STORYMIRROR

Satish Aher

Romance

3  

Satish Aher

Romance

'त्या वळणावरती...'

'त्या वळणावरती...'

1 min
197

त्या वळणावरती .. घडलं अवचित

कधी नव्हे ते आडवळणाला

सामसूम होता रस्ता

कुणी न दिसले

दिसले फक्त भरलेलं आभाळ

गर्दी करून ढग ते काळे कुट्ट

घर घर गर्जना लख्ख विजांचा लखलखाट

होता माझा परतिचा तो प्रवास

एकलाची होतो घेऊन एक .. नवीनच बाईक

मनात माझ्या भरली घबराहट

कुणी न दिसले...दिसले फक्त भरलेलं आभाळ

आणि काय सांगू? क्षणात झाला सुरू होोऽ

धो धो मुसळधार पाऊस

त्या वळणावरचा वाटेत..भिजलो ओलाचिंब;

पण नशिबाने होतं जवळच

एक वडाचे जुनें झाड...मग काय ?..

पटकन गाडी घुसली .. झाडाच्या त्या ढोलीत 

सुटला सुसाट वारा भरली अंगात हुडहुडी

तैंव्हाच चिंबचिंब भिजलेली एक

युवती घाईघाईत तिथेच आली आश्रयास

चेहर्यावरील ओघळणारे पाणी

भिजलेले काळेभोर मोकळे केसं

निथळता निथळता अंग ते अलौकिक

हळूच भिडल्या नजरा नजरेला

पाहून तिजला..वाजली घंटी..याच हृदयात

कुणी न दिसले त्या मुसळधार पावसात

दिसले फक्त चिन्हे आक्राळ विक्राळ

अंधारलेल्या वाटेत वडाच्या ढोलीत

ती तर घाबरली होती खूप.

निःशब्द नजरेनंच दिला तिजला

दिलासा विश्र्वासाचा

"घाबरू नकोस मी आहे नाऽ"

आणि मग काय विचारता?

दिसले मजला .. हळुवार हसली गालात

सुटला सुसाट वारा भरली अंगात हुडहुडी

आली दोन पावले जवळी आधाराच्या आशेनं

तर हलकेच हसत म्हणलो तिला मी

"Just minutes ! "

आणि सॅग मधून बिस्कीट पुडा काढून

तिला आॅफर केला.

तसं लाजतच तिनं मान डोलावत

" No thanks ! "

म्हणून तिरक्या नजरेने गोड हसली.

तसं मी हलकेच मान उडवून

पुन्हा तिला आॅफर केलं

आणि म्हणालो " Don't worry ! "

तर काहीच न बोलता तिने नकार दिला

तसं मी हसऱ्या नजरेने म्हणालो

" Have a GOOD DAY "

तर लागलीच खुदकन गाली हसली.

आणि ... आणि

काय सांगावं तुम्हाला !

अहो ऽ तीच आता मजला

रोजच सकाळी उठल्यावर 

गोऽ ड हसत

" HAVE A GOOD DAY "

म्हणत

चहाचा कप देते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance