STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

4  

Jaishree Ingle

Romance

ये आता तरी

ये आता तरी

1 min
142

ही हवा म्हणे तू आहेस ईथे कूठे तरी 

अगं दुर जाऊ नको जवळ ये आता तरी.....


तुझ्या केसांच्या सावलीत रात होऊ दे 

पहाट उजाडताच तुझंच गीतं गाऊ दे 

तूच माझी तूझी अदा कोणी चोरली जरी......


तुझ्याविना साजणी मनं लागतं नाही 

सोबत ये तू माझ्या एकटा जागत नाही 

तूझं ते गोड हसणं परी घेऊन गेली जरी......


एखाद्या राणी सारखा आहे तुझा रुबाब 

सगळ्या मुली सोडल्या तूला दिला गुलाब 

मी तुझाच राजा माझी आशा मोडली जरी.....


तुझंच नाव मी श्वासावर आहे गोंधलं

जन्माचं नातं राणी तुझ्याशी आहे बांधलं 

तू माझीच होणार सारी दुनिया नडली जरी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance