तुझ्या प्रेमाचा
तुझ्या प्रेमाचा
तुझे पैंजण वाजती छम छम
बघ आला साजणी प्रेमाचा मौसम
हा तुझ्या प्रेमाचा बेधुंद गारवा....
मन फिरतंय माझं बनून पारवा
सखे साजणी तुझ्या प्रेमात किती गोडवा....
आशा करतो मी तुझ्या प्रेमाची
आस मला फक्त तुझ्याच नामाची
जीवनात तू प्रेमाचा रंग भरावा....
मदमस्त सखे साजणी तुझे नयन
मोका दे कर माझ्या प्रेमाचे चयन
तुझ्याच मिठीत माझा दिन सरावा....

