स्वप्नांत आहे....
स्वप्नांत आहे....
दूर जाऊ नको मजबूर होऊ नको
सारं जग हरवलं मी तुझ्या स्वप्नांत आहे....
सोन्याच्या अक्षरांनी लिहलं तूझं नावं
रोज स्वप्नांत देखील पाहिलं तूझं गावं
सखे साजणी माझा जीव तुझ्यात आहे....
रंग तुझा गुलाबी चाल तूझी शराबी
प्रेम तुझ्यावर माझ्या नजरेत ना खराबी
तूझं प्रेम साजणी माझ्या नसा नसात आहे....
प्रेमानं भरलं रांजण छम छम वाजे पैंजण
मी तुझ्या मागे तुझ्यावर मरतात सारेजण
चल ये जवळ तुझा रोम रोम माझ्यात आहे....
प्रेमाला तू संभाळ माझ्यावर जीव ओवाळ
साजणी माझ्या नावाने तूझं भरलं कपाळ
माझं स्वप्नं तू दिन रात माझ्या नयनात आहे....

