खोबण्या होत्या. हे पाहून माझ्या तोंडच पाणीच पळाल, सर्वांगाला घाम फुटला आणि माझी उरलीसुरली नशा खाडकन उतरली. त्या आकृतीने घोड्यासारखा फुरफुरत कसलातरी आवाज केला. आणि तशी मी घाबरून जोरात बोंब ठोकली.


माझ्या जोरदार बोंबलण्याने झाडामागच्या आकृतीने हवेतच खिडकीपाशी असे काही उड्डाण केले कि मी घाबरून मागे पडलो. मागे ठेवलेला दारूच्या ग्लासाला धक्का लागून तो फुटला आणि नेमका माझा हात त्यावर पडला आणि खसकन एक काच माझा हातात घुसली. आणि एक कळ माझा हातातून मस्तकात गेली. माझ्या ओरडण्याने अॅलन झोपेतून खाडकन जागा झाला होता. जसा तो जागा झाला तसं त्याने खिडकीतील आकृतीकडे आणि जमिनीवर रक्ताळलेला हात पकडून कण्हत बसलेल्या माझ्याकडे पाहिलं. अॅलनकडे पाहून त्या आकृतीने जोरदार आवाज केला जणूकाही वाफेच्या इंजिनाची शिट्टी असावी तसा. तो आवाज ऐकताक्षणी आता मरण जवळ आलेलं आहे असं समजून मी जमिनीकडे पाठ टेकून लोळण घेतली.


पण याउलट अॅलनने चित्त्याप्रमाणे झेप घेऊन बाजूला पडलेला त्याचा लायटर घेतला. आणि मगाशी दारू पितापिता आपला अर्धवट राहिलेला ग्लास हातात घेतला. अॅलनची हालचाल खूपच चपळाईने झाली. खिडकीतून त्या आकृतीने आपले डोके आत घ्यायला सुरुवात केली तेवढ्यातच अॅलनने लायटर पेटवला आणि ग्लासामधील अर्धी दारू चटकन प्यायला आणि सर्कशीमध्ये मध्ये आगीचे खेळ करणाऱ्या लोकांप्रमाणे लायटर समोर तोंडातील दारू भसकन थुंकल्याप्रमाणे सोडली. तसं लायटरच्या आगीमुळे आणि दारूचा संपर्क येऊन मोठा आगीचा लोळ निर्माण झाला आणि खिडकीमध्ये तोंड घातलेल्या त्या झाडाप्रमाणे असणाऱ्या आकृती च्या सरळ तोंडावर गेला. मोठ्याने आवाज करत ती झाडसदृश आकृती बाजूला झाली. मी मात्र हा सगळा प्रकार गलितगात्र झाल्याप्रमाणे जमिनीवर पडून बघत होतो. हाताला काच लागल्याने रक्त वाहत होत आणि वेदना होत होत्या.


ती आकृती आगीमुळे लांब गेल्यानंतर अॅलनने मला उचललं आणि आपल्या खांद्यावर घेतलं. माझ्या हाताला लागल्याने आणि भीतीने माझी बोबडी वळल्याने माझ्याशी बोलण्यात काही अर्थ आहे असं त्याला वाटलं नसावं. मला खांद्यावर घेऊन त्याने मुख्य दरवाजावर लाथ घातली तसा दरवाजा उघडला. आणि मला खांद्यावर घेऊन एका वीराप्रमाणे रस्त्यावरुन पळत सुटला.


“ ते पिशाच्च फक्त आगीमुळे काही काळ लांब गेले आहे, ते परत आपल्या मागावर येण्याची शक्यता आहे, ते यायच्या आत आपल्याला शक्यतो लवकर इथून निघायला हवं “ पळत पळतच अॅलन मला म्हणाला. पिशाच्च हे नाव ऐकून माझ्या तोंडच पाणी पळायला आता माझात अंगात काहीच उरलं न्हवता.


“ अ..आ.. कु..कुठे चाललोय आपण.. फक्त एवढंच म्हणत कण्हत भानावर आल्यासारखं मी अॅलनला विचारलं.

“ तुझा घरी “ एवढंच अॅलन म्हणाला. त्याचे ते ऐकलेले मी त्या रात्रीचे शेवटचे शब्द त्यानंतर माझी शुद्ध हरपली.


नंतर जेव्हा मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या रूमवर बेडवर पडलेलो होतो. माझा हाताला मलमपट्टी केलेली होती. सकाळ झाल्यासारखं वाटत होतं. खिडक्यांमधून येणारा कसलातरी जळका वास माझा नाकात शिरला आणि मला शिंकायला आलं. माझा शिंकण्याचा आवाजाने बाहेरच्या खोलीत बसलेला अॅलन पळतच आत माझाकडे आला.

“ मित्रा बऱ वाटतय का तुला” काळजीनेच माझा जवळ येत अॅलनने मला विचारलं.

“ हो ठीक आहे आता” असं म्हणत मी उशीच्या आधाराने भिंतीला टेकून बसू लागलो.

“ मला रात्री इथे कसे आलो ते काहीच आठवत नाहीये” भिंतीला टेकत मी अॅलन ला विचारलं.


या माझा प्रश्नावर तो फक्त हसला. आणि माझी शुद्ध हरपल्याची आणि इथे आल्याची इत्यंभूत माहिती त्याने मला दिली. रात्री पळत इथे आल्यानंतर त्याने मला बेडवर झोपवलं आणि माझी मलमपट्टी सुद्धा केली होती. रात्री परत पिशाच्च इथे येऊ नये म्हणून घरात जागोजागी शेकोट्या पेटवून ठेवल्या होत्या. मगाशी त्याचाच जळका दर्प माझा नाकात गेला होता. खरंच त्याचमुळे आज माझे प्राणच वाचले होते असे म्हणायला हरकत न्हवती. मी त्याचे मनापासून आभार मानले. आज खरंच तो नसता तर माझी काहीच धडगत न्हवती. पण अॅलनच्या म्हणण्यानुसार माझे प्राण वाचवणे हे अॅलनचे कर्तव्यच होते कारण ते पिशाच्च अॅलनच्या मागावर होते, घरमालकाच्या मुलीला बर करायला गेल्यावर तिथे आलेले पिशाच्च हेच होते. अॅलनच्या म्हणण्याप्रमाणे त्यानेच त्या पिशाच्चाला उकसावले आणि म्हणूनच ते त्याचा मागावर त्याचा खोलीपर्यंत आले आणि योगायोगाने त्या रात्री मी अॅलनच्या खोलीवर असल्याने त्या पिशाच्चाने माझासुद्धा खरपूस समाचार घेतला होता.


पिशाच्चाचा त्या नुसत्या नावानेच मला सकाळ सकाळ घाम फुटला. त्या रात्री माझी अवस्था खरंच भयानक झाली होती. एवढ जीवावर बेतलं, खरंच या गोष्टी घडतील अशी अपेक्षासुद्धा केली न्हवती. आता इथे राहणं खरंच मला धोक्याचं वाटू लागलं. दैवयोगाने म्हणा किंवा अॅलनच्या तल्लख बुद्धीने त्या रात्री आपण जिवंत राहिलो नाहीतर काय झालं असत याचा विचार न केलेलाच बरा. आपली बायका पोरं तिथे आपल्या मायदेशी उघड्यावर पडली असती, ते काही नाही आजच कंपनी मध्ये प्रकृतीच कारण सांगून इथून सटकलेलच बर नाहीतर उद्या परत काही वेगळा घडलं तर जाळायला आपलं शरीर सुद्धा सापडणार नाही. मी माझा विचार अॅलनला बोलून दाखवला इथे राहण्याबाबतचे धोके आणि इथल्या विचित्र पद्धती एके दिवशी आपल्या जीवावर उठतील.

माझं बोलणं ऐकून अॅलन विचारात पडला.


“ कसला विचार करतोयस “ मी म्हणालो.

“ काही नाही रे .. एकतर ते पिशाच्च माझामुळे क्रुद्ध होऊन आपल्या मागे लागलं. त्यादिवशी मांत्रिकाच्या मुलीचा सुद्धा जीव माझामुळेच जाता जाता राहीला. काल सुद्धा ते पिशाच्च माझा मागावरच माझ्या रूमपर्यंत आले होते पण योगायोगाने ते तुला पाहून तुझा जीवावर उठले “अॅलन म्हणाला.

“ पण तुला नक्की म्हणायचंय काय “ ना कळून मी विचारलं.


“ हेच कि तू इथून जा हवं तर पण माझ्यामुळे ते पिशाच्च आता इतर कोणालाही त्रास देणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार मला, कारण आज ते तुझा जीवावर उठले उद्या न जाणो माझा घरमालकाच्या मागे लागेल त्याचे कुटुंब आधीच गरिबी आणि आजारांनी त्रस्त आहे त्यात अजून हि असली भयानक अवदसा मागे लागल्यावर तर बिचारा कोलमडूनच पडेल. देव ना करो पण त्याचा कुटुंबातल्या लोकांचा जीव मी त्या पिशाच्चाला घेऊ देणार नाही ” अॅलन निग्रहाने म्हणाला.


काही वेळ शांततेत गेला. अॅलन ने उठून खोलीमधली खिडकी उघडली. त्याने जशी खिडकी उघडली तसं मंद थंड हवेचा झोत आतमध्ये आला, मला तो बराच सुखावून गेला.

काही वेळाने त्या शांततेचा भंग करत मी अॅलन ला म्हणालो “ पण आपण काय करू शकतो मित्रा. ते एक पिशाच्च आहे कोणी हाडामांसाचा माणूस असता तर मारून मुटकून वठणीवर आणता आला असता. इथे तर भयंकर अशा पिशाच्चाशी गाठ आहे. आपण त्याचं की वाकड करू शकतो.

“ माहित नाही, पण आता काही झालं तरी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी माघारी परतणार नाही, मग परिणाम काहीही होवो” हाथ मागे बांधून खिडकीच्या बाहेर पाहत अॅलन निश्चयपूर्वक म्हणाला.


अॅलन च्या या निग्राहाच्या निर्णयामुळे मला एकट्याला या आफ्रिकन भुमिमधून काढता येईना. आपण किती स्वार्थीपणाने विचार करतो याचच मला दुख: झालं याउलट अॅलन ने त्याचा घरमालकाच्या गरीब कुटुंबाचा विचार केला. आपण इथून कसेबसे जीव वाचवून जाऊ पण त्या गरीब घरमालकाच्या कुटुंबाचं काय हा विचार त्याने केला पण असा विचार माझा मनात आला न्हवता. श्या.. काय हा आपण असे कसे विचार करू शकतो याची माझी मलाच लाज वाटू लागली. प्रकृतीच कारण सांगून २-३ दिवस कंपनी मध्ये येणार नाही असं तिथल्या सुपरवायझर ला मी निरोप दिला आणि मी सुद्धा अॅलन च्या या कार्यात सहभागी होण्याचं ठरवलं. त्या दिवशी दुपारच्या सुमारास अॅलन च्या घरमालकाच्या घरी आमची बैठक जमली, मी , अॅलन, माझा गेस्टहाउस चा केअरटेकर बोमान, अॅलनचा घरमालक आणि त्याचा घरातले लोकं.


माझावर आणि अॅलन वर काल रात्री गुदरलेला बाका प्रसंग ऐकून सगळेजण हादरलेले होते.


“ तुम्हाला सांगत होतो मी साहेब रात्री अपरात्री बाहेर पडू नका “ बोमान काळजीच्या सुरात म्हणाला.

“ अरे हो .. पण मी अॅलनकडेच गेलो होतो दुसरीकडे कुठे नाही “ मी उत्तरलो.


“ खरंच मी उगीचंच तुम्हाला त्या मांत्रिकाकडे नेलं आणि त्यामूळेच तुमच्यावर अशी वेळ आली.” अॅलनचा घरमालक अॅलन कडे पाहत म्हणाला.


सगळेजण आपापलं म्हणण मांडत होते, घरमालकाची बायको आणि मुलगी मात्र एका कोपऱ्यात शांतपणे ऐकत उभे होते. तसचं अॅलनसुद्धा शांतपणे सगळ्याचं ऐकत भिंतीला टेकून उभा होता.

घरमालक आणि बोमान त्या पिशाचाच्या मागे किती ताकद आहे हे सांगत होते.


“ आता आपल्या पुढे एकच मार्ग आहे.” अॅलन जमिनीकडे पाहत मधेच म्हणाला.

“ कोणता मार्ग “ घरमालक आणि बोमान आपली बडबड थांबवून शंकेच्या सुरात म्हणाले.

“ या पिशाच्चाने आपल्यापैकी कोणाला काही करायचा आत आपणच त्या पिशाच्चाला शोधून नेस्तनाभूत करणे” अॅलन ची नजर अजूनही जमिनीवरच होती.

“ का..काय बिर्नाखाला नेस्तनाभूत करायचं.. अहो साहेब काय बोलताय एवढ सोपं आहे का ते,” घरमालक घाबरत मोठ्याने म्हणाला.

“ हे तर मोठ्ठ वेडेपणाच काम आहे “ आपले मोट्ठे डोळे अजूनच मोठे करत बोमानने घरमालकाला दुजोरा दिला.

“ का ? काय अवघड आहे. आपल्या कुटुंबावर त्याने जीवानिशी हल्ला केला तर काय करणार आहात तुम्ही लोकं “अॅलन आपली नजर घरमालकावर रोखत म्हणाला.


“ साहेब हे मान्य आहे तुम्ही दोन वेळा बिर्नाखाचा सामना केला आहे, त्यामुळे तुम्ही एवढ आत्मविश्वासाने बोलताय पण तुम्ही म्हणताय एवढं सोपं काम नाहीये ते.त्यात आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. त्या मांत्रिकाची काय हालत झाली आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलीय ना साहेब “ घरमालक दीनवाण्या सुरात म्हणला.


त्यावर मी पुढे होऊन घरमालकाला म्हणालो “ हे बघ मी आणि अॅलन इथून जर निघून गेलो तर ते पिशाच्च तुमचा जीवावर उठेल, तुमचा कुटुंबाला धोका आहे हे तुम्हाला कळत कसं नाहीये. आपण काही नाही केलं तरी तसंही ते आपल्या मागे लागलेलंच आहे, तुमच्या कुटुंबाला कोणताही धोका नको म्हणूनच अॅलन त्याला संपवायला निघालाय ना..? आणि पिशाच्चाला मारण एवढं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नसेल. कारण परमेश्वरापेक्षा शक्तिशाली दुसरं कोणी असू शकेल का ? आम्ही परमेश्वर आपल्या सोबत आहे म्हणूनच तर दोनदा आपण पिशाच्चाच्या तडाख्यातून वाचलो ना. काहीतरी मार्ग नक्कीच असेल त्या बिर्नाख पिशाच्चाला संपवण्याचा.


माझा बोलण्याने घरात खूपच शांतता पसरली घरमालकासह इतर सगळेच शांत झाले. घरमालकाला माझं म्हणण पटत होतं पण त्याचं हे करण्याचं धाडस होत न्हवत. बिर्नाखाशी टक्कर म्हणजे साक्षात मृत्यूशी सामना असं त्याला वाटत होतं.


शेवटी अॅलन पुढे आला आणि घरमालकाच्या हाताला पकडून त्याचा मुलीसमोर ओढत उभं केलं आणि म्हणाला” हि तुझी मुलगी आणि बायको हे तुझावर विसंबून आहेत. आता जर तू माघार घेतलीस आणि यांना उद्या काही झालं तर सर्वस्वी तू जबाबदार असशील कळतंय का तुला. घरमालक मान खाली घालून उभा होता. तो काहीच बोलत नसल्याचं पाहून अॅलन माझाकडे पाहत बोलला “ असं वाटतय आपल्या दोघांनाच हि कामगिरी पार पाडावी लागणार आहे. असं बोलून तो दरवाजाजवळ गेला.


“ आपल्याला “बांगा” कडे जावं लागणार मदतीसाठी” घरमालक बोलला तसं अॅलन जाताजाता दरवाजाजवळच थांबला.

“ काय..कोणाकडे..” मला नाव नीट न ऐकू आल्यामुळे मी घरमालकाला विचारलं.

“ बांगा” बऱ्याच लोकांना त्याने मदत केलीय पिशाच्चांचा त्रासा पासून, कोणाच्या शेतात धान्य उगवत नसेल किंवा अचानक रात्री पाळीव प्राण्यांचे मृतदेह घराबाहेर पडत असतील तर लोकं बांगालाच शरण जात” घरमालक गूढ स्वरात म्हणला.


“ असं.. कुठे मिळेल हा माणूस आपल्याला “अॅलन घरमालकाजवळ येत म्हणला.


“ टोन्डू टेकड्यांचा जवळ त्याची झोपडी आहे तो तिथेच असतो. चांगला माणूस आहे तो खूप लोकांना मदत केलीय त्याने त्याबदल्यात त्याला फक्त खाण्याचं सामान द्यावं लागत इतर काहीही तो घेत नाही. तो जास्त लोकांमध्ये मिसळत नाही पण त्याने आजपर्यंत बऱ्याच पिशाचांचा सामना केलाय“ बोमान मधेच बोलला.


“ मग आपल्याला या बांगा कडे जावच लागणार तर त्याची मदत होईल आपल्याला “अॅलन विचार करत म्हणाला.


यावर कोणीच काही बोललं नाही शेवटी त्या पिशाच्चाचा नायनाट करण्यावर सगळ्याचं एकमत झालं होतं. आता या बांगा नावाच्या माणसाकडे जाऊन पुढची आखणी करावी लागणार होती. आजचं निघावं असं अॅलन ने सगळ्यांना सांगितलं जेवढं शक्य असेल तेवढी लवकर हालचाल करावी असं अॅलन चं मत होतं. त्यानुसार सगळेजण आवश्यक त्या गोष्टी घेऊन तयारीला लागले. बांगासाठी जेवणाच सामान, पायात मोठे बूट, मशाली वगेरे साहित्य. सगळ्या सामानाची तयारी करून संध्याकाळच्या सुमाराला आम्ही सगळेच टोन्डू टेकड्यांचा रोखाने निघालो. माझ्याकडे अॅलनची रायफल होती ती कशी वापरायची याचं जलद प्रशिक्षण त्याने मला दिलेलं होतं. बोमान आणि घरमालकाकडे सुऱ्या होत्या. जवळपास २-३ मैलाचा रस्ता होता. मैलभर जंगलामधून गेल्यानंतर मोकळ्या मैदानातून पण झाडाझुडूपांचा गर्दीमधून आम्ही पुढे चाललो होतो. पुढे घरमालक आणि अॅलन त्यांचामागोमाग मी आणि बोमान आम्ही सगळेचजण चाललो होतो. अॅलन घरमालकाच्या कुटुंबासाठी एवढी जोखीम घ्यायला निघालेलं पाहून बोमानला गहिवरूनच आलं. घरमालक सुद्धा अॅलनकडे आदराने पाहू लागलेला होता.


पश्चिम क्षितिजावरून सूर्य अस्ताकडे चाललेला होता त्याचा लालिमा आभाळात सगळीकडे पसरलेला होता. आकाश निरभ्र असल्याने तो रंग जास्तच उठून दिसत होता.

सगळेजण शांतपणे चाललेले होते ती शांतात तोडायचा प्रयत्न करून


“ बांगा आपली मदत नक्की करू शकेल ना “ मी उगाचच घरमालकाला विचारलं

“ हो हो नक्कीच .. मी सांगितलं ना तुम्हाला तो सगळ्यांना मदत करतो. त्याचाकडे पण काही विशिष्ट मंत्रसिद्धी आहेत ज्या तो लोकांच्या भल्याकरिता वापरतो. घरमालकाने उत्तरं दिल.


“ जर असं आहे तर तुझी मुलगी आजारी पडल्यावर तू तिला बांगाकडेच का नाही घेऊन गेलास” अॅलनने घरमालकाला विचारलं.


“ त्याचं काय आहे कि . आजारी माणसाला बऱ करण्याची मंत्रशक्ती बांगाकडे नाहीये, तो फक्त शेतजमिनीची उत्तम जोपासना, पाळीव प्राण्याचे पिशाच्चापासून रक्षण, आणि जर घरावर कोणी वाईट हेतूने काळी सावली पाडली असेल तर यांपासून बचावाचे उपाय करतो” रोग बरे करायचे असतील तर बिर्नाखाला शरण जावं लागतं त्याची उपासना करावी लागते. बांगा कधीही कोणत्या पिशाच्चाची उपासना करणार नाही” घरमालक चालत चालत खाली पाहत म्हणाला.


मोठं गूढ आणि रसपूर्ण वक्तव्य घरमालकाने केलं होतं त्याला अजून काही विचारावं असं वाटून मो तोंड उघडलं एवढ्या बोमान म्हणाला 

“ त्या बघा त्या टोन्डू टेकड्या, आता आपण थोड्याच वेळात पोहोचू “


समोर एका मैलावर पसरट आकाराच्या टेकड्यांचा घोळका दिसत होता. त्या टेकड्यापासून काही अंतरावर लांब माणसांची वस्ती होती होती. आम्ही चालत चालत त्या टेकड्यांचा जवळ पोचलो

“ आणी ती बांगाची झोपडी “ घरमालक समोरच्या छोट्या टेकडीकडे निर्देश करत म्हणाला.


२-३ मोठ्या टेकड्यांचा मधोमध एक लहानशी टेकडी होती त्यावर झोपडी सारखं एक खोपट दिसत होतं. आणि वरून धूर निघत होता.

आम्ही थोड्याच वेळात बांगाच्या झोपडीजवळ येऊन पोहोचलो. बाजूला ३-४ कोंबड्या खुराड्यात कोंडलेल्या होत्या. शेजारीच खुंटीला बांधलेल्या २ शेळ्या कुतूहलाने आमच्याकडे पाहत जमिनीवर पाय दुमडून बसल्या होत्या. त्या खुराड्याभोवती आणि शेळ्यांच्या भोवती मोठ्ठ लालसर मातीचं एक रिंगण केलेलं होतं. झोपडीच दार बंद होतं. आता बांगा आत झोपडीमध्ये असला पाहिजे नाहीतर परत त्याची वाट पाहत बसायला लागलं असत, आता सूर्यास्त होऊन आता चांगलाच काळोख होऊ लागलेला होता.


घरमालकाने पुढे होऊन बांगाला आवाज दिला.


तसं आतून मधून एक धीरगंभीर आवाज आला. म्हणजेच बांगा आतच होता तर.


“ माझामागे आत मध्ये या “ घरमालक झोपडीचा दरवाजा उघडत म्हणाला.


घरमालक आत गेला तसे आम्हीदेखील एक एक करत आतमध्ये गेलो.


झोपडी बऱ्यापैकी ऐसपैस होती. कोपऱ्यात शेकोटी पेटवलेली दिसत होती आणि तिच्या वरच्या बाजूला एक भगदाड होतं जेणेकरून धूर झोपडीमध्ये नं राहता बाहेर निघून जावा.

त्याचा विरुद्ध दिशेला झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक माणूस मांडी घालून चूल पेटवत होता चुलीवर एक मातीचं भांड होतं.

घरमालकाने पुढे जाऊन बांगाला नमस्कार चमत्कार केला. बांगा दिसायला खुपंच मजबूत शरीरयष्टीचा आणि चांगलाच उंचपुरा होता. त्याचा तोंडावर लाल रंगाचे तीन पट्टे ओढलेल दिसत होते. दंडावर वाघाच्या तीन नखांचा ताईत होता. कमरेला वाघांचा कातड्याच बनवलेलं वस्त्र आणि वर उघडाच असा एकंदरीत त्याचा पेहराव होता. त्याने हसूनच घरमालकाच स्वागत केलं.

घरमालकाने आमच्या तेथे येण्याचं कारण बांगाला सांगितलं तसा त्याचा चौकोनी चेहरा गंभीर होत गेला. त्यांची सगळी चर्चा आफ्रिकन भाषेत चाललेली असल्याने आम्हाला त्यातलं काही कळाल नाही.

नंतर बांगा अॅलन जवळ आला आणि आफ्रीकांमध्ये शांतपणे काहीतरी बोलला ते न समजून अॅलन ने घरमालकाकडे पाहिलं. तेव्हा घरमालकाने भाषांतर केलं “ तो म्हणतोय कि आजवर परदेशी लोकांना आफ्रिकेतल्या पिशांचांची फक्त नाव ऐकूनच पळुन जाताना पाहिलंय. पण त्यांचाशी सामना करणारा तुझासारखा धाडसी माणूस पहिल्यांदाच पाहतोय”

यावर अॅलन काहीही न बोलता फक्त हसला.


“ एका गरीब आफ्रिकन माणसासाठी त्याचा कुटुंबाच्या रक्षणासाठी तू आणि तुझे सहकारी जीव धोक्यात घालतायत मला तुमचा अभिमान वाटला. आणी म्हणूनच मी नक्कीच तुम्हाला मदत करेन “ बांगा पुढे म्हणाला.


तसे एक हात वर करत आफ्रिकन भाषेत बांगाने कसलीतरी आरोळी दिली त्यामागोमाग घरमालकाने आणि बोमाननेही हात वर करत त्या आरोळीचा पुनुरुच्चार केला.


थोडक्यात बांगा आमच्या मदतीसाठी तयार झाला होता. मला हायसं वाटलं. मग आम्ही सगळे त्या पिशाच्चाला कसं बोलवावं आणि त्याचा खात्मा करावा यावर चर्चा विमर्श करू लागलो. बाहेर चांगलाच काळोख पडलेला होता. दुरून कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती.

रात्र झाल्याने बांगाने आम्हा सर्वांना बसायला सांगून चुलीवर तापत असलेला मातीच भांड खाली उतरवलं आणी बाजूच्या टोपली मधील ५-६ कंदमूळ काढली ती मातीच्या तव्यावर चांगली भाजली. नंतर भांड्यामध्ये असलेला घट्ट द्रवपदार्थ आणी ती कंदमूळ आम्हा सर्वांना वाढली, आणी आम्ही सगळेजण पुढ्यातला त्या पदार्थाचे सेवन करू लागलो.


“ पुढची योजना कशी आखणार आहोत आपण “अॅलन बांगाकडे पाहत म्हणाला.


“ आपण त्या बिर्नाख पिशाच्चाला आपल्याकडे आकृष्ट करून घेणार आहोत ते एकदा आलं कि मग आपण त्याचा खात्मा करू “ पुढ्यात असलेलं कंदमूळ दाताने कुरतडत बांगाने उत्तरं दिलं. अर्थात त्या दोघांमध्ये दुभाषाच काम घरमालक करत होता.


“ पण नक्की कस? “अॅलन ने आश्चर्यकारक रित्या विचारलं. मलासुद्धा उत्सुकता होती कि आपण त्या पिशाच्चाला आकृष्ट कसे करणार आहोत.


बांगाने बाजूला ठेवलेल्या बोचक्यातून एक भांड आणि कसलीतरी पुरचुंडी बाहेर काढली.

“ त्यासाठी आपण तुमच्या रक्ताचा वापर करणार आहोत. “ बांगा शांतपणे म्हणाला आणि त्याने बोचक्यातून काढलेलं भाडं अॅलन च्या पुढ्यात ठेवून पुरचुंडीची गाठ सोडली त्यातून पांढऱ्या रंगाची माती अॅलनच्या समोर असलेल्या भांड्यात टाकली.

“ या मातीत तुमचं थोडसं रक्त टाकून विशिष्ट मंत्रोच्चार करावे लागतील. त्यासरशी तुमचा माग काढत ते पिशाच्च त्या भांड्याजवळ येईल. पुढे मी सांगेन काय करायचं ते” बांगा एवढ बोलून चुलीमधली लाकडं व्यवस्थित करू लागला.

आमचं सगळ्याचं खाऊन झालं. आणी परत आम्ही चर्चा करू लागलो.


बांगा बोलू लागला – इथून जवळच काही अंतरावर एक कुरणवजा मैदान आहे, तिथे बऱ्यापैकी पिशाच्चांचा वावर असतो. टोन्डू टेकड्या उतरून मागे गेलो कि उताराला एक ओढा लागेल तो ओलांडून पुढे गेलं कि काही अंतरावरच ते मैदान लागेल.


“ पण ती जागा तर वावरण्यासाठी निषिद्ध आहे “ घरमालक म्हणाला.

“ हो कारण तिथे पिशाच्च वास करतात, तिचं जागा आहे जिथे आपल्याला आपलं सावज मिळेल “ बांगा त्यावर म्हणाला.

“ असं असेल तर लागलीच आपल्याला तिथे जावं लागेल “अॅलन पुढ्यात असलेल्या भांड्याकडे पाहत म्हणाला.

“ आज पोर्णिमेनंतरचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आजसुद्धा जाऊ शकतो कारण पुढे नंतर चंद्र जसजसा कमी होत जाईल तसं पिशाचांचा तिथला वावर कमी होतो. त्यामुळे जे काही करायचं असेल ते या काही दिवसातच करणे योग्य ठरेल “ बांगा म्हणला.


बांगाच्या त्या विधानावर कोणीच काही बोललं नाही. अॅलन ने सगळ्यांना तयार व्हायला सांगितलं आपण आत्ताच तिथे जाणार आहोत. सगळेजण तयार झाले.

टोन्डू टेकड्यांचा मागच्या बाजूला जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्याने आम्ही सगळेजण चालू लागलो. सर्वात पुढे बांगा मशाल घेऊन वाट दाखवत होता. त्यामागोमाग अॅलन, घरमालक, बोमान आणि मी. चंद्राचा मंद प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. घुबडाचे घुत्कार ऐकू येत होते. एखाद जंगली श्वापद आलाच तर संरक्षणासाठी घेतलेलं रायफल माझ्या खांद्यावरच होतं. थोड्याच वेळात ओढा लागला. पाण्याचा खळखळ आवाज रात्रीचा गंभीरपणा कापत असल्याप्रमाणे तो वाटला. सावधपणे ओढा ओलांडून आम्ही पुढे आलो. समोर कुरण असलेलं मैदान होतं

तसं बांगा ने आम्हाला थांबण्याची खुण केली. त्याचा जवळ असलेल्या पाण्याच्या कातडी थैलीमधील पाणी तो घटाघटा प्यायला.


“ आता मी सांगतो ते नीट ऐका “ बोलता बोलता तोंड पुसत एका झाडाच्या आडोशाला बांगा उभा रहिला.

“ मी आणि अॅलन आता समोरच्या कुरणाच्या मैदानात जातो. त्या भांड्यात जी पांढरी माती आहे त्यामध्ये अॅलन चं रक्त टाकतो आणि मंत्रविधी सुरु करतो, तुम्ही सगळे त्या समोरच्या झाडामागे आडोशाला थांबा. मंत्रविधी संपताच काही वेळात ते पिशाच्च येईल. पिशाच्च जवळ यावं यासाठी आमिष म्हणून अॅलन मैदानातच थांबेल. अॅलन चहुबाजूला मी स्फोटकंमिश्रित पावडर असलेलं रिंगण आखणार आहे. मंत्रविधी म्हणून मी लगेचच अॅलन च्या मागच्या झाडामागे लपून राहिलं. पिशाच्च जसं त्या रिंगणात अॅलन कडे येईल तसं मी माझाकडील कापडाचा बोळा जो केरोसीन मध्ये भिजवलेला आहे त्या स्फोटकमिश्रित पावडर वर टाकेन. आणि लगेचच ते रिंगण पेटेल. पिशाच्च त्यामध्ये अडकले जाईल आणि भांबावून जाईल. मग तुम्ही सगळे बाहेर, मग तुम्ही तुमच्याजवळील गोफणीने आगीचे गोळे त्या पिशाच्चावर टाका. घरमालकाला आणि बोमानकडे निर्देश करत बांगा म्हणाला.


“ हो आम्ही बरोबर नेम धरतो सवय आहे आम्हाला “ घरमालक म्हणाला.

“ छान.. जसे आगीचे गोळे त्या बिर्नाखावर पडतील तसा तो जळून खाक होईल, त्याला आगीच्या रिंगणात आपण आधीच अडकवलेल असेल त्यामुळे त्याला पळुन देखील जाता येणार नाही, फक्त एकंच गोष्ट जिकिरीची आहे ” बांगा म्हणाला.


“ ती कोणती “ न समजून मी विचारलं


“ पिशाच्च रिंगणात येऊन त्यावर आगीचे गोळे फेकेपर्यंत तुम्हाला तग धरून पिशाच्चासोबत रिंगणात उभं राहावं लागेल. “ बांगा अॅलन कडे कपाळावर आठ्या आणत म्हणाला.

ते ऐकून माझातर पाचावरच धारण बसली. याशिवाय दुसरा मार्ग नाही का निघू शकत असं मी विचारायचा आधीच अॅलन बोलू लागला.


“ मी आतमध्ये तग धरून थांबायला तयार आहे. “ निग्रहपूर्वक अॅलन म्हणाला.


“ शाब्बास.. तू काळजी करू नकोस हा बांगा तुला जास्त वेळ पिशाच्चासोबत राहू देणार नाही” बांगा अॅलन च्या दंडावर थोपटत म्हणाला.


मला सुद्धा अॅलन च्या धाडसाचं कौतुक वाटलं. मी सुद्धा अॅलन च्या दंडावर थोपटत त्याला मी सोबत असल्याचं सांगितलं.


ठरल्याप्रमाणे मी घरमालक आणि बोमान बांगा ने सांगितलेल्या झाडामागे आडोशाला आलो. इथे पिशाच्चांचा वावर असल्याने सावध राहण्याचा इशारा बांगाने आम्हाला दिलेला होता. त्यानुसार मी कान आणि डोळे उघडे ठेवून रायफल हातात घेऊनच उभा होतो. घरमालकाने गोफण तयार ठेवली, बोमानने कापडाचे बोळे केरोसीनच्या डब्यात टाकून ठेवले. आणि तो चवड्यावर बसला. मी रायफल हातात घेऊन झाडाच्या मागून समोर पाहू लागलो.


समोर अॅलन आणि बांगा मैदानाच्या मध्यभागी येऊन मंत्र विधीची तयारी करू लागले. अॅलनला मध्यभागी उभं राहायला सांगून बांगाने स्फोटक मिश्रित पावडरचं रिंगण आखल. आणि नंतर त्याचा झोळीतून मातीचं भांड आणि पांढरी पूड असलेली पुरचुंडी काढली. मातीच्या भांड्यात पांढरी पूड अलगद टाकली.

तेवढ्यात समोरच्या बाजूने खूप मोठी कोल्हेकुई ऐकू आली. आणि ४-५ वटवाघळे त्या झाडावरून फडफडत आवाज करत उडून गेली. आमच्या सगळ्याचंच लक्ष तिथे गेलं. ते झाड आमच्यापासून खूप दूर होतं पण अॅलन आणि बांगाच्या समोरच होतं. ते दोघे सुद्धा तिथे पाहू लागले.


“ हे लक्षण काही ठीक दिसत नाहीये “ घरमालक समोर पाहत गूढपणे म्हणाला.

मी रायफलवरची पकड घट्ट केली. आणि डोळ्याची पापणीही न लवता समोर अॅलन आणि बांगाच्या हालचाली पाहू लागलो. त्या निशाचर पक्षांकडे आणि कोल्हेकुई कडे कानाडोळा करून बांगा आपल्या मंत्र विधीची तयारी करू लागला. हातवारे करत मंत्र उच्चारण करून झाल्यावर बांगाने आपल्या पाठीमागून धारदार सुरा काढला आणि अॅलनला त्याचा हात पुढे करायची खुण केली.

अॅलनने आपला हात पुढे केलं बांगाने आपल्या धारदार सुऱ्याने अॅलनच्या तळहातावर फिरवला. हातामधून रक्त येऊ लागलं. रक्ताचे थेंब त्या भांड्यात सोडण्याचा इशारा बांगाने केला. तसं अॅलन ने हातातली जखमेची बाजू भांड्यावर धरली. त्यातून काहीसे रक्ताचे थेंब पडले असतील तोच..


तेवढ्यात अॅलन आणि बांगाला त्यांचा मागून गुरगुरण्याचा आवाज आला. तसं त्यांचा माना मागे वळल्या. तो गुरगुरण्याचा आवाज आमच्यापर्यंत देखील आला. घरमालक गोफण तयार करून पुढे आला. बोमानने कापडाचे बोळे गोफणीच्या खोबणीत ठेवले. बिर्नाख आल्याची चाहूल लागल्याने आम्ही तिघे सज्ज झालो.


परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आणि झुडुपांची खुसपूस ऐकू आली. मगाशी ज्या झाडावरून वटवाघळे उडाली होती हा आवाज तेथूनच येत होता. आता जरा बांगा साशंक झाला. त्याने जवळ पडलेली मशाल हातात घेतली रिंगणाच्या जवळ आला. एवढ्यात त्यांचा समोरच्या झाडामधून चीत्याप्रमाणे झेप घेऊन एक काळकुट्ट सातफुटी तोंडाच पिशाच्च अॅलन कडे झेपावलं. त्याची चपळाई एवढी होती कि अॅलन देखील गांगरला. पण त्वरेने त्याने बाजूला उडी मारली आणि पिशाच्च अॅलन च्या पुढे घसरत रिंगणाच्या आता कडेला गेलं. बांगा त्या पिशाच्चाकडे रोखून पाहू लागला.

बिर्नाख पिशाच्च आलं होतं तरीही ठरल्याप्रमाणे बांगा रिंगणाला आग का लावत न्हवता म्हणून मला आश्चर्य वाटलं.


अॅलन न देखील बांगाला आग लाव असा इशारा दिला. कारण योजनेप्रमाणे पिशाच्च रिंगणात आलेलं होतं. बांगाने ओरडूनच नकार दिला. आणि पिशाच्चाला त्याचाकडे येण्यासाठी आवाज देऊन चेतवू लागला पिशाच्च आता जास्तच गुरगुरत होतं आणि त्याने आपला मोर्चा बांगाकडे वळवला. बांगाला दिसत होतं पिशाच्च गुरगुरत होतं. बांगा काही करत न्हवता उलट वेड्यासारखं त्या पिशाच्चाला जास्तच खवळत असल्याचं पाहून मी पटकन घरमालकाला म्हणलो आगीचे गोळे टाका नाहीतर ते पिशाच्च दोघांना कच्च खाऊन टाकेल. घरमालक घाबरत घाबरत पण सावधगिरीने पुढे आला.


बोमानने कापडी बोळ्यांना आग लावली. आणि घरमालकाने क्षणाचाही विलंब ना लावता कापडी बोळ्यांना गोफणीने बरोबर नेम धरून पिशाच्चाकडे भिरकावले. घरमालकाचा नेम अचूक बसला. पण कागदी बोळे अंगाला लागून खाली पडावेत तसं ते आगीचे बोळे त्या पिशाच्चच्या अंगाला लागून कुचकामी असल्याप्रमाणे खाली पडले. त्याचा पिशाच्चावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याला त्याचा मागच्या झाडामागे कोणीतरी आहे हे समजलं आणि ते आमच्याकडे चाल करून चाचपडत येऊ लागलं. आगीचे बोळे कुचकामी ठरल्याने आमच्या तिघांचेही तोंडच पाणीच पळाल.


असं कसं झालं? आगीच्या बोळ्यांचा परिणाम व्हायला हवं होता. पण आम्हाला विचार करायला वेळ न्हवता पळुन जावं तर पाय जागचे हलेनात. पुतळ्याप्रमाणे आम्ही तिघेही गोठून जागीच उभे होतो. आमच्या या करामतीमुळे पिशाच्चाची पाठ बांगा समोर आली. आणि त्याचाच फायदा घेऊन बांगा पळत पळत पिशाचाकडे धावू लागला. मागून कोणीतरी येत असल्याने पुढे आमचाकडे येत असतानाच पिशाच्च मागे वळणार इतक्यात बांगाने जवळ येत मोठी आरोळी ठोकत उंच उडी मारली आणि आपल्या जवळील पाण्याची कातड्याची पिशवीच बुच काढून पिशाच्चाच्या नुकत्याच वळलेल्या तोंडावर त्यातलं पाणी फेकलं. चर्रर असा आवाज झाला. आणि पिशाच्चाने ओरडतच तोंड झाकून घेतलं. पिशाच्चाच्या चेहऱ्यावरून धूर येऊ लागला. जवळ पोचलेल्या बांगाने त्वरेने पिशवीतले अजून थोडे पाणी त्याचा छातीवर आणि पायांवर टाकले, त्यामुळे पिशाच्चाच्या छातीवरून पायांवरून सुद्धा तसेच धुराचे लोट निघू लागले. तसे मोठ्याने आवाज करत ते पिशाच्च बांगाच्या अंगावरून मागे उडी मारून पळतच मैदान ओलांडून त्वरेने मागच्या झाडीच्या गर्दीत नाहीसे झाले. पिशाच्च जाताच अॅलन धावत बांगाकडे आला. आम्ही तिघेजण सुद्धा बांगाकडे धावलो. बांगा हसतहसत कमरेवर हात ठेवून आफ्रिकन मध्ये काहीतरी बडबडत खाली वाकू लागला. त्याला काय होतंय आम्हाला कळेना.


“ पिशाच्च निघून गेलं आपला प्लान पण फसला “अॅलन चरफडत म्हणाला.


आम्ही तिघे सुद्धा बांगाच्या या वागण्याकडे पाहू लागलो. पण काही झालं तरी मोठ्या साहसाने बांगाने त्या पिशाच्चाला पळवून लावलं होतं.

“ पण आगीच्या गोळ्यांना ते पिशाच्च घाबरल कसं नाही “ घरमालक साशंक स्वरात म्हणला.

“ अरे हो ते पण आहेच “ मी घरमालकाच्या शंकेला दुजोरा दिला.

“ कारण ते बिर्नाख पिशाच्च न्हवत “ गालावर हास्याची लकेर उमटवत बांगा म्हणाला.

“ ओह्ह तरी मला शंका आलीच होती कारण हे पिशाच्च वेगळच दिसत होता कोल्ह्याप्रमाणे तोंड असल्यासारख मी पाहिलेल्या बिर्नाखासारख दिसायला न्हव्तच “अॅलन विचार करत म्हणाला.

आम्ही सगळेजण परत आखलेल्या रिंगणाजवळ आलो.


“ आपला विधी पूर्ण झालेलाच होता अॅलन चं रक्त पण भांड्यात टाकलं होतं पण मधेच झाडीमागे आधीपासूनच असणाऱ्या ख्रास्तर पिशाच्चाने आपल्याकडे मोर्चा वळवलेला होता. पहिल्यांदा मला पण आश्चर्य वाटलं कि मंत्र पूर्ण होतंच एवढ्या त्वरेने बिर्नाख कस की येऊ शकत पण नंतर थोडा वेळ मी पिशाच्च निरखून पाहिलं तेव्हा कळल कि साला हे तर ख्रास्तर पिशाच्च आहे ...” बांगा ने माहिती दिली.

“ ओह्ह म्हणूनच एवढ्या मेहनतीने टाकलेलं आगीचे गोळे कुचकामी ठरले तर “ घरमालक निराश होत म्हणाला.


“ अरे त्यानिमित्ताने कळल तरी कि तुझा नेम अजूनही चांगला आहे “ बांगाने त्यावर हसत हसत सांगितले.

त्यावर घरमालक लाजून खाली पाहू लागला


“ मी तुम्हाला सांगितलं होतं इथे पिशाच्चाचा वावर जास्त असतो म्हणून” बांगा आजूबाजूला पाहत म्हणाला.

“ बर झाला तुम्चाकडे पाण्याची पिशवी होती त्यामुळे ख्रास्तराला पळवून लावता आला, ख्रास्तरा पिशाच्चाचं पाण्याशी जमत नाही आणी आजूबाजूला पाणी पण न्हवते कुठे ” मी म्हणलो.

“ यापेक्षाही भयानक पिशाच्चांचा सामना मी केलाय. हे ख्रास्तर पिशाच्च काय आहे त्यापुढे “ बांगा कुत्सितपणे हसत म्हणाला.


सगळेजण ख्रास्तराच्या अचानक हल्ल्याने भांबावून गेले होते पण बांगाच्या साहसी खेळीमुळे त्याला पळवून लावण्यात आम्हला यश मिळालं होतं.


“ चला आपला मंत्रविधी पूर्ण झालाय रक्त पण भांड्यात आहे, बिर्नाख कधीपण येऊ शकत तयारीला लागा. असं म्हणून आम्ही सगळेजण होकार भरत आपापल्या जागेकडे जायला वळणार इतक्यात..


बाजूच्या झाडीमधून मोठ्याने आवाज करत एक भलमोठ पिशाच्च आवाज करत अॅलन कडे झेपावलं. त्याचा आवाजाने आम्ही सगळेच घाबरलो. अॅलनने पिशाच्च अंगावर येताच खाली झुकांडी देऊन त्याची झेप चुकवण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा सावध नसल्याने अर्धवट यशस्वी झाला. पिशाच्चाचे मजबूत लांब पंजे अॅलन च्या दंडाला घासून पुढे गेले होते त्यामुळे पिशाच्च पुढे जाऊन कोलमडल, तसा अॅलन देखील खाली उताणा झाला. आम्ही सगळेजण बेसावध असल्याने काय करावे तेच कळेना. कारण या पिशाच्चाने अचानकच वाघाप्रमाणे आमच्यावर म्हणजेच अॅलनवर झडप घातलेली होती.


“ बिर्नाख ....” अस ओरडतच बांगा पळतच रिंगणाच्या जवळ गेला.


अॅलन उठून उभा राहिला आणि पिशाच्चाकडे पाहत दोन शिव्या हासडून कपडे झटकत सावधपणे उभा राहिला. अॅलन च्या दंडाला थोडीशी जखम पण झाली होती.

पुढे जाऊन पिशाच्च पण सावधपणे उभं राहिलं आणि अॅलन कडे तोंड करून आवाज करू लागलं


बेशक हे बिर्नाख पिशाच्चच होतं मी त्याचा चेहर्याकडे पाहून ओळखलं अंधारातला त्याचा खिडकी मध्ये पाहिलेला चेहरा मी अजूनही विसरलेलो न्हवतो.


तेवढ्यात चहुबाजूला ज्वाळा भडकल्या. बांगाने मशाल पेटवून स्फोटका च्या मिश्रणाला आग लावलेली होती आणि आगीचा रिंगण तयार झाला होतं पण आता आम्ही सगळेजण त्या पिशाच्चासकट आगीच्या रिंगणात अडकलेलो होतो. बाजूचं रिंगण पाहून पिशाच्च इकडे तिकडे पाहत भांबावून गेल्यासारखं दिसलं. नन्तर आमचाकडे पाहून त्याने मोट्ठ्याने आवाज केला. तो आवाज अगदी अॅलनच्या घरी मी खिडकीतून मागे कोसळलो असता आलेला होता तसा वाटला.


“ ये हरामखोर ये आता .. आत्ता खरा आमना सामना आहे” मोठ्याने हसत हातातली मशाल घट्ट पकडत बांगा म्हणाला.


बांगाने मला घरमालकाला आणि बोमानला एका बाजूला येण्यासाठी फर्मावले. घरमालकाच्या हातातील गोफणीमध्ये गोळे टाकायला लावले.

अॅलन एका बाजूला झाला आणि पिशाच्चाला आपल्याकडे येण्यासाठी चेतवू लागला. तसे करताना त्या पिशाच्चाचे पूर्ण लक्ष त्याचाकडे जावे हा त्याचा हेतू होता. दरम्यान या गोष्टीचा फायदा घेऊन आम्ही त्या पिशाच्चावर आगीच्या गोळ्यांचा वर्षाव करावा असं ओरडून त्याने आम्हाला सांगितलं. आगीच्या ज्वाळा चहुबाजूने पेटल्या होत्या आणि त्या जास्तवेळ असणार न्हाव्त्या तेवढ्याच वेळात आम्हाला त्या बिर्नाखाला संपवायचा होतं.

पिशाच्च आवाज करत अॅलन च्या चेतावण्याने त्याचाकडे परत झेप टाकत आलं. त्याला चुकवाव म्हणून यावेळेस झुकांडी मारणार पण त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पिशाच्चाने अॅलन ला अंगावर घेतले आणि आपल्या लांब हातांनी त्याचा चेहऱ्यावर वार करणारच होते.

तितक्यात बांगा सावधगिरीने पळत त्यांचा जवळ गेला हातातल्या मशालीने एक जोरदार फटका त्या पिशाच्चाचा एका बाजूने तोंडावर हाणला. बांगा आल्याचं पिशाच्चाला लक्षात न आल्याने पिशाच्च अॅलन च्या अंगावरून बाजूला फेकले गेले. पिशाच्चाला तोंडावर थोडे आगीचे चटके लागले आणि त्याचा एक लांब असलेला हात आगीच्या रिंगणावर पडला. आणि त्याचा एका हाताला आग लागली. तसं पिशाच्च फडफडत इकडे तिकडे लोळून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागलं.


“ स्फोटक मिश्रित आगीचे रिंगण जास्तवेळ आग निर्माण करू शकत नाही, ते पिशाच्च अर्धवट जखमी आहे, हाच मोका आहे ....” असं म्हणत बांगाने घरमालकाला खुण केली.


घरमालकाला सुद्धा ते समजलं. त्याने त्वरेने गोफणीमधले कापडाच्या बोळ्यांना आग लावली आणि ते नेम धरून हातच्या आग विझवण्यात व्यस्त असणाऱ्या बिर्नाखाकडे भिरकावले. आगीचे २-३ गोळे बिर्नाखाच्या अंगावर पडले तसे पिशाच्च जमिनीवर पडून अजूनच ओरडू लागलं सगळा आसमंत दणाणून गेला. पिशाच्चाचे दोन्ही हात पेटलेले होते. अंगावर पण आगीचा प्रभाव दिसून येत होता.


“ अजून गोळे टाक “ बांगा ओरडला.


घरमालक गोळे टाकायला गोफण तयार करणार इतक्यात पिशाच्च्च उठून उभं राहिला आणि त्वरेने झेपावलं. पण यावेळी अॅलन पूर्ण सावध होता त्याने बांगच्या हातातून विद्युत गतीने मशाल घेऊन आमचाकडे येणाऱ्या पिशाच्च्च्या सरळ खोबणी असणाऱ्या तोंडातच घातली. पिशाच्च जागेवरच थांबलं. आणि घोगरा आवाज काढू लागलं. तसं बांगाने बोमानकडचा केरोसिनचा डबा पटकन घेतला. अॅलन जवळ जाऊन त्याला ढकलून बाजूला केलं. तसं अॅलन बाजूला जाऊन पडला. मग बांगाने हातातला डबा पकडून त्यातले केरोसीनच बिर्नाखाच्या तोंडावर ओतले. आगीचा मोठा भडका उडाला. बिर्नाख मोठमोठ्याने चित्कार काढू लागले, भडकलेल्या आगीमुळे बांगा त्वरेने बाजूला झाला आणि सगळ्यांना लांब जाण्याचा निर्देश दिला. बिर्नाखाचे तोंड आणि दोन्ही हात पेटत चालले होते. आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न बिर्नाख धडपडत होते. बांगाने परत हातातले केरोसीन पळत जाऊन बिर्नाखाच्या अंगावर ओतले आणि बाजूला उडी मारली जेणे करून आगीचे लोळ त्याचा अंगावर येऊ नये.

आता बिर्नाखाच्या पूर्ण शरीराला आग लागलेली होती आणि ते जमिनीवर पडले. आणि गडबडा लोळू लागले. परत पळत जाऊन बांगाने सगळाच्या सगळा केरोसीनचा डबा लांबूनच बिर्नाखावर ओतला.


आणि बाजूला गेला. बिर्नाख आता पूर्णपणे पेटलेलं होते. आगीच्या ज्वाळांनी त्याला घेरलं होतं. आम्ही सगळेजण त्याची तडफड पाहत उभे होतो.

थोड्याच वेळात बिर्नाखाची हालचाल मंद होऊ लागली पण आग अजूनही त्याचा शरीरावर होती.

थोड्याच वेळात बिर्नाखाची संपूर्ण हालचाल शांत झाली. बांगाने जवळ जाऊन खातरजमा करून घेतली.


आगीच्या रिंगणाचा लोळ सुद्धा कमी होऊ लागला. थोड्या वेळाने रिंगणाची आग सुद्धा शांत झाली. आम्ही सगळ्यांनी जवळ जाऊन बिर्नाखाचा कोळसा झालेल्या शरीराचा आढावा घेतला. अखेरीस बिर्नाखाचा खात्मा झाला असं बांगा म्हणाला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.


इथला परिसर पिशाच्चानी भरलेला असल्याने इथून चटकन निघण्यास बांगाने सांगितले. तसं आम्ही परतीच्या मागाकडे लागलो. मी अॅलन जवळ जाऊन त्याचा दंडावरील जखमेचा अंदाज घेतला. बांगाच्या झोपडीत जाऊन त्याचावर मलमपट्टी करूयात असं मी त्याला सांगितलं.शेवटी आल्या मार्गानेच आम्ही रात्रीच्या निरव शांततेत बांगाच्या झोपडीकडे परत आलो. रात्र भरपूर झाल्याने ती रात्र बांगाच्या झोपडीतच काढली.


दुसऱ्या दिवशी बांगाचा निरोप घेतला त्याने खूप मोठ्या संकटातून घरमालक आणि आमची सुटका केल्यामुळे आम्ही त्याचे मनापासून आभार व्यक्त केले. बांगाने सुद्धा आपल्याला या कामात मजा आली आणि माझा अनुभवामध्ये तुम्ही लोकांनी भरच टाकली असं म्हणत आम्हाला निरोप दिला. माघारी गेस्टहाउस वर परतल्यावर मी कंपनीचं उर्वरित काम चटकन संपवलं आणि अजून काही आगळीक होण्याचा आतच आफ्रीकेमधली ती चित्रविचित्र भूमी सोडण्याचा मी आणि अॅलनने निश्चय केला. आफ्रिकेतला पिशाच्च पाहण्याचा अॅलनचा छंद पार पडलेला होता. परत कोणत संकट येण्याचा आतच आम्ही आफ्रिकेतून काढता पाय घेतला ते पण इथे परत न येण्याचा निश्चय करूनच...


समाप्त.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror