Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Aj_The_ Ajay_Jadhav

Romance

5.0  

Aj_The_ Ajay_Jadhav

Romance

प्रतिबिंब

प्रतिबिंब

1 min
1.4K


तव चंदेरी अंग नव्हे चंद्राचे प्रतिबिंब,

तीळ हनुवटीवरला जणू काजळाचा टिंब;

काळजाचे अवचित होणे पार अवखळणे,

श्वास श्वासात सर्वत्र भिनने तुझाच गंध.


साजणे कोण्या नक्षत्राची प्रतिमा तू,

कोणत्या कलाकाराची कलाकुसर;

इतुकी नक्षीदार ठेवण तुझ्या कायेची,

तू लावण्या ऐसी नागिणीहून जहर!


किती करतेस कत्तली एका नजरेने,

किती छळावे कुणास ऐसें चंद्रकलेने;

प्रत्येक हृदय मंदिरी तुझेच देव्हारे,

शब्दांनाही तुझ्याच कविता सुचने!


वक्षावरती सोडलेली वेणी केशांची,

नागीण जणू संरक्षक यौवणाची;

ते ओठांवरचे हास्य मधाळ शर्करेपरी,

चाखता मिळेल मुक्ती सप्त जन्माची!


किती लिहावे अन किती लिहीत रहावे,

तुझ्या तारुण्याने अजून किती बहरावे;

ओढ तुझ्या बाहूंची अशी लागते जिवा,

हे अंतर दोघांतील अजून कसे सोसावे।


Rate this content
Log in

More marathi poem from Aj_The_ Ajay_Jadhav