चोर तू..... Jan 22, Wed (10:28
चोर तू..... Jan 22, Wed (10:28
1 min
184
हा श्वास चोर तू,हे मन चोर तू
निजल्या बागेतील गंध चोर तू... १
उपाशी जगणे सोडेल का पिच्छा
झोपडीतील माझ्या भूक चोर तू....२
किती लोळशील सागरी सुखाच्या
भिजवूनी तुझ्यात हे दुःख चोर तू...३
सखे,एक मागणे मागतो कर जोडून
फाटक्या वस्त्राचा ठिगळ चोर तू...४
तू माझी हो कायमची..यासाठी की..
उजेडात आणून आता अंधार चोर तू..५
