वारा होऊन कधी..
वारा होऊन कधी..
तू या बटांशी खेळ वारा होऊन कधी
गळा चुंबून घे तू माळ होऊन कधी...१
नाही कधी म्हणाले, सांग ना तू मला?
स्पर्शून जा ओठांना थेंब होऊन कधी...२
छळे एकांत भेटण्या अधिर होते तेव्हा
बिलगून घे राजसा सावली होऊन कधी..३
हरविले रंग जीवनी सारे उदास जिणे
मोहून टाक तू रे इंद्रधनू होऊनी कधी..४
तूच सांग ही धरा बोलते का कुणाशी
फुलव तू मला असा पाऊस होऊनी कधी..५

