STORYMIRROR

Akhilesh Kulkarni

Others

2  

Akhilesh Kulkarni

Others

कॉलेजचा मित्र

कॉलेजचा मित्र

1 min
181

अजून तरी तो दिवस विसरू शकत नाही

एकाच बाकावर भेटलो, ती भेट होती शाही

आपले समगुण पाहुनी प्रतिबिंबही लाजले 

म्हणुनी तुम्ही तर एकाच नाण्याचे दोन भाग

मी काही तुमच्या शर्यतीत नाही


अजून तरी तो दिवस विसरू शकत नाही

कशी दोन तबल्यांनी लय पकडली कळलेच नाही

मी होतो घट्टा तू त्याच तबल्याची स्याही

काळासोबत भले बदलले तुझे वाद्य, पण माझी साथ नाही

तू वाजवशील भैरवी आता तरी तीनतालाशिवाय जुगलबंदी परिपक्व नाही


अजून तरी तो दिवस विसरू शकत नाही

सुरांसोबत शब्दांचीही मैफिल सुरु झाली

तुझी आहे कळी अन् मज पाकळी मिळाली

शब्दाला शब्द जोडत गेलो

आता तूच रे संदीप, मज सलीलची उपमा मिळाली

चल मित्रा आता आलीच आहे वेळ तर आयुष्यावर बोलू काही


अजून तरी तो दिवस विसरू शकत नाही

ऊन सावलीच्या खेळामध्ये सोबत पुस्तकेही धरली

टिपुक टिपुक थेंबांखाली गरम नेसले मॅगी खाल्ली

गोड गुलाबी थंडीत प्रेयसीची सोबत आठवण काढली

खांद्याला खांदा लावून ही दोस्ती पुढे नेली


बहुतेक मित्रच एवढे खास असतात काही की शोधूनही लवकर सापडत नाही

अजून तरी तो दिवस विसरू शकत नाही


Rate this content
Log in