सैनिक
सैनिक
देश रक्षणासाठी सदा राही तत्पर
भारतमातेचा सुपुत्र..
मिळो न कधी अन्न पाणी
तरी सदा त्यांचे मुखी असे
भारतमातेची वाणी..
किती गावे त्यांचे गुणगान
तरीही न फिटे त्यांचे ऋण
पर्वा न करता जीवाची
करी देशाचे रक्षण
नाही जुमानत कधी
ऊन, पाऊस, वारा
तुमच्या मुळेच आहे आज
सुरक्षित भारत सारा
शूर सैनिक तुम्ही या भुमातेची
तुम्हा न कुणाची भीती
कणखर मन असे तुमचे
दणकट निधडी छाती
सदाही फडके तिरंगा डौलाने
तुम्हा क्रांतीविरांच्या त्यागावरती
नित्य सन्मान करू तयांचा
ठेवुनी मस्तक तुमच्या पायावरती
