STORYMIRROR

Abhjya a

Romance

4  

Abhjya a

Romance

तुझी वाट पाहते मी...

तुझी वाट पाहते मी...

1 min
311

तुझी वाट पाहते मी

येशील का रे पुन्हा

सरले ग्रीष्म कैक 

माझ्या सावलीच्या ऊन्हा


आठवूनी स्पर्श तुझा

मज फुटला रे पान्हा 

शमविण्या तृष्णा तयाची

होशील का रे तान्हा 


आसुसली ही मीरा 

प्रतिक्षुन रे कान्हा 

थकले उपेक्षुन आता 

एकदाच भेटूनी जाना 


नाचेन मी आनंदविभोर 

तु वसंत होऊन येना 

तल्लीन मी भिजेन चिंब 

तु पाऊस बनुन मिठीत घेना 


व्याकुळ उभी मी तिथेच 

अवचित कधी भेट देना 

आतुर भेटीस तुझ्या 

अबलेची हाक ऐकना 


तुझी वाट पाहते मी 

येशील का रे पुन्हा 

येशील का रे पुन्हा..... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance