विरह वेदना
विरह वेदना
संपेना विरह वेदना श्वास हा जरी संपला
मृगजळ तुझ्या प्रेमाचे मज भासे दशदिशा
रंज हा ठेउन मनी श्वास अखेर थांबला
मम कलेवरा मग मी प्रश्न विचारी,
निःशब्द अधरांवरी शब्दांकुर रुजतील का
शुष्क मनामधी प्रेम तरु फुटतील का
सखे उपेक्षित मी प्रेमवीर असा कधी तरी वरशील का
सय येता माझी कधी क्षण एक बावरी होशील का ठाऊक
असे मज उत्तर तरी आस काही सुटेना
काय सांगू प्रिये तुझं व्यथा नसे ही या जन्माची
संपता संपेना प्रेम प्रतीक्षा जन्मोजन्मीची

