वादळ
वादळ
सरीवर सरी बरसती
वादळवारा घोंगावतो
विरहीणीच्या नयनातून
अश्रूंचा बांध फुटतो
धुमस्ती वारे चोहीकडे
वादळाचे कल्लोळ मनांत
मेघही आंक्रदून आले
भावनांही तीव्र पापणीत
सावर रे वेड्या मना
भावनभा आवर घालत
मोतीसर ओघळून
अलगद आले ओंजळीत

