STORYMIRROR

Akhilesh Kulkarni

Romance

4  

Akhilesh Kulkarni

Romance

तू भेटायला हवे !

तू भेटायला हवे !

1 min
187

कधी तरी तू भेटायला हवे 

अलगदपणे माझ्या खांद्यावर निजावे 

मी दिवसा बघतो ते तू निजल्यावर तरी पाहावे

स्वप्न असे की प्रत्येक क्षणी तुझाच भास व्हावे!


कधी तरी तू भेटायला हवे 

माझ्या कुशीत तुझे मस्तक जणू फुलपाखरू वाटावे 

उद्या तू दुसऱ्या फुलावरही बसशील 

पण देवा मला पुढच्या जन्मी तरी गुलाब बनवावे!


कधी तरी तू भेटायला हवे 

तुझ्या नाजूक ओठांचा स्पर्श करता यावे 

हळू हळू स्पर्श, हळू हळू पापण्या मिटावे 

तुझ्यात मी अन् माझ्यात तू इतके विलीन होऊ,

की तुझे गुलाबी ओठ माझेच व्हावे!


कधी तरी तू भेटायला हवे 

तुझ्याशी नाते व्हॅलेंटाईनपुरते नव्हे आयुष्यभर जुळावे 

जुळता जुळता मन इतके जुळावे, की तू देखील म्हणशील मला 

’आता खरंच आपण भेटायला हवे!’


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance