Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shrinivas Athalye

Inspirational

3  

Shrinivas Athalye

Inspirational

पर्यावरण गीत

पर्यावरण गीत

1 min
262


विचार आधी पर्यावरणाचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||धृ||


मेट्रो, मोनो, माॅल मिळाले

पण हिरवेपण पाहा गळाले

ना 'नाणार'विषयी नाराजी

परी प्रदूषण चिंता ताजी

विचार आधी करा भविष्याचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||१||


भकास जमिनी विकास नाही

लाज वाटू द्या मनास काही

जंगले का ही का तोडताय?

जंगले सिमेंटची हाय! हाय!

विचार आधी हरितक्रांतीचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||२||


केमिकल पाणी धाक सुटे

वायुगळती कुठे कुठे

ग्लोबल वाॅर्मिंग देई वाॅर्निंग

जागे व्हा हो, सोडा झिंग

ताठा न ; साठा हवा ज्ञानाचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||३||


पाही मानव हित मानवाचे

हित कसले? अहित सगळ्यांचे

घरट्यांची लागे वासलात

पशू वन्य धावती शहरात

विचार आधी करा दुसऱ्याचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||४||


पाहा टिकले जर पर्यावरण

नांदू सुखाने सारे आपण

खुशाल यशाची मशाल नाचवा

पर्यावरण आधी वाचवा

विचार आधी टिकून राहण्याचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||५||


विचार आधी पर्यावरणाचा |

पिटा डांगोरा मग विकासाचा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational