STORYMIRROR

Chandrakant Dhangawhal

Romance

4  

Chandrakant Dhangawhal

Romance

रोज सकाळी

रोज सकाळी

1 min
300


रोज सकाळी गुलाब

ती येण्याची वाट बघायचा

तिच्यासाठीच तो सुगंध दरवळायचा


*मोगराही तिच्यासाठीच* 

*उमलायचा*

*तिच्या गालावरच हसु*

*पाहून फुलायचा*


*पण ती फक्त गुलाबालाच बघायची*

*जवळ जावून त्याला अलगत मिठीत घ्यायची*


*तिचा लडिवाळ पाहून*

*मोगरा जरा रूसायचा*

*रागात तिला म्हणायचा*

*कधीतरी एक नजर*

*माझ्याकडेही बघत जा*

*प्रेमाने मलाही कवेत घेत जा*


*तू हजारदा त्या गुलाबाला पाणी घातलेस तरी*

*तो तुला काटेच टोचणार आहे*

*अगं या मोगऱ्याच्या गजऱ्याशिवाय*

*तू कुठे सुंदर दिसणार आहे*


*तुला सांगू का.....*

*तुझ्या वेणीला गजऱ्याचाच लळा लागतो*

*म्हणूनतर द्रुष्ट लागेपर्यंत*

*आरसा तुला एकसारखा*

*टक लावून बघतो*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance