STORYMIRROR

Diya Bhalerao

Romance

4  

Diya Bhalerao

Romance

सांगाती

सांगाती

1 min
518

तापलेल्या भूईवर

अवचित वळीवाची सर यावी,

वसंतात गळलेल्या पानांची

कधी रंगीत फुलपाखरे व्हावी..!!


तसाच माझ्या आयुष्यात

अलगदपणे तू यावा,

जणू शरदात वाहणारी

बोचरी-गुलाबी हवा...!!


आनंदात असताना कधी

हातात तुझ्या हात यावा,

रडताना ही कधी तू

तुझ्याच खांद्याचा आधार द्यावा..!!


हळूच तुझी चाहूल लागावी

कातरत्या त्या सांजवेळी,

तुझ्या संगतीत सरावी

पावसाची रात ओली...!!


तुझ्या स्पर्शाने यावे

कधी तनावर असे शहारे,

दवबिंदूंच्या भासाने थरारावे

जणू भिजलेले रान सारे..!!


तू सोबत असताना

सरी सुखाच्या बरसती,

राहशील का रे नेहमी

बनुनी माझा सांगाती...!!


Rate this content
Log in

More marathi poem from Diya Bhalerao

Similar marathi poem from Romance