Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shrinivas Athalye

Others

3  

Shrinivas Athalye

Others

मास हा श्रावणाचा

मास हा श्रावणाचा

1 min
178

सर सर सर धारा धावती अंगणात

नवथर मग पाठी ऊन येते क्षणात

अविचल बहु चाले खेळ ऐसा तयांचा

प्रमुदित दिवसांचा, मास हा श्रावणाचा ||१||

हरित गवत हासे थेंब ते घेत माथी

गज, बक, मृग सारे संगती खेळताती

पवन सुखद आणी गंध तो गारव्याचा

शुभकर शकुनाचा, मास हा श्रावणाचा ||२||

सुबक तबक हाती देवपूजानिमित्य

लगबग ललना त्या मंदिरी जात नित्य

परिमळ सुमनांचा, अत्तरांचा, उदीचा

प्रवचन श्रवणाचा, मास हा श्रावणाचा ||३||

झर झर झर झोका उंच जाई नभात

हसत मधुर बाला गोफ हा गुंफतात

पुरण, वरण, भाज्या, गोड पक्वान्न यांचा

सणबहुल, सुखाचा, मास हा श्रावणाचा ||४||

बहुत जरि जहाले मास संवत्सरात

मन मम रमते त्या एकट्या श्रावणात

अविरत स्मरतो मी काळ तो शैशवाचा

जप, तप, व्रत यांचा, मास हा श्रावणाचा ||५||

Rate this content
Log in