विश्वास
विश्वास
विश्वास अजूनही सुध्दा
सापडत, असतो ,जगात
अगदी मिठासारखा
अजून सुद्धा ,वृक्षाच्या विश्वासावर
पक्षी दूर दूर निघून जातात
आपले सर्वस्व सोडून
वसंत येणाऱ या विश्वासावर ,
वृक्ष पानपान गळून,
अगदी रिकामे होऊन जातात
परत बहरून येण्यासाठी
पाऊस येणार या विश्वासावर
छोटसं बीज मातीत,
खोल खोल रुजून जातं
परत कोंभ येण्यासाठी
छोटीशी नाव, छोट्याश्या वलह्याच्या
विश्वासावर
सागरात दूर दूर निघून जाते,
परतून येण्यासाठी
आणि कालपर्यंतच्या,
अनोळखी माणसासोबत
एक स्त्री निघून जाते
जन्मभरासाठी
