" मी आहे ना ! "
" मी आहे ना ! "
नाती --व्यवहारी जगाच्या वाळवंटात ,
क्याक्टस सारखी -काटेरी , बोचणारी ,
तरीही एखाद्याच फुलानं- मोहवणारी --
नाती --वर्षाकाळी पसरलेल्या हिरवळी सारखी ,
नजरेला सुखावणारी , तृप्त करणारी ,
पण हंगामी --
नाती --उबेसाठी वाट बघत गोठून जाणारी ,
जगण्याच्या केविलवाण्या धडपडीत ,
वाळून जाणारी , ओघळून गेलेल्या
अश्रूं सारखी --
नाती--नि: शब्द, अबोल , अनाम ,
मध्य रात्रीच्या पाव्या सारखी,
कृष्ण -राधेच्या प्रेमा सारखी,
विदेही, -तरीहि शाश्वत --
नाती --आपलं म्हणवणाऱ्या कुणीतरी ,
दिलेल्या वेदनांचे दंश ,
लपवून ठेवण्या साठी -
तन -मनाला गारवा देणाऱ्या ,
घनदाट वृक्षा सारखी --
नाती --बाहेरच्या आणि आतल्या तापाला
पावसा सारखं भिजवत ,
हळूच सांगणारी "मी आहे ना!"
तुझ्या जवळ --
अगदी तुझ्या जवळ "---
