मनमोहन घननीळ
मनमोहन घननीळ
1 min
28.6K
वाऱ्यावर झुलताना पाने
सांज भराला आली
भिरभिरणार्या पंखामध्ये
गाणे देऊन गेली
नजरेची भाषांतरे करताना
पापणी झाली ओली ओली
मौनामधले शब्द कुणाच्या
झाल्या कवितेच्या ओळी
सखी तू स्वरात शोधता
रानात बावरली शीळ
कुठे कुणाची वाट पाहतो
मनमोहन घननीळ

