समाधान
समाधान
पायात चप्पल नसायची तेव्हा
तरी 17 ठिकाण फिरून झाले
17 प्रकार असून बुटांची
पाय घरा बाहेर न निघाले
एका भाकरीने पोट
तिघा-चौघाचे भरले,
टेबलावर 17 पक्वान्न असूनही
बाळ उपाशीच झोपले
कपड्यावर एक
सण आमची साजरी झालीत,
कपाट भरलेलं असूनही
सण कपाटातच रुसुन बसलीत
पंखे नसूनही तेव्हा
झोप मिठी मारून जायची
AC असूनही आज
घाई झोपेला निघायची
